इतिहास

नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा असून तो स्तूप देशातील सर्व बौद्धांचे उर्जास्थान बनले आहे. धर्मांतर सोहळ्याला ६५ […]

इतिहास

‘मोहोंजो-दरो’ सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले, पण इथे प्राचीन बौद्धस्थळे

सिंधू संस्कृतीचे शहर म्हणून ‘मोहों-न्जो-दरो’ या पुरातन स्थळाचा अभ्यास लहानपणी आपण सर्वांनी शाळेत असताना केला. तेथील वास्तुरचना, नगररचना, सांडपाण्याची यंत्रणा आणि सापडलेल्या छोट्यामोठ्या टेराकोटा शिल्पाकृती (नर्तकी, अलंकारित स्त्री, मणी-माळा, आभूषणे, प्राणी इत्यादी) हे सर्व अप्रतिम होते. इ.स.पूर्व हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या सुनियोजित शहराचा जगभर गवगवा करण्यात आला. इथली प्राचीन संस्कृती ही सिंधू संस्कृती म्हणून […]

इतिहास

अग्रश्रावक सारिपुत्त यांचा लहान बंधू रेवत

भगवान बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त यांच्या कुटुंबाची माहिती ‘खदिरवनिय रेवत’ या सुत्तात मिळते. सारिपुत्त हे सर्व भावंडात वडील बंधू होते. त्यांच्या बहिणींची नांवे चाला, उपचाला आणि सिसुपचाला अशी होती आणि भावांची नांवे चुंद,उपासेन व रेवत अशी होती. ही सर्व नांवे थेरीगाथेच्या अठ्ठकथेत सापडतात. रेवत हा सर्वात लहान होता. वडील बंधू सारखा तो भिक्खू होऊ नये म्हणून […]

इतिहास

सिद्धार्थ गौतम यांनी ज्या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर प्राशन केली ती ‘रत्नागिरी शिळा’ सापडली

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक) २०१८ च्या सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान टाइम्सच्या पाटणा आवृत्तीत एक बातमी आली की बोधगया क्षेत्रात धर्मारण्य आणि मातंगवापी जवळ एक मोठी शिळा सापडली आहे. या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ गौतम यांनी ग्रहण केली होती. तसेच बुद्धांनी ज्ञानप्राप्ती पुर्वी जेथे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला ते मोहना […]

इतिहास

स्वतःला प्रजेचा सेवक मानणारा राजा – प्रियदर्शी राजा सम्राट अशोक

अशोकाची राजसत्तेविषयीची दृष्टीही अशीच विलोभनीय आणि असामान्य आहे. काळाची चौकट भेदून जाणारी अशी आहे. प्राचीन काळातले जगातले सारेच राजे स्वतःला प्रजेचे मालक समजत. तारणहार मानीत. राजसत्ता हे उपभोगाचं साधन मानलं जाई. राजसत्ता भोगण्यासाठीच असते. असाच जगातल्या साऱ्या राजाचा समज असे. सम्राट अशोक हा एकमेव अपवाद होता. तो स्वतःला प्रजेचा सेवक मानीत असे. राजसत्ता हे सेवेचं […]

इतिहास

सम्राट अशोका – जगातील सर्वश्रेष्ठ नृपती

एच.जी.वेल्स या ख्यातनाम ब्रिटिश इतिहासकाराने सम्राट अशोकाचे मूल्यमापन करताना प्रतिपादिले- “Amidst the tens and Thousands of the names of Monarchs that crowd the columns of history… the name of Ashok shines and shines alone almost like a Star.” मराठी सारांश असा की, “इतिहासाच्या परिच्छेदा परिच्छेदातून गर्दी करून असलेल्या शेकडो नव्हे, हजारो राजांच्या नावांमध्ये अशोकाचेच एकट्याचे […]

इतिहास

बुद्धाचा बामियान : तालिबानने फोडलेल्या बुद्धमूर्तीच्या ढिगाऱ्यात लाकडावर कोरलेली गाथा सापडली

अफगाणिस्तानातील हिंदुकुश आणि कोह-इ-बाबा या पर्वत श्रेणींच्या मधल्या सुपीक प्रदेशाला बामियान असे म्हणतात. बामियान येथे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या प्राचीन बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या. मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या बुद्ध मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. यापूर्वी १७ व्या शतकात औरंगजेबाने तोफेच्या गोळ्यांनी या मुर्त्या नष्ट करण्याचा प्रयत्न […]

इतिहास

बोधिवृक्षाचा इतिहास; वृक्षाचे उच्छादन व पुनर्जीवन

बोधिवृक्ष जगात सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक वृक्ष मानला जातो. त्याचा इतिहासही विचित्र घटनांनी भरलेला आहे. अडीच हजार वर्षापूर्वीच्या या पुरातन वृक्षाचे अस्तित्व नि पावित्र्य पूर्वीइतकेच आजही जसेच्या तसे आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी त्याच्या फांद्या तोडून नेऊन अनेक स्थळी त्याचा विस्तारही केला आहे. भगवान गौतमाच्या वेळेस या वृक्षाची एक फांदी श्रावस्तीच्या जेतवन बागेत महास्थविर आनंद याच्या हस्ते […]

इतिहास

ईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण

भारताच्या ईशान्य दिशेस असलेल्या आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला एप्रिल २०२१ मध्ये भेट देण्याचे ठरविले होते. तेथील बौद्ध मॉनेस्ट्री आणि अल्पसंख्याक असलेल्या ताई-खामती या बौद्ध समाजाची संस्कृती बघावयाची होती. परंतु वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अभ्यास दौरा रद्द करावा लागला. तरी त्यासंबंधी काढलेली माहिती वाचकांच्या माहितीसाठी संक्षिप्त स्वरूपात येथे देत आहे. भारतात आसाममध्ये ताई-खामती जमातींची संख्या ६० […]

इतिहास

वंगीस – प्राचीन भारताचा बौद्ध कवी

आयुष्यात सत्यधर्म सांगणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आयुष्य असेच भरकटत चाललेले असते. वंगीस ब्राम्हणाच्या बाबतीत असेच झाले होते. मृत पावलेल्या माणसाच्या कपाळावर टिचकी मारून त्याचा पुर्नजन्म कोठे झाला असेल हे तो सांगत फिरत असे. त्यामुळे राजगृहाच्या पंचक्रोशीत त्याचे नाव झाले होते. त्यावेळच्या ब्राम्हणांनी त्याचा उदोउदो केल्यामुळे वंगीस यांचे महत्व वाढले होते. एके दिवशी बुद्धांची […]