चारपाच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तमीळ सिने इंडस्ट्रीतल्या सर्वात प्रतिष्ठित बीहाईंडवूडस अवॉर्ड फंक्शनमध्ये घडलेली घटना. समोर प्रेक्षकांमध्ये कमल हसन, हरिस जयराज, चिन्मयी, अँड्रीया, अनिरुध्द, हीपहॉप तमीळा, श्रुती हसन, नित्या मेनन सारख्या तमाम दिग्गज कलाकारांसह दस्तुरखुद्द साक्षात ए.आर.रेहमान बसलेला. आणी स्टेज वर कडक निळ्या कोटात, हातात हलगी संबळ गिटार घेऊन परफॉर्म करतायत ‘कास्टलेस कलेक्टीव्हज‘ हा आंबेडकरी हिपहॉप बँड.
प्रेक्षकांत बसलेले नामचीन अभिनेते, गायक, संगीतकार हा आक्रोश अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन पाहत होते. मुळात, हलगी संबळ घेऊन एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये सलग पंधरा मिनिटं आपल्या बेदकार संगीतातून आंबेडकर, सामाजिक न्याय व समतेचा एल्गार करणं हा किती रॅडीकल ऍक्ट आहे याची कल्पना तुम्ही करू शकता.
स्टेजवर आल्यावर ‘जय भीम अंथेंम, बाबासाहेब’ पासून सुरू झालेला त्यांची रॅपसिरीज जातीयतेवर प्रहार करत, कास्ट प्रिव्हलेज, डिस्क्रिमीनेशनवर भाष्य करते. शेवटी ‘इधक्का पेरियार पेरन नांग पिरंधो?’ समोर बसलेल्यांना हाभेदक सवाल करत, ‘कास्टलेस कलेक्टीव्ह, लेट्स स्प्रेड इक्वॉलिटी’ ही आरोळी देऊन थांबतो.
हे सिम्बॉलीजम आणि शोषितांचं सांस्कृतिक राजकारण उभं केलंय पा.रंजितने. हर एक मोठंमोठ्या प्लॅटफॉर्मवरून त्याला इतक्या ताकदीने जगापुढं मांडतोय तो उद्या जागतिक कला कार्यक्रमात मुठी आवळून जयभीमची घोषणा पाहिल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. कारण धिस इज नॉट अ मोमेंट, धिस इज ए मूहमेन्ट. ही एका नव्या आंबेडकर युगाची सुरूवात आहे.
गुणवंत सरपाते, चेन्नई
Good drive.
All the best.
J A Y B H I M .
🙏🙏🙏