ब्लॉग

मूर्तिपूजा विषयक बौद्ध संकल्पना

नेहमीच अज्ञानी टिकाकार बुद्ध प्रतिमेसमोर, मूर्तिपूजेप्रमाणे, आदर (श्रद्धा) व्यक्त करण्याच्या आचरणाला नाकारतात. त्यांच्यासाठी असे वर्तन वाईट समजले जाणारे आहे. परंतु, त्यांना एखाद्या गुरूला आदर करण्याचे महत्त्व जाणता येत नाही, ज्यांनी मानवतेला उदात्त धार्मिक जीवन कसे जगता येईल हे शिकविलेले आहे. त्यांना जाणीव नाही की, या मार्गाने बौद्ध लोक तथागत बुद्धाच्या, संबोधि, पूर्णत्व, महाप्रज्ञा आणि पवित्रता तसेच त्यांनी मानवतेला जी उदात्त सेवा (धम्मदेसना) दिलेली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असतात. या कारणांना समजून न घेतल्यामुळे (मूर्ती) ठेवल्याबद्दल बौद्धांची टिका करीत असतात.

बुद्ध प्रतिमेसमोर आदर व्यक्त करणे बुद्धधम्मात अपरिहार्य अशी बाब आहे का? जी व्यक्ती बौद्ध जीवनमार्गावर जगते त्याच्यासाठी बुद्धप्रतिमा आत्यावशक नाही. परंतु बुद्धप्रतिमेसमोर आदर व्यक्त करणे ही धार्मिक श्रद्धा व्यक्त करण्याचा एक अर्थपूर्ण आणि उपकारक असा प्रकार (मार्ग) आहे. हे समजणे अवघडच आहे की, एका सभ्य धर्माला नाकारण्यासाठी दुसरे लोक का हा विषय उचलून धरतात? काय बौद्ध लोक नैतिक तत्वांचे उल्लंघन करतात? किंवा दुसर्‍यांच्या सुखशांतीचा भंग करतात जेव्हा ते त्यांच्या गुरूच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करीत असतात.

तथागत बुद्धाने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक संस्कार व विधी (कर्मकांड) चू समर्थन केले नाही. तर धम्माचा प्रचार- प्रसार लक्ष केंद्रित करून सदाचरणाचा जीवनमार्ग सर्वांना दाखविला आहे. तथागतांनी त्यांच्या प्रतिमा (मूर्ती) उभारून त्यांची पूजा करावी असे सुद्धा अनुयायांना सांगितले नाही.

तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बर्‍याच वर्षांनी त्यांच्या अनुयायांना (बौद्धांनी) बुद्ध मूर्ती उभारल्या होत्या. मात्र ते केवळ आदराचे प्रतीक म्हणून! प्रतीमा तथागत बुद्धाच्या सर्वज्ञाचे (पूर्णत्वाचे) प्रतीक आहेत. जसे त्यांची शुद्धता , महाकरूणा आणि प्रज्ञा इत्यादी गुणविशेष जे सर्वच सुसंस्कृत लोकांकडून मोठ्या आदराने गौरविल्या जातात. काही झाले तरी बुद्ध प्रतिमा (मूर्त्या) ह्या माणसांना शक्य असलेल्या फारच सुंदर कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे. बरेच निपःक्षपाती अबौद्ध सुद्धा बुद्ध प्रतिमा जवळ बाळगतात कारण ते दाद देतात की, तथागत बुद्धाची प्रतिमा मनात परमशांतीची भावना निर्माण करू शकते. बुद्धमूर्तीकडे टक लावून पहाणे याला रोग (दुःख) निवारण मूल्य ( therapeutic value) सुद्धा आहे.