इतिहास

‘या’ ठिकाणी १८५६ पासून आतापर्यंत ३५० पितळेच्या बुद्धमूर्ती सापडल्या

तंजावर हा जिल्हा तामिळनाडूमध्ये असून चारशे वर्षांपूर्वी मराठे सरदार व्यंकोजी यांनी तेथील गादी काबीज केली. १६ ते १८ व्या शतकापर्यंत मराठेशाहीची पताका तेथे फडफडत होती. आजही तंजावर येथे अनेक मराठी कुटुंबे वास्तव्यास आहेत. अशा या तंजावर प्रांतात अनेक देवळे असून १३-१४ व्या शतकापर्यंत असलेल्या चोल राजवटीत येथे बौद्धधम्म बहरला होता. तसेच तंजावर प्रांतात पुथूकोत्ताई, मेयावरम, कुंभकोणम, मन्नरगुडी व तिरूवडी असे पाच सुभे होते. व या सुभ्यात त्याकाळी मोठीे बौद्ध विहारे होती. सिरिलंके बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

१९९३ पासून तंजावर येथे अनेक पुरातन स्थळी उत्खनन करण्यात आले. तेव्हा अनेक बुद्धमूर्ती सापडल्या असे बुद्धिस्ट स्कॉलर बी जांबुलिंगम यांनी सांगितले. माथिलाही सिन्नी वेंकटस्वामी यांनी त्यांचे पुस्तक Bouthamum & Tamilum या पुस्तकात तंजावर, त्रिची व पुराकोट्टाई येथे सापडलेल्या ग्रॅनाईट बुद्धमूर्ती बद्दल बरेच काही लिहिले आहे. नागपट्टनम परिसरात सुमात्रानिशैलेंद्र या पुरातन विहार असलेल्या ठिकाणी १८५६ पासून आतापर्यंत ३५० पितळेच्या बुद्धमूर्ती मिळालेल्या आहेत. नुकतीच मागील वर्षी सप्टेंबर मध्ये तेथील पेरूवरूणी देवळांमधील तलावात स्नान करताना एकास पितळेची बुद्ध मूर्ती मिळाली.

हे पण वाचा : जगाला महान बौद्ध विद्वान देणाऱ्या तामिळनाडूतील प्राचीन ‘कांची’ भूमीचा इतिहास – भाग १

कुंभकोणमचे नवग्रह देऊळ हे भगवान बुद्ध यांचे विहार आहे असे २०१५ मध्ये दिसून आले आहे. येथे तीन तलाव आहेत. येथील चालीप्रमाणे सतरा परिक्रमा कराव्या लागतात. व बुध ग्रहाची पूजा येथे करतात. तंजावरचे ब्रिहाडेश्वर मंदिर चोल राजवटीत विहार होते. थिरूवेकंटू येथील श्वेतरानेस्वरा देवळात दर बुधवारी बुधान(बुद्ध) पूजा केली जाते. येथील देव बुद्धीशी निगडित आहे असे मानले जाते. व परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्यासाठी येथे अनेक भक्तजन येतात. सहाशे वर्षांपूर्वी चोल राजवट संपुष्टात आल्यावर वैष्णव पंथीयांचा प्रभाव वाढला. त्यांनी अनेक विहारातील मूर्त्यांमध्ये बदल केले व काही तलावात टाकल्या. पण चालीरीती बऱ्याच ठिकाणी कायम राहिल्या. आता नव्याने होत असलेल्या संशोधनाने प्रस्थापितांचे खोटे दावे आणि त्यांनी केलेले अतिक्रमण उजेडात येत आहे. ही भूमी बुद्धांची आहे, सम्राट अशोक राजाची आहे. आणि हे सत्य उगवत्या सूर्याच्या प्रभेप्रमाणे सर्वत्र पसरत आहे.

-संजय सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *