ब्लॉग

व्हिएतनाम मधील बौद्ध धम्म

व्हिएतनाम देशात हनोई शहराजवळील समुद्रकाठी हेलॉंग बे नावाचा परिसर आहे. येथील समुद्रात असंख्य छोटे मोठे डोंगर आहेत. टेकड्या आहेत. आणि त्यातील बहुतेक टेकड्यांवर चढता येणे अशक्य असल्याने ती बेटे चित्रविचित्र वाटतात.

तेथील एका डोंगरात निसर्ग निर्मित गुहा तयार झाल्या आहेत. जगभरातील पर्यटक त्या गुहा बघण्यात येतात. त्यामुळे या गुहा बघण्यासाठी तसेच व्हिएतनाम आणि कंबोडिया मधील बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी व्हिएतनाम देशात आलो आहे.

मागील दोन दिवसांपासून हनोई जवळील हेलॉंग बे सागरात बोटीने सफारी करून डोंगरावरील गुहा बघितल्या. कदाचित ती बौद्ध लेणी असावीत अशी शंका होती. पण तसे काही नसून लाखो वर्षांपासून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या त्या गुहा आहेत. प्रवास करताना हनोई शहरात काही बुद्ध मंदिरे पाहण्यात आली.

मुळात पूर्वी येथे कम्युनिस्ट राजवट होती. त्यामुळे सद्यस्थितीत महायान बुद्धिझम ३०% आहे. परंतु आता पुन्हा बुद्ध सगळीकडे पसरत आहे. व्हिएतनाम मधील दानांग शहरात प्रसिद्ध पॅगोडा आहे. तेथे तारा या बोधिसत्व मूर्तीचे शिल्प समुद्र किनारी आहे. तसेच संगमरवरी दगडाचे पाच डोंगर असून तेथे प्राचीन बुद्ध विहारे आढळतात. ती मात्र आवश्य बघण्याजोगी आहेत.

ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक संजय सावंत व्हिएतनाम मधील बौद्ध धम्माच्या अभ्यास दौऱ्यावर असताना.

भारतातील थेरवादी बौद्ध परंपरेचे आपण पाईक असल्याने महायान पंथातील देवी, बोधिसत्व, अवलोकितेश्वर, तारा यांच्या मूर्ती पाहताना बुद्धिझमला पूर्वेकडील व आग्नेयकडील देशात वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे याची खंत वाटते. संस्कृत मधून जेव्हा बौद्ध धम्माचे अनेक ग्रंथ भारत,तिबेट, चीनमध्ये तयार केले गेले तेव्हा त्यात भेसळ करण्यात आली.

पाखंडी संस्कृतीचा प्रभाव सुद्धा त्यावर पडला. निर्माण झालेल्या बौद्ध धर्मातील अनेक पंथानी सुद्धा त्यास हातभार लावला. व त्याच बुद्धिझमचा प्रसार पुढे कोरिया, जपान, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस देशात झाला. म्हणूनच इथला बुद्धिझम हा सत्य मार्गापासून थोडा भरकटलेला वाटतो. व त्याचेच प्रतिबिंब तेथील शिल्पावंर पडलेले आढळते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *