एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूना खालील प्रमाणे प्रवचन दिले. ‘भिक्खूनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हांस माहीत आहे काय? ‘भिक्खूनी’ नाही’, म्हणताच भगवंत बोलले, ‘तर मग मीच तुम्हांला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. ‘दुष्ट मनुष्य न विचारताच दुस-याचे दोष दाखविता आणि त्याला दुसऱ्या बद्दल विचारले तर मग बघायलाच नको, तेव्हा तर तो […]
बुद्ध तत्वज्ञान
जगात चार प्रकारची माणसे आढळतात; ‘सर्वोत्तम’ पुरुष कसा ओळखावा?
एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूना उद्देशून भगवान म्हणाले, ‘जगात चार प्रकारची माणसे आढळतात.’ पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वत:च्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुस-या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुस-याच्या हितासाठी झटतो. तिस-या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या हितासाठी झटतो पण दुस-याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या त्याप्रमाणेच […]
बोधिसत्व म्हणजे काय?
बोधी’ म्हणजे महान ज्ञान आणि ‘सत्त्व’ म्हणजे प्राणी. ‘बोधिसत्त्व’ म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल असा, बुद्धत्व प्राप्तीकरिता प्रयत्नशील माणूस, बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी राजकुमार सिद्धार्थाला बोधिसत्त्वच म्हणत असत. बोधिसत्त्वाला सतत दहा जन्मांपर्यंत ‘बोधिसत्त्व’ राहावे लागते. जन्म म्हणजे मानसिक परिवर्तन (जन्म म्हणजे कायेचा मृत्यू होऊन पुनःजन्म घेणे नव्हे) जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू […]
दिघनखा म्हणाला जगातील कोणतेही तत्त्वज्ञान मला तारू शकत नाही; तेव्हा बुद्धांनी त्याला हे उत्तर दिले
दिघनखा हा बुद्धशिष्य सारिपुत्त यांचा पुतण्या होता. सारीपुत्त यांनी जेव्हा भगवान बुद्ध यांच्याकडून उपसंपदा घेतली तेव्हा दिघनखाचा जळफळाट झाला. चुलता बुद्धांना शरण गेला हे त्याला रुचले नाही. तरूण वय असल्यामुळे दिघनका तावातावाने बुद्धांना भेटायला निघाला. दिघनखा जेव्हा ग्रिधकुट पर्वतावर गेला तेव्हा तेथील गुहेमध्ये बुद्धांसोबत सारिपुत्तही ध्यान साधना करीत होते. तेथे त्याने आपल्या मनातील खदखद बुद्धांना […]
बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठे महत्व!
बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख-दुख:त समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव, स्नेहभाव असणे […]
तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी, त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये
बुद्धाने करुणेला धम्माची इतश्री मानले नाही. करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम. बुद्ध त्याही पलीकडे गेले. त्यांनी मैत्रीचा विचार केला. मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्रांविषयी प्रेम. बुद्धाला असे वाटत होते की, माणसाची माणसांप्रती करुणा येथेच थांबू नये. माणसाने मनुष्यमात्रापलीकडे जावे, त्याने सर्व प्राणिमात्रांशी मैत्री जोडावी. जेव्हा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते, तेव्हा त्यांनी एका सुक्तात ही बाब […]
धम्म धर्मापासून (Religion) वेगळा कसा?
भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला धर्म (Religion) म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे. परंतु या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला (Religion) म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विषाद […]
जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते
एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ, पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसेनदीनेही स्वारीचा वृतान्त ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून […]
श्रावस्तीतील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या पर्णकुटीमध्ये भगवान बुद्धानीं दिलेला उपदेश!
श्रावस्तीतील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या पर्णकुटीमध्ये (आरामामध्ये) भगवान बुद्धानीं एकदा खालील प्रमाणे उपदेश केला– “भिक्खूंनो ! जे वर्तमानात दुःखद आहे आणि भविष्यातही दुःखद आहे त्याला अविद्ये मध्ये पडलेला अडाणी नीट जाणत नाही. तो त्यांचे सेवन करतो. त्याला सोडत नाही. त्यामुळे त्या माणसाचे अनिष्ट धर्म वाढतात व इष्ट धर्म क्षीण होतात. अज्ञ माणसाचे असे होत असते.” “भिक्खुंनो ! […]
जातक कथा : जेथे संपत्ती तेथे भय
अकिंचनाला भय कोठून. एकदा बोधिसत्त्व वयांत आल्यावर प्रापंचिक सुखें त्याज्य वाटून त्याने हिमालयावर तपश्चर्या आरंभिली. पुष्कळ काळपर्यंत फलमूलांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत जावे या उद्देशाने तो तेथून निघाला. वाटेत त्याला कारवानांचा तांडा सांपडला. त्यांच्या बरोबरच तो मार्गक्रमण करू लागला. रात्री एका ठिकाणी मुक्कामाला उतरले असता त्या व्यापा-यांना लुटण्यासाठी पुष्कळ चोर जमा […]