ब्लॉग

काय आहे ‘एक वही एक पेन’ अभियान?

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी जमतो. दरवर्षी हार-फुलं-मेणबत्त्या अर्पण केल्या जात असत. ते निर्माल्य दुसऱ्या दिवशी वाया जाऊन अस्वच्छतेचे कारण बनत होते. तसेच टाकाऊ असल्याने ते कसल्याही पुनर्वापरासाठी अयोग्य आहे. मुळात ज्या महामानवाने व्यक्तीपूजा अमान्य ठरवली त्याच व्यक्तीचे दैवतीकरण होताना दिसते. म्हणूनच ‘एक वही एक पेन’ ची […]

ब्लॉग

तमीळच्या प्रतिष्ठित अवॉर्ड फंक्शनमध्ये दिग्गज कलाकारांसमोर ‘आंबेडकरी हिपहॉप बँड’चा परफॉर्मन्स

चारपाच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तमीळ सिने इंडस्ट्रीतल्या सर्वात प्रतिष्ठित बीहाईंडवूडस अवॉर्ड फंक्शनमध्ये घडलेली घटना. समोर प्रेक्षकांमध्ये कमल हसन, हरिस जयराज, चिन्मयी, अँड्रीया, अनिरुध्द, हीपहॉप तमीळा, श्रुती हसन, नित्या मेनन सारख्या तमाम दिग्गज कलाकारांसह दस्तुरखुद्द साक्षात ए.आर.रेहमान बसलेला. आणी स्टेज वर कडक निळ्या कोटात, हातात हलगी संबळ गिटार घेऊन परफॉर्म करतायत ‘कास्टलेस कलेक्टीव्हज‘ हा आंबेडकरी हिपहॉप […]

ब्लॉग

बुद्ध समजण्यासाठी ज्ञान आवश्यक – दलाई लामा

जागतिक धम्म परिषद नुकतीच औरंगाबाद येथे २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान पार पडली. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध धर्मगुरू दलाई लामा आले होते. आपल्या उत्स्फूर्त भाषणात ते म्हणाले की ‘बुद्धाने कधीच म्हटलं नाही की मी निर्माता आहे. त्याने जे ज्ञान प्राप्त केले तसे ज्ञान कोणीही प्राप्त करून घेऊ शकतो. त्यांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गावरून […]

ब्लॉग

मध्यप्रदेशातील सांचीतील महाबोधी महोत्सव

मध्यप्रदेश राज्यात सांची येथील महाबोधी महोत्सवानिमित्त पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांनी तेथे धम्मयात्रा आयोजित केली होती. १९८७ साली प्रथम सांची पाहिल्यानंतर आता इतक्या वर्षांनी परत एकदा सांचीला भेट देण्याचा योग वरील संस्थेतर्फे जुळून आला. तेथील महोत्सव पाहिल्यावर अशोक राजाच्या राणीची नगरी विदिशा गाव, सतधारा येथील स्तुप, सोनारी स्तुप आणि विहार तसेच उदयगिरी लेण्या येथे सुद्धा […]

ब्लॉग

अभूतपूर्व जागतिक धम्मसोहळा आणि डॉ.हर्षदीप कांबळे

राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मोहत्सव समिती तर्फे समितीचे चीफ कॉर्डिनेटर IAS डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नागसेवन औरंगाबाद येथे ऐतिहासिक धम्मपरिषद झाली. ही आंतराष्ट्रीय धम्मपरिषद केवळ देशातच नाही तर विदेशात ही सकारात्मक ऊर्जेचा विषय बनली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना […]

ब्लॉग

सांचीचा महाबोधी महोत्सव – दरवर्षी होणाऱ्या महोत्सवाबद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

मध्य प्रदेश येथे भोपाळ जवळ सांची ठिकाणी इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात उभारलेला मोठा स्तूप आहे आणि तो सांचीचा स्तूप म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच बरोबर तिथे चेतीयागिरी नावाचा विहार श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने बांधलेला आहे याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि मुख्य म्हणजे या विहाराच्या तळघरात भगवान बुद्धांचे दोन अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश सुरक्षित […]

ब्लॉग

‘बुद्ध’ म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश – पुज्य दलाई लामा

अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. तुम्ही अगोदर स्वत: धम्माची पारख करा. परस्परांविषयी प्रेम बाळगा. सर्वधर्म समभाव यानुसार आपण चालले पाहिजे. भारत देश याचे एक उत्तम उदाहरण […]

ब्लॉग

डॉ.आंबेडकरांऐवजी ‘संविधान’ कुठल्याही पुढारलेल्या सवर्ण नेत्याने ड्राफ्ट केला असता तर…

अमेरिकेचं पाहुयात. जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतल्या तेरा वसाहतींनी ब्रिटिशांचं अधिपत्या उलथवून टाकलं. थॉमस जेफरसननं ह्या नव्या स्वतंत्र राष्ट्राचा जाहीरनामा लिहला. त्यात म्हटलं की ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल. ईश्वरानं सर्व माणसांना समान बनवलं. संविधान लिहल्या गेलं. जगाच्या पटलावर एक नवा देश म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावानं अस्तित्वात आला. पण ह्यात खूप मोठा पॅराडॉक्स होता. […]

ब्लॉग

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ गोटबाया राजपक्षे

श्रीलंकेत नवीन अध्यक्ष म्हणून गोटबाया राजपक्षे हे बहुमताने नुकतेच निवडून आले. त्यांचे वडीलबंधु महिंद राजपक्षे २००५ मध्ये अध्यक्ष असताना ते संरक्षण खात्याचे सचिव होते. त्यांच्या निवडीमुळे सर्व बौद्ध सिंहली नागरिकांना आनंद झाला आहे. कारण श्रीलंकेत छुप्यामार्गाने दहशतवाद पसरविणाऱ्यास चांगला धडा शिकविणारा कुणीतरी प्रमुख पाहिजे असे साऱ्यांना वाटत होते. भारत जसा आजही पाकिस्तानी दहशतवादाचा सामना करीत […]

ब्लॉग

“जागतिक वारसा सप्ताह” निमित्त…

१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभर युनेस्को “जागतिक वारसा सप्ताह” म्हणून साजरा करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व लोकांना विशेषतः तरुणांना आपल्या देशातील सर्व प्राचीन वारसा बद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. भारतातही या सप्ताहात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वारसास्थळां बद्दल जनजागृती अभियान […]