देशात सध्या आरक्षणावरून अनुसूचित जातीच्या समाजाला टोमणे मारणाऱ्या तथाकथित मेरिटधारी लोकांसाठी ह्या वर्षीचा सीबीएसई १२ वीचा निकाल धक्का देणारा ठरला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातील अनुसूचित जाती समाजातील तुषार कुमार सिंग याने सीबीएसई १२ वी परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून १०० टक्के मिळविले आहेत. त्याचे आईवडील दोघेही प्रोफेसर असून संपूर्ण कुटुंब आंबेडकरी विचारधारेचे आहे.
तुषारने दोन वर्षापूर्वी १० वी च्या परीक्षेत ९७ टक्के मिळविले होते. तुषार पुढे दिल्ली विद्यापीठात बी.ए करून आयएएसची तयारी करणार आहे. तुषारच्या यशामुळे आंबेडकरी समाजात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. तुषारच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तुषारचे वडील डॉ. ओपी सिंग हे खुर्जा येथील एनआरसी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत तर आई किरण भारती जुनिअर कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत.

तुषार त्या समाजातला आहे, ज्यांच्यात योग्यता असूनही त्यांना आरक्षणवाला म्हणून हिणवलं जाते. विशेष म्हणजे सीबीएसई परीक्षेत आरक्षण नसते, त्या परीक्षेत तुषारने टॉप केले आहे. तुषार सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाण्याची तयारी करत असला तरी अनुसूचित जाती समाजातील लोकांकडून त्याच्याप्रती मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकदा सरदार पटेलांना बोलताना म्हणाले की, माझ्या समाजाला एकदा बरोबरीत येण्याची संधी तरी मिळू द्या बघा ते कसे पुढे निघून जातील. बाबासाहेबांचे ते वाक्य खरे होताना दिसून येत आहे. २०१५ मध्ये ‘टीना डाबी’ यूपीएससी मध्ये देशात पहिला येऊन तथाकथित मेरिटधारी लोकांचे तोंड बंद करून टाकले होते.
हाच खरा आंबेडकरांचा विचार ज्ञानरुपणे समाजासमोर घेऊन येईल.दलित समजाला अभिमानास्पद गोस्ट आहे