डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरली नसती तर चळवळीची क्रांती घडलीच नसती. त्यांच्या क्रांतीच्या अनेक घटनांनी एक नवा इतिहास घडवला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली. आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन यानिमित्त… ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेने तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात […]
आंबेडकर Live
बाबासाहेबांवर आधारित असलेले हे २१ चित्रपट पाहिलात का?
1) 2000 – जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. 2) श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका […]
…म्हणून बाबासाहेबांनी निजामाच्या प्रलोभनांना नकार देत इस्लामचा मार्ग नाकारला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी […]
संसद भवनाच्या आवारात उभारलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला पंचधातूचा पुतळा आहे. बी.व्ही. वाघ यांनी हा पुतळा बनवलेला असून आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची रचना हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या […]
धर्मांतराबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
भारत देशाच्या हिताला धोका येईल अश्या प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा, एवढेच काय पण, “देशहितासाठी” माझ्या समाजाच्या प्रगतिवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ आली तर मी तसे करण्यास का-कु करणार नाही. (२५ ऑक्टोबर १९३५) धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे, हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे, जहाज एका बंदरातुन दुसर्या बंदराला […]
निजामाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीला खरंच मदत केली होती का?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निजामाच्या बाबतीत भूमिका अगदी स्वच्छ होती. त्यांनी म्हटले होते, पाकिस्तान अथवा हैदराबादेतील अनुसूचित जातींनी मुसलमान वा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवणे आत्मघातकीपणाचे ठरेल. निजाम हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याने अनुसूचित जातीच्या एकाही व्यक्तीने निजामाशी सहकार्य करून आपल्या जातीला कलंकित करू नये. निजामाविषयी डॉ.आंबेडकरांची स्पष्ट भूमिका असतानाही काही आंबेडकर द्वेषी लोकांकडून अर्धवट अभ्यासातून त्यांच्यावर […]
डॉ.आंबेडकरांचा ‘पोलीस ऍक्शन’ प्लॅन; निजामाला दुसरा पाकिस्तान निर्माण करण्यापासून रोखले
देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली हैदराबाद संस्थान अडकलेले होते. हैदराबाद संस्थानात आजचा मराठवाडा, तेलंगणा राज्य व कर्नाटकातील काही जिल्हे यांचा समावेश होता. हैदराबादला स्वतंत्र भारतात सामील करण्यासाठी हैदराबाद स्टेट काँग्रेस निजामाविरोधात संघर्ष करत होते. १० सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थानांवर भारत सरकार लष्करी कारवाई करणार असल्याचे निजामाला समजले होते. त्यानंतर […]
बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज भारतात व संबंध देशात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र या जयंतीची सुरुवात पहिल्यांदा पुणे शहरात जर्नादन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १ ९ २८ रोजी सुरू केली. महामानवाच्या जयंती दिनाच्या जनकाविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांच्या […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आवडते ग्रंथ कोणते?
मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजचे ग्रंथपाल “शांताराम रेगे” यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची छोटी मुलाखत घेतली होती आणि त्यांना प्रश्न विचारला “बाबासाहेब तुम्ही प्रचंड ग्रंथ वाचलेली आहेत, तुम्हाला आवडलेले ग्रंथ कोणते? वेळ कमी असताना सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना आवडत असलेल्या पुस्तकांची यादी सांगितली History (1) Cambridge – History of India (2) Lanepoole-History of Medieval India (3) Momsen-History of […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तके
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनाबद्दलचा आलेख त्यांच्याच शब्दात लिहून ठेवला आहे. अनेकांना तो उद्बोधक आणि प्रेरणादायी वाटेल. त्यांनी लिहिले आहे की २१/०७/१९१३ रोजी मी न्यूयॉर्कला पोहोचलो. पहिले चार-पाच महिने काहीच अभ्यास झाला नाही. परंतु एके रात्री मी अभ्यासापासून दुरावलो आहे हे माझ्या लक्षात आले. मग मीच माझ्या मनाला विचारले ‘कुटुंबातील प्रेमळ माणसांना हजारो मैल […]