जगभरातील बुद्ध धम्म

झांजीबारचा बुध्दिझम ; आफ्रिकेत बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले

‘पेडगावचे शहाणे’ हा राजा परांजपे यांचा एक जुना मराठी चित्रपट आहे.( १९५२ ) त्यामध्ये “झांजीबार.. झांजीबार..”असे एक गाणे होते. शाळेत असताना १९७५ मध्ये तो दूरदर्शनवर पाहिला. हिंदी महासागरात बेट असलेल्या या आफ्रिकेतील देशाची गाण्यातून ओळख झाली. दीडशे वर्षांपूर्वी अनेक भारतीय विशेष करून गुजराथी व्यापारानिमित्त तेथे स्थायिक झाले. श्रीलंकन नागरिक सुद्धा तेथे नोकरी-धंद्यासाठी गेले आणि स्थायिक […]

जगभरातील बुद्ध धम्म

सिरिलंकेतील वैशिष्ट्यपूर्ण कलुतारा स्तूप

प्राचीन काळापासून स्तूपाचे बांधकाम हे भरीव करण्यात येत होते. बुद्धधातू आतमध्ये ठेवून त्याच्या सभोवताली गोलाकार दगडी बांधकाम किंवा विटांचे बांधकाम करून स्तूप उभारला जात असे. यासाठी मोठ्या प्रमाणावर विटा, दगड, माती लागत असे. अनेक बौद्ध देशातील पुरातन स्तूप असेच भरीव आहेत. त्याभोवती गोल प्रदक्षिणा घालून त्यास वंदन करणे अशी प्रथा सर्वत्र होती. मात्र सन १९५० […]

जगभरातील बुद्ध धम्म

स्वातखोऱ्यात आढळले २००० हजार वर्षांपूर्वीचे भव्य बौद्ध विहाराचे अवशेष

पाकिस्तानामध्ये स्वातखोऱ्याच्या उत्तर भागात मोठे बौद्ध विहार तसेच शैक्षणिक केंद्र उत्खननात नुकतेच उघडकीस आले. हे विहार दोन हजार वर्षांपूर्वी कुशाण राजवटीत बांधले गेले असावे असा कयास आहे. त्याकाळी कुशाण राजवटीचा अंमल आताच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताच्या मोठ्या भागात होता. स्वात खोऱ्यातील हे विहार पूर्वी १९३० मध्ये इटालियन पुरातत्त्ववेत्ता यांनी शोधले होते. परंतु त्यावेळी पूर्ण […]

जगभरातील बुद्ध धम्म

‘आबा सैब चेना’ या बौद्धस्थळावर सापडले स्तूप आणि विहाराचे अवशेष

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे संचालक यांनी स्वात खोऱ्यातील “आबा सैब चेना” या बौद्ध स्थळी नुकतेच उत्खनन चालू केले आहे. या स्थळी बौद्ध संस्कृतीचे असंख्य अवशेष सापडले आहेत. तसेच तेथील टेकडीखाली मोठा स्तूप आणि संघारामचे अवशेष दिसून आले. पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समद खान यांनी याबाबत सांगितले कि या स्थळी पहिल्यांदाच […]

जगभरातील बुद्ध धम्म

हजारो वर्षे जुना असलेला ”या” देशातील ”बोधिवृक्ष” अतिरेक्यांनी नष्ट केला

पाकिस्तानातील इस्लामाबाद शहराजवळ असलेल्या जंगल भागात एक मोठा पिंपळ वृक्ष मरगला टेकडीच्या पायथ्याशी होता. हा इस्लामबादचा भाग सेक्टर-७ असा ओळखला जातो. या पुरातन वृक्षाच्या फांद्या सगळीकडे झाकोळल्या होत्या. जशी काय मोठी वृक्षछत्रीच पसरलेली दिसत असे. इस्लामाबादचे रहिवासी या पिंपळवृक्षाबद्दल तसे अनभिज्ञ होते. तथापि आशिया खंडातील बौद्ध देशातून काही पर्यटक तसेच राजदूत व त्यांचे कर्मचारी येथे […]

जगभरातील बुद्ध धम्म

बुद्ध प्रतिमा असलेली हजारो वर्ष जुन्या एकात एक आठ संदुका निघाल्या आणि शेवटच्या संदुकमध्ये…

चीनच्या अधिपत्याखाली हियान प्रांतात ‘फुफेंग’ नावाचे राज्य आहे. तेथिल फामेन शहरात पुरातन बुद्ध विहार होते. चीन मधील हे सर्वात मोठे बुद्ध विहार संकुल असून एकेकाळी पाच हजार भिक्खुंचे वास्तव्य इथे होते. इ.स. पूर्व २०६ ते इ.स. २२० या काळात हॅन राजवटीत ते बांधले असल्याचा उल्लेख आहे. नंतरच्या सुई राजवटीत तेथे पुन्हा बांधकाम करण्यात आले. त्यागं […]

जगभरातील बुद्ध धम्म

हजारो वर्षापासून ”या” देशामध्ये बुद्धांचा जन्मोत्सव “कमलपुष्प कंदील उत्सव” म्हणून साजरा होतो

दक्षिण कोरियाचा Lotus Lantern Festival म्हणजेच “कमलपुष्प कंदील सण” याला त्यांच्या भाषेत “योओन ड्युगं हो” असे म्हणतात. हा प्राचीन उत्सव मोठा लोकप्रिय असून हजारो वर्षापासून तो साजरा केला जातो. दक्षिण कोरियातील शिला राजवटीपासून ( इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ ) बुद्धांचा जन्मोत्सव रंगीबेरंगी कंदील लावून साजरा करण्याची पध्दत सुरू झाली. मे महिन्यातील बुद्धपौर्णिमेच्या अगोदर […]

जगभरातील बुद्ध धम्म

म्यानमारचे ‘मंडाले’ – एक बौद्ध संस्कृतीचे शहर

म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र […]

जगभरातील बुद्ध धम्म

‘या’ धरणामुळे जवळजवळ पन्नास हजार पुरातन बौद्धस्थळे बाधित होणार

सर्व जगभर व आपल्या भारतात देखील धरणामुळे हजारो पुरातन धार्मिक स्थळे बाधित झालेली आहेत. त्यातली प्रमुख म्हणजे गुजरातमधील मेश्वोे धरणामुळे ‘देव नी मोरी’ हे बौद्ध स्तुप असलेले पुरातन स्थळ बाधित झाले आहे. तर आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणामुळे नागार्जुनकोंडा हे बौद्धस्थळ बाधित झाले आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या पाकिस्तान आणि चीन यांच्या डायमेर-भाशा या […]