बातम्या

हरियाणात जाहीरपणे पहिल्यांदाच बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला

मुंबई : भन्ते अयूपाल यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून हरियाणा मध्ये पहिल्यांदाच बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला असल्याची माहिती दिली आहे. भन्ते अयूपाल यांच्या हस्तेच हरियाणातील पहिला बौद्ध विवाह संपन्न झाला आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की,आपल्या सर्वांसाठी एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद धम्म वार्ता.

साधारणतः हरियाणातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांसह मागील तीन वर्षांपासून काम करीत आहे. माझ्या लक्षात आले की, हरियाणातील जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या चळवळीला पूर्णपणे स्वीकारत आहे. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौध्द धम्म स्वीकारण्याचे धाडस करीत नाही.

संस्कृतीचा जुनाच संस्कार घराघरात दिसत आहे. तेथील विवाह अजूनही जुन्याच पद्धतीने होत आहेत. जयभीम तर मोठया अभिमान वाटावा असे म्हणतात पण बौध्द धम्म स्वीकारण्यास का तयार होत नाहीत. मुंबईतून व्यवसाय, नौकरी निमित्त तिथे स्थायिक झालेले माझे निकटचे धम्मसेवक उपासक आयु. संदेश मोहिते आणि आम्ही गेली काही वर्षे या धम्म संकल्पावर काम करीत आहोत. आणि शेवटी डिसेंबर २०१९ ला सुखद व सकारात्मक बदल झाला.

हरियाणातील प्रसिद्ध डॉ. महावीर बौध्द यांनी त्यांच्या मुलीचा विवाह बौद्ध धम्म पद्धतीने करण्याचा संकल्प केला. आयु. संदेश मोहिते यांनी स्थानिक सर्व जबाबदारी स्वीकारली अनेकांना हे सर्व नवीन होते. काहींनी विरोधही केला. डॉ महावीर बौध्द यांनी कुणाचेही विरोधी मत न जुमानता मंगल परिणय बौद्ध पद्धतीनेच होणार.

मी मुंबई वरून दिल्ली ते हरियाणा असा प्रवास करून पहिला जाहीर बौद्ध मंगल परिणय दारिका आयुष्यमाणिनी : स्वाती बौद्ध आणि दारक आयु. दक्ष यांचा संपन्न झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पहिला बौद्ध विवाह संपन्न करण्याचे भाग्य मला लाभले साधुवाद संदेश मोहिते आणि डॉ महावीर बौद्ध.

विवाह विधीची पद्धत आणि शांतता पाहून तीन वरिष्ठ अधिकारी यांनी लगेच तारखा बुक केल्या. आमच्या मुलांचे विवाह आता असेच बौद्ध पद्धतीने लावणार असा त्यांनी संकल्प जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *