इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०६ – बटकारा स्तूप, धम्मराजिका स्तूप आणि मोहरा-मरदू स्तूप

बटकारा स्तूप -पाकिस्तानात स्वात खोऱ्यात अगणित ऱ्हास झालेले स्तूप आहेत. इतिहासातील या मौल्यवान व पूजनीय स्तुपांबाबत त्यांना काही घेणेदेणे नाही. स्वतःच्या पूर्व इतिहासाची जाणीव नाही. खोदकाम करताना सापडलेल्या अनेक छोट्या बुद्धमूर्तीची तस्करी करण्यात ते पटाईत.

मिंगोरा जवळ असाच एक महत्वाचा ऱ्हास झालेला स्तूप आहे. त्याचे नाव बटकारा. हा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला होता. या स्तुपाचे अलीकडे म्हणजे १९५६ मध्ये इटालियन आर्किओलॉजिस्ट डोमोनिको यांच्या देखरेखीखाली पुन्हा खोदकाम करण्यात आले. तेथे सापडलेल्या नाण्यांवरून व मूर्तींच्या पेहेरावावरून Indo-Greek कलेचा संगम झाल्याचे आढळते.

बटकारा स्तुप

स्तुपात सापडलेल्या अनेक वस्तू National Museum of Oriental Art या इटलीतील रोम शहरातील म्युझियम येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. हे म्युझियम खास गांधार शैलीतील पुरातन वस्तुसंबंधी प्रसिद्ध आहे. येथे खासकरून पाकिस्तानातील स्वात खोऱ्यातील स्तुपामधील आढळून आलेल्या वस्तूंचे जतन केलेले आहे.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०५ – शाहबाझ गढी येथील अशोक शिलालेख आणि जोलियां मॉनेस्ट्री

धम्मराजिका स्तूप

धम्मराजिका स्तूप – फियान आणि हुएन त्संग या भिक्खूंनी त्यांच्या प्रवासवर्णनात घडीव दगडांचे शहर( सिटी ऑफ कट स्टोन ) म्हणून तक्षशिला यांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रावळपिंडी जिल्ह्यात तक्षशिला विद्यापीठ हे मोठे पुरातत्वीय केंद्र आहे. तेथे अनेक बौद्ध विहार, संघाराम प्राचीन सिल्क मार्गावर आहेत. आशिया खंडातील ते एक महत्त्वाचे स्थळ आहे. तेथील पुरातन अवशेषांमध्ये विविध निवासस्थाने आणि विहार यांचे अवशेष आढळून आले आहेत. या स्थळाच्या उत्तरेस कुशाण राजवटीचे शहर आढळले आहे. धम्मराजिका स्तूप इथेच आहे. कुणाल स्तूप सुद्धा इथेच आहे. याशिवाय जंदियाल, बदालपुर, बहालार स्तूप, व गिरीस्तूप संकुल सुद्धा इथेच आहे.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०४ – शिंगारदार स्तूप आणि पिपलान बौद्ध मॉनेस्ट्री

मोहरा-मरदू स्तूप

मोहरा-मरदू स्तूप – तक्षशिलाच्या अवशेषांजवळ हे ठिकाण असून येथे एक मोठा स्तूप आहे. डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण असलेल्या या कुशाण काळातील स्तूपाचे तीन भाग पडतात. मुख्य मोठा स्तूप, वोटीव स्तूप आणि संघाराम. युनेस्कोच्या वारसा यादीत या स्थळाचे नाव १९८० मध्ये आले.

वोटीव स्तूप

सर जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली १९१४-१५ मध्ये येथे उत्खनन केले असता भिक्खूंसाठी २७ छोटी निवासस्थाने उघडकीस आली. तसेच पाणी साठवणूक करण्याची टाकी आणि स्वयंपाक घर सुद्धा येथे आढळलेले आहे. ही मॉनेस्ट्री म्हणजे दोन मजली इमारत होती. लाकडांचा भरपूर वापर इथे केला होता.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *