आंबेडकर Live

दामोदर प्रकल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. […]

आंबेडकर Live

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मसाई पठाराची सहल

२५ डिसेंबर १९२६ ते ५ जानेवारी १९२७ अखेर नाताळच्या सुट्या असल्याने कोर्ट कचेऱ्या बंद होत्या. या कालावधित डाॅ.आंबेडकर, सी.ना.शिवतरकर व कापड व्यापारी गायकवाड यांचेसह विश्रांतीसाठी पन्हाळ्यात आले होते. येण्याआधी दत्तोबा पोवार व करवीर संस्थानाधिपती यांना पत्र लिहून पन्हाळा येथे राहण्याची व्यवस्था करणेविषयी कळविले. त्याप्रमाने पन्हाळ्यावरील संस्थानच्या तीन नंबरच्या बंगल्यात राहणेस त्यांना परवानगी मिळाली होती. कोल्हापूर […]

आंबेडकर Live

असं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं ‘राजगृह’

ज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये तेव्हाही कुतूहल होते, आजही आहे. कदाचित अनंत काळापर्यंत हे टिकून राहील. थॉम्पसन नावाचा एक फार मोठा इंग्लिश लेखक होऊन गेलाय… त्याने एकदा म्हटलं होतं की, […]

आंबेडकर Live

राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम रमाईस राजगृहामध्ये आणले होते

मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३०००, इतिहासावर २६००, कायद्यावर आधारित ५०००, धर्मशास्त्रावर २०००, चरित्रे १२००, इतर साहित्य ३०००, अर्थशास्त्र १०००, तत्व ज्ञान ६०००, युद्धशास्त्र ३००० व इतर ७९०० असा आकडा होतो. बाबासाहेब म्हणत, “अडाणी आई […]

आंबेडकर Live

‘फादर्स डे’ विशेष : माझा बाप दिल्लीतच आहे, त्यांचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांना विद्यार्थ्यांबद्दल विशेष काळजी वाटत असे. ते विद्यार्थ्यांना नेहमी योग्य सल्ला देत असत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी ते जागरुक असत. मला या गोष्टीचा चांगला अनुभव आला. १९५२ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. यास्तव इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून तिकीट मागावयास दिल्लीला सर्व पार्ट्याच्या कार्यकर्त्यांची फार गर्दी झाली होती. ७ फिरोजशहा रोडवर शेड्यूल्ड कास्ट […]

आंबेडकर Live

जागतिक संगीत दिवस विशेष: संगीत प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तन आणि बदलाची आमूलाग्र क्रांती केली. त्यासोबतच त्यांचं व्यक्तिमत्व हे विविधांगी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व रसिक वृत्तीचं होतं. आज जागतिक संगीत दिवस असल्यामुळे बाबासाहेबांच्या संगीत प्रेमाविषयी आपण जाणून घेऊया… संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. भोवतालच्या व्यापातापाच्या गर्दीतून बाहेर निघून संगीत ऐकावे असे त्यांना वाटायचे. केवळ संगीत ऐकावे एवढीच […]

आंबेडकर Live

कामगार उद्धारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एक खूप मोठा गैरसमज आजही बऱ्याच जणांना आहे आणि तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित आणि पददलित समाजासाठीच काम केले आहे. मात्र बाबासाहेबांनी शोषित, पीडित कामगारांच्या वेदनेला वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे आजही दुर्लक्षित आहे. बाबासाहेबांचे कम्युनिस्टांविषयी खूप चांगले मत नव्हते. त्यांना वाटे कि कम्युनिस्टांची धोरणे राजकीय स्वार्थापोटी असून ते कामगारांचा […]

आंबेडकर Live

डॉ.आंबेडकरांचा आणि माझा काय संबंध? असा कोणी प्रश्न केला तर त्यांना हे सांगा!

– महिलांना प्रसूतीच्या पगारी रजा मिळतात त्या आंबेडकरांमुळे – तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्याही शाळेत घालू शकता ते आंबेडकरांमुळे – तुम्ही तुमचा जोडीदार (मग तो/ती कुठल्याही जाती धर्मातील असो ) निवडू शकता आंबेडकरांमुळे – तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पटलं नाही तर घटस्फोट घेऊ शकता ते आंबेडकरांमुळे – तुम्ही घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करू शकता ते आंबेडकरांमुळे – महिला […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांचा सेल्फ लॉकडाऊन…हा प्रसंग होतोय सोशल मीडियावर व्हायरल

कोरोना ही वैश्विक समस्या आहे. जग थांबले आहे. आपल्या देशातही कोरोनाला रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. घरात काय करायचे? वेळ कसा घालवायचा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला ऑफिसमध्ये १४ दिवस कसे बंद केले होते. हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चांगदेव खैरमोडे […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांच्या मध्यस्थीमुळे होळकर घराण्यातील राजपुत्राचा आंतरधर्मीय विवाह…

इंदूरचे महाराजाधिराज सर राजराजेश्वर सवाई श्री.तुकोजीराव तृतीय होळकर तेरावे बहादुर यांनी कु.मन्सी मिलर या अमेरिकन युवतीशी विवाह करण्याचे ठरविल्याने त्यांच्या विवाहास धनगर समाजाने विरोध केला. यावरून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीत या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी धनगर समाजाची एक परिषद ४ मार्च १९२८ रोजी भरली होती. या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांची बाजू उचलून धरली…आणि या […]