जगभरातील बुद्ध धम्म

बटकारा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला होता

पाकिस्तानात स्वात खोऱ्यात अनेक ऱ्हास झालेले स्तूप आहेत. इतिहासातील या मौल्यवान व पूजनीय स्तुपांबाबत त्यांना काही घेणेदेणे नाही. स्वतःच्या पूर्व इतिहासाची जाणीव नाही. खोदकाम करताना सापडलेल्या अनेक छोट्या बुद्धमूर्तीची तस्करी करण्यात ते पटाईत.

मिंगोरा जवळ असाच एक महत्वाचा ऱ्हास झालेला स्तूप आहे. त्याचे नाव बटकारा. हा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला होता. या स्तुपाचे अलीकडे म्हणजे १९५६ मध्ये इटालियन आर्किओलॉजिस्ट डोमोनिको यांच्या देखरेखीखाली पुन्हा खोदकाम करण्यात आले. तेथे सापडलेल्या नाण्यांवरून व मूर्तींच्या पेहेरावावरून Indo-Greek कलेचा संगम झाल्याचे आढळते.

स्तुपात सापडलेल्या अनेक वस्तू National Museum of Oriental Art या इटलीतील रोम शहरातील म्युझियम येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. हे म्युझियम खास गांधार शैलीतील पुरातन वस्तुसंबंधी प्रसिद्ध आहे. येथे खासकरून पाकिस्तानातील स्वात खोऱ्यातील स्तुपामधील आढळून आलेल्या वस्तूंचे जतन केलेले आहे.