बुद्ध तत्वज्ञान

बुद्धांचे जीवन आणि शिकवणुक सर्वांसाठी खुले; म्हणून जीवनाचे खरे स्वरूप बुद्धधम्मात

जेव्हा आपण भगवान बुद्धांच्या जीवनाचा आणि शिकवणुकीचा अभ्यास करतो तेव्हा आपण पाहतो की, सर्वकाही सर्वांसाठी खुले आहे. येथे कोणतीही गुप्त शिकवण (सांगितलेली) नाही. भगवान बुद्धांच्या संपूर्ण जीवनात ज्या काही घटना घडल्या होत्या त्या सर्व जीवनात ज्या काही घटना घडल्या होत्या त्या सर्व, कसलाही आडपडदा आणि रहस्यमयता न ठेवता, एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे, समोर मांडल्या गेल्या आहेत.

भगवान बुद्धांच्या नजरेत, बहुतांश लोक ज्या बाबींना’ “पराप्राकृतिक शक्ती” समजत असत, खरे पाहता, त्या घटना प्राकृतिक स्वरूपाच्याच असत फक्त सामान्य लोक त्यांना समजून घेऊ शकत नव्हते एवढेच !

जर सर्वच संस्कारित (निर्मित) वस्तू परिवर्तनाच्या नैसर्गिक नियमाअंतर्गत येत असतील तर त्यांना आपण पराप्राकृतिक शक्ती कसे काय म्हणू शकतो? एवढेच नाहीतर, भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व आणि महापरिनिर्वाण सुद्धा सामान्य परिस्थितीतच घडले होते. ते स्वतः सामान्य धार्मिक शिक्षक (गुरु) म्हणून (आयुष्यभर) जगले.

जीवनाचे खरे स्वरूप

जीवनाचा उद्देश (ठरविणे) ही फारच गुंतागुंतीची बाब आहे. निरनिराळे लोक निरनिराळ्या प्रकारचे स्पष्टीकरण देत असतात. परंतु बौद्ध दृष्टिकोनानुसार, जीवनाचा उद्देश जीवनाच्या समस्येवर एक परिपूर्ण समाधान शोधून काढणे आणि शाश्वत किंवा परम सुखाची प्राप्ती करणे हाच आहे.

वैद्यकशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अजूनही माणसाच्या जीवनातील मानसिक क्लेश, ताणतणाव आणि असमाधान यावर कोणताही परिणामकारक उपाय शोधलेला नाही, परंतु बुद्धधम्माने यांच्या संभाव्य कारणांचे पूर्वनिदान कथन करून फारच स्पष्ट असे चित्र आपल्याला दिले आहे की, ”दुःखाला कारण आहे आणि म्हणून (ते संपविले की) नीच सुख लागणार आहे.”