बुद्ध तत्वज्ञान

जातक कथा – प्रयत्नाचे फळ

वण्णुपथ जातक नं.२ आमचा बोधिसत्व काशीराष्ट्रामध्ये सार्थवाह कुळांत जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदां तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका साठ योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील रहात नसे. सकाळी पहिल्या प्रहरानंतर ह्या मैदानांतून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त […]

बुद्ध तत्वज्ञान

जातक कथा : हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये

अपण्णक जातक नं .१ प्राचीन काळी वाराणसीनगरांत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्या वेळी आमचा बोधिसत्त्व एका मोठ्या सावकाराच्या कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर पाचशे गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्वदिशेला जाई, आणि कधी की पश्चिमदिशेला जाई. एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्वाने परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली. त्याच वेळी […]

बुद्ध तत्वज्ञान

मरणाला सामोरे जाण्याची कला

भगवान बुद्धांनी अनेक सुत्तामध्ये सांगितले आहे की शरीर हे एके दिवशी रोगग्रस्त होणार आहे, एके दिवशी परिपक्व होणार आहे आणि नंतर त्याचा क्षय होणार आहे. थोडक्यात मृत्यू होणार आहे. पण ती एक मंगल घटना आहे. अमंगल असे काही नाही. नवीन जीवनाची सुरुवात आहे. परंतु त्याबाबत जनमानसामध्ये अनामिक भीती दिसते. त्याबाबत कोणीही बोलायला तयार नसते. अनेकांना […]

बुद्ध तत्वज्ञान

तथागत बुद्धांचा आपल्यासाठी अखेरचा संदेश काय होता?

सर्व संस्कार अनित्य आहेत , एवढे वस्तुस्थितिनिदर्शक विधान कोरडेपणाने, रूक्षपणाने वा अलिप्तपणाने भिक्खूपुढे ठेवून त्यांनी आपले श्वास थांबविले नाहीत. त्यांनी अखेरच्या श्वासांपूर्वी आणखी एक छोटेसे वचन उच्चारले. हे छोटेसे वचन केवळ तेथे उपस्थित असलेल्या भिक्खूसाठीच होते, असे नाही. ते वचन तथागतांच्या नंतर शेकडो वर्षांनी, असंख्य पिढ्या गेल्यानंतर आलेल्या तुम्हा – आम्हांलाही एका प्रसन्न प्रकाशाने उजळवून […]

बुद्ध तत्वज्ञान

दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय?

मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते. मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे […]

बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध

भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टिने ते एक मागासलेले युग होते. श्रद्धाळू लोक धर्मग्रंथावर विश्वास ठेवून आचार विधींचे आचरण करत होते. नैतिक विचारांना स्थान नव्हते. भगवान बुद्धांनी हे सर्व बदलले. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज जीवनावर अदभुत बदल घडून आला. सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. सदाचार प्रवृत्ती होण्यासाठी मानसिक […]

बुद्ध तत्वज्ञान

एही पस्सीको – या पहा आणि मगच विश्वास ठेवा

बुद्धिझम तत्वप्रणाली सर्व जगभर पसरली आहे. तो एक धर्म म्हणून नाही तर दुःखमुक्त जीवन जगण्याचा उच्चतम मार्ग आहे. पाश्चात्य देशात लोकांनी धर्म न बदलता विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आहे. राग-द्वेष, मोह-माया पासून मुक्त होऊन निर्वाणपदी पोहोचलेले आणि सर्व मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्धांनी स्वतःसाठी काही वेगळे स्थान निर्माण केलेले नाही. राजपुत्र असताना पायाशी लोळणाऱ्या सुखांना […]

बुद्ध तत्वज्ञान

सम्यक दान : दान पारमितेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान

त्याग आणि सेवा भावनेने स्वतः जवळची वस्तू किंवा धन दुसऱ्याला देणे यालाच दान म्हणतात. मानवी जीवनात दानाचे फार महत्त्व आहे. शरीर, मन आणि वाणीने दुसऱ्यांच्या सुख-शांती करता केलेला त्याग म्हणजेच दान होय. दान अनेक प्रकारे दिले जाऊ शकते. आजारी माणसाची मदत करणे, शिकणाऱ्याला पुस्तक देणे, फाटकी वस्त्रे अंगावर घालणार्‍याला वस्त्राचे दान देणे, भुकेल्याला भोजनाचे दान […]

बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठ भिक्खू ‘राष्ट्रपाल’ याची निस्पृहणीयता

भगवान बुद्ध कुरूराष्ट्रात प्रवास करीत असताना ‘थुल्लकोठीत’ नावाच्या शहरापाशी आले. तेथील रहिवासी त्यांची कीर्ती ऐकून ते सर्व त्यांच्या दर्शनाला गेले. नमस्कार करून, कुशल प्रश्न विचारून ते मुकाट्याने एका बाजूस बसले. त्यावेळी थुल्लकोठीतवासीयांना भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला. तेव्हा तरुण राष्ट्रपाल तिथे होता. त्याच्या मनावर त्या उपदेशांचा एकदम परिणाम झाला. बुद्धांप्रती अपार श्रद्धा दाटून आली. तेंव्हा त्याने […]

बुद्ध तत्वज्ञान

धम्म धारण करणे म्हणजेच बुद्ध उपदेशांना प्रज्ञेने पारखणे

मज्झिम निकाय या त्रिपिटकातील ग्रंथातील वत्थ सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे की जर एखादे मळलेले, डागाळलेले वस्त्र असेल आणि रंगाऱ्याने त्याला घेऊन कोणत्याही रंगात ते बुडविले तरीही त्याच्यावर चांगला रंग चढणार नाही. ते डागाळलेलेच राहील. कारण काय तर वस्त्र मलिन असल्याकारणाने त्यावरती पाहिजे तो रंग चढणार नाही. त्याचप्रमाणे चित्त जर विकारांने मलिन असल्यास त्याच्यावर […]