ब्लॉग

चित्रपटातील बुध्द आणि बौद्ध स्थळांचे चित्रण

बुद्धांच्या जीवनावर आधारित जगातील पहिला चित्रपट भारतात तयार झाला याचा सार्थ अभिमान सर्वांना वाटला पाहिजे. चित्रपटाचे नाव होते “बुद्धदेव”. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९२३ मध्ये तयार केला होता. दुर्दैवाने याची रिळे उपलब्ध नसल्याने आपण हा पाहू शकत नाही. त्यानंतर दोनच वर्षांनी ब्रिटिश कवी सर एडविन अर्नोल्ड यांच्या “द लाईट ऑफ […]

ब्लॉग

डॉ.आंबेडकरांचे जळगाव जिल्ह्याशी होते विशेष नाते; २९ वेळा केला होता जळगाव दौरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या जळगाव जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली. जळगावच्या बहिणाबाई चौधरी कॅम्पस् कॉलेजात मुलगी तनिष्का हिची केमिकल इंजिनीअरिंगमध्ये अॅडमिशन घेण्याकरिता गेलो होतो. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे मुलीला प्रवेश मिळाला. जळगावात फिरताना मला बाबासाहेबांच्या जामणेर, शेंदुर्णी, आसोदा, सावदा येथील सभेचे स्मरण झाले. सेनू नारायण मेढे गुरुजी, मोतीराम महिपत पाटील, धनजी बिऱ्हाडे, देविदास […]

ब्लॉग

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस; ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन

सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य मिळाला. शाळेत त्यांचे पदकमल उमटले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुद्धा त्यांना प्राप्त झाले. आज, ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन त्यानिमित्ताने… सातारची माती कसदार आहे. या मातीत भीमराव आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक […]

ब्लॉग

22 प्रतिज्ञा हा कट्टरवाद, जातीयवादी लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले “सरंक्षण कवच”

आप पक्षाचे मंत्री राजेंद्र गौतम यांना बावीस प्रतिज्ञा साठी आपला राजीनामा देण्यास त्यांच्याच पक्षाने भाग पाडले, संविधान, बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेबांच्या विधानाचे सोयीने दाखले देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे खरे रूप आतातरी लोकांना कळायला हवे, संविधान आणि बाबासाहेब हे फक्त आपल्या सोयीनुसार “वापरण्या करता” उपयोगात आणले जातात, पण “स्वीकारण्या करता” जी विवेकबुद्धी लागते ती ह्यांच्या जवळ […]

ब्लॉग

बोधिसत्व पद्मपाणि आणि अजिंठा

भारतातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांना अंकित केल्याचे दिसून येते. बुद्ध पदाला पोहोचण्यापूर्वी अनेक जन्मात बोधिसत्व म्हणून जन्म घेतला पाहिजे असे म्हटले गेलेले आहे. अजिंठा लेणीमध्ये लेणी क्रमांक १ मध्ये बोधिसत्व पद्मपाणी यांचे भित्तीचित्र आहे. आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध पावलेले आहे. ज्याने हातात कमळ धरलेले आहे तो बोधिसत्व पद्मपाणि होय. […]

ब्लॉग

जाती आधारीत भेदभाव ऍपल कंपनी मध्ये सहन केल्या जाणार नाही; ऍपल कंपनीची भूमिका

ऍपल जगातली सर्वात मोठी कंपनी. 3 ट्रिलियन, म्हणजे भारताच्या संपूर्ण GDP पेक्षा अवघ्या 0.7 ने कमी मार्केट कॅपिटल ऍपल च आहे. या ऍपल ने आपल्या एम्प्लॉय कंडक्ट पॉलिसी मधे जातीय भेदभावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. इतर प्रकारच्या भेदभावासह जाती आधारीत भेदभाव सुद्धा आता ऍपल मध्ये सहन केल्या जाणार नाही. हा अंतरराष्ट्रीय पातळीवर जतिअंताच्या चळवळीचं मोठं […]

ब्लॉग

कसं मान्य करू की देश बदलत आहे? समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार?

स्वातंत्र्याचा सूर्य उगवून पंच्याहत्तर वर्ष झाली पण समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार? क्रांतिबा फुल्यांनी 1868 साली आपल्या वाड्यातील विहीर अस्पृश्यासाठी खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. 1950 साली संविधानात कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा दंडनीय अपराध ठरविण्यात आला. पण काल राजस्थानातील सुराणा (जि. Jalor) येथील घटनेने मन […]

ब्लॉग

बुद्ध सर्वांना सामावून घेणारा…..!

एक लहानशी मुलगी बुद्धाच्या मूर्तीवर पाय देऊन खांद्यावर चढतीये आणि त्याच वेळी तिचे वडील तिच्यावर ओरडतात असं दृश्य असलेला व्हिडिओ पाहिला…अवघ्या 25 सेकंदाचा तमिळ भाषेतला हा व्हिडिओ. सुरुवातीला या बाप-लेकीचा संवाद भाषेच्या अडचणीमुळे समजला नाही…मात्र, या पंचवीस सेकंदाच्या दृश्यांनी मनावर प्रचंड प्रभाव पाडला… बुद्धाच्या मूर्तीवर चढणाऱ्या मुलीला बघून बाप तिच्यावर ओरडत “तू खाली उतर देवावरून..!” […]

ब्लॉग

बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा, हिशोब मला लागत नाही….!

उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य त्यात ३० वर्षे शिक्षणात आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहीलेला अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबाना चळवळ आणि लेखनाला… त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, २३ ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष […]

ब्लॉग

पीपल्स एज्युकेशन सोसायटी : स्वातंत्र्य, बंधुभाव रुजविण्याचे कार्य

‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’, मुंबई या संस्थेची स्थापना ८ जुलै १९४५ रोजी केली. देशभर आणि मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्चशिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट आहे. याच ध्येयानुसार मुंबईत १९४६ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला सांगायला आनंद वाटतो, की अवघ्या चार वर्षांच्या अवधीत विद्यार्थ्यांची संख्या, देशी-विदेशी खेळ आणि शैक्षणिक […]