बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध लोक मूर्तिपूजक आहेत?

बौद्धजन तथागत बुद्धांच्या मूर्तीची, स्मारकांची तसेच स्मृतीचिन्हांची आदरयुक्त भावाने पूजा/अभिवादन करतात. परंतु मूर्तीपुजकाच्या भावनेने नव्हे. बौद्धजन तथागत बुद्धाच्या मूर्तीची आणि त्यांच्या स्मारकांची तसेच स्मृतिन्हांची पूजा करताना या कल्पातील सर्वश्रेष्ठ, परमज्ञानी, अत्यंत परोपकारी आणि अपार करूणाशील पुरूषश्रेष्ठांचे केवळ स्मरण म्हणून, पूज्यभावनेने आदरांजली वाहतात.

सर्वच समाज कोणत्यातरी विशिष्ट गोष्टीमुळे महान मानल्या गेलेल्या स्त्री- पुरुषांची स्मारके आणि स्मरणचिन्हे जपून, संग्रह करून ठेवतात आणि त्याविषयी आदरबुद्धी बाळगतात. त्याचप्रमाणे बौद्धजन तथागत बुद्ध व त्यांच्या स्मृतिचिन्हाविषयी आदर बाळगतात.

कर्म- सिध्दान्तावर बौद्धांचा विश्वास असल्यामुळे ते कुणाची पुजा करून त्यामुळे आपल्या दुःखापासून मुक्ती मिळावी, अशी अपेक्षा करीत नसतात. ते स्वतःवरच आत्मविश्वास ठेवून स्वतःचे शुध्दीकरण करतात. कर्मसिध्दान्त त्यांना आशा, आत्मविश्वास, समाधान आणि नैतिक धैर्य प्रदान करतो. कर्मसिद्धान्त पूर्ण विश्वास असल्यामुळे ते अकुशल कर्मापासून अलिप्त राहतात.

तथागत बुद्धांनी पुजेअर्चेविषयी महापरिनिर्वाण सुत्तात ते म्हणतात की, सदोदित करीत असलेल्या पुजेने किंवा स्वतःच्या भक्तीने किंवा दुसर्याच्या भक्तीने, किंवा एखाद्या मूर्ती पुजेने नव्हे , तर केवळ आर्य आष्टांगिक मार्गाचा अवलंब करून पवित्र जीवन जगण्यानेच पुण्यलाभ होतो व मुक्ती मिळू शकते.

One Reply to “बौद्ध लोक मूर्तिपूजक आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *