जगभरातील बुद्ध धम्म

कॅनडातील ५० फूट उंचीची व २५ टन वजनाची सोनेरी बुद्धमूर्ती

कॅनडामध्ये अल्बर्टा या उपनगरात वेस्टलॉक येथील ध्यान केंद्राच्या प्रांगणात मागील आठवड्यात ५० फूट उंचीची व २५ टन वजनाची धातूची बुद्धमूर्ती नुकतीच उभारण्यात आली. या ध्यान केंद्राच्या आवारातील कमळावरील स्थापित बुद्धमूर्ती मानवी जीवनातील शांततेचे महत्व अधोरेखित करेल असे ध्यान केंद्राच्या व्यवस्थापकांनी म्हटले आहे. वेस्टलॉक ध्यान केंद्रात नियमितपणे ध्यान साधनेचे वर्ग चालतात. या बुद्धमूर्तीचा पुतळा चीन वरून […]

जगभरातील बुद्ध धम्म

हा जगातील सर्वात उंच स्तूप; भव्यदिव्य स्तूपाचा इतिहास जाणून घ्या!

‘फ्रा प्याथोम चेडी’ हा स्तुप थायलंडमध्ये असून जगातील सर्वात उंच स्तूप आहे. या स्तूपाची उंची १२७ मीटर असून त्याचा परिघ २३५ मीटर आहे. ‘फ्रा प्याथोम चेडी’ याचा अर्थ पवित्र स्तूप असा आहे. असे म्हणतात की सम्राट अशोक राजाने धम्मप्रसारासाठी सुवर्णभूमीला जे स्थविर पाठविले त्या मधील स्थविर ‘सोण’ प्रथम या जागी आले. व इथून धम्मप्रसारास सुरवात […]

जगभरातील बुद्ध धम्म

इंग्लंड मधील हा ओसाड किल्ला होणार बुद्ध विहार

ऑस्टिन किल्ला हा १८६३ साली इंग्लंड मधील प्लायमाऊथ येथे फ्रान्स पासून बचावासाठी इंग्रजांनी बांधला. सद्यस्थितीत हा किल्ला ओसाड पडलेला आहे. यास्तव स्थानिकांनी तसेच थाई कम्युनिटीने येथे बुद्ध विहार उभारण्याचे ठरविले आहे. सिटी कौन्सिल यांनी थाई ब्रिटिश बुद्धिस्ट ट्रस्ट आणि थाई बुद्धिस्ट कम्युनिटी यांना परवानगी दिली असून त्या अनुषंगाने इथे भिख्खूंना राहण्यासाठी किल्ल्यातील खोल्यांचा वापर करता […]

जगभरातील बुद्ध धम्म

१४०० वर्षांच्या या दुर्मिळ झाडाच्या सुवर्ण पानांचा वर्षाव बुद्धमूर्तीवर होतो

चीनच्या शांझी प्रांतातील झोग्नांन पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात गौनियन नावाचे बुद्धविहार आहे. याच्या आवारात १४०० वर्षाचा जुना ‘जिंगो’ बिलोबा (Ginkgo Tree) वृक्ष आहे. हिवाळ्यामध्ये या झाडाची हिरवी पाने पिवळीधम्मक सुवर्णा सारखी होतात. आणि मग त्या सुवर्ण पानांचा वर्षाव त्या विहाराच्या आवारातील बुद्धमूर्तीवर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये होतो. हा वृक्ष त्यांग राजवटीतील राजा लि शिमीन (ई.स. ६२६-४९) काळातला आहे. […]

जगभरातील बुद्ध धम्म

आश्चर्य! जागा अपुरी पडत असल्याने अख्ख बुद्ध विहार तीस मीटर सरकविले

चीनमध्ये शांघाय शहराच्या मध्यभागी ‘जेड बुद्ध विहार’ अतिशय प्रसिद्ध असून तेथे दर दिवशी जवळजवळ पाच-सहा हजार लोक दर्शनार्थ येतात. त्यामुळे नेहमी ते गजबजलेले असते. मूळ घर असलेली ही वास्तू विहारासाठी मालकाने १८८२ साली दान दिलीे होती. त्यानंतर तेथे म्यानमार मधून मौल्यवान संगमरवरी सफेद-पिवळसर पाषाणातील ध्यानस्थ बुद्धमूर्ती व दुसरी महापरिनिर्वाण स्थितीतील बुद्धमूर्ती स्थापित करण्यात आली. वाढत […]

जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानने दिला बुद्ध अस्थींचा करंडक; पवित्र अस्थी करंडकाची हत्तीवरून मिरवणूक

२०१६ मधील बुद्ध पौर्णिमेसाठी पाकिस्तानने धम्मराजिका स्तुपात सापडलेला बुद्धअस्थी करंडक श्रीलंकेला तात्पुरता दिला. श्रीलंकन अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी २१ मे २०१६ रोजी मोठ्या समारंभाद्वारे या पवित्र अस्थींचे पूजन केले आणि हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली. त्यानंतर हा करंडक जनतेसाठी दर्शनार्थ खुला केला. तक्षशिला हे प्राचीनकाळी बौध्दधम्माचे मोठे विद्यापीठ होते. येथील धम्मराजिका स्तुपाचे उत्खनन […]

जगभरातील बुद्ध धम्म

या बौद्ध लेणी संकुलात ७००० बौद्ध शिल्पे आणि १००० चित्रे

मेटीझीशान हे चीनमधील गंसू प्रांतातील एक बौद्ध लेणी संकुल (Buddhist Complex Maytszishan, Silk Road, चीन) आहे. इथे जवळजवळ ७००० बौद्ध शिल्पे आणि १००० चित्रे आहेत. कॉम्प्लेक्स अशासाठी म्हणायचे की तिथे संपूर्ण डोंगरामध्ये या लेण्या अतिशय सुबकपणे खोदलेल्या असून तेथे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी सुयोग्य लाकडी पायऱ्या आहेत. आता काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी धातूच्या पायऱ्या बसविण्यात आल्या आहेत. […]

जगभरातील बुद्ध धम्म

बुद्धांच्या जातककथांचा जगभर प्रवास

बुद्धांच्या जातक कथा या नुसत्याच कथा नाहीत तर मानवाने आयुष्य कसे चांगल्या रीतीने जगावं यांचे धडे या कथा देतात. सत्प्रवृत्ती अंगात कशी बाळगावी आणि पंचशीले पाळून जीवन कसे योग्य मार्गाने व्यतीत करावे हे जातककथा सांगतात. या जातक कथांचे भाषांतर जगात बहुसंख्य भाषेत झाले आहे. एकूण जातक कथा ५५० असून त्या बुद्धाच्या पुनर्जन्माच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगतात. […]

जगभरातील बुद्ध धम्म

जपानच्या या शहराचे नाव महाराष्ट्रातील ‘नालासोपारा’वरून पडले?

जपानच्या उत्तर भागात काही बेटे आहेत. तेथील एका बेटावर ‘सोपोरे’ नावाचे एक मोठे शहर आहे. या सोपोरे शहरामध्ये १९७२ साली हिवाळी ऑलिम्पिक भरविण्यात आले होते. तसेच इथे वर्षातून एकदा सप्टेंबरमध्ये स्नो फेस्टिवल भरला जातो आणि त्यावेळी दोन मिलियन प्रवासी येथे भेट देतात. या शहराबाबत एक गमतीदार गोष्ट जपानी भिक्खूनी सांगितली कि या शहराचे ‘सोपोरे’ हे […]

जगभरातील बुद्ध धम्म

दक्षिण कोरियाने दीड हजार वर्षांपूर्वीचा दगडांचा पॅगोडा लोकांसाठी पुन्हा खुला केला

दक्षिण कोरियात दीड हजार वर्षांपूर्वी बिकजे राजवटीत इकसन मिरौसाजी नावाचा दगडी पॅगोडा बांधला होता. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. तेथील सांस्कृतिक वारसा मंडळाने त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले. त्यानुसार २००१ मध्ये त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. हे काम जवळजवळ १९ वर्षे चालले. व चार दिवसांपूर्वी दिनांक ३० एप्रिल २०१९ रोजी हा दगडी पॅगोडा लोकांसाठी पुन्हा खुला […]