इतिहास

सम्राट अशोक राजाची ज्ञात नसलेल्या मुलीबद्दल जाणून घ्या!

बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. […]

इतिहास

भगवान बुद्धांचा चवथा वर्षावास – वेळूवन कलन्दक निवाप, भाग 7

भ. बुद्धांचा चवथा वर्षावास राजगृह येथील कलन्दक निवाप या वनात व्यतीत केला. हे वन वेळूवनाचा भाग असल्यामुळे याचे पालि साहित्यात नेहमीच वेळूवन कलन्दक निवाप असा उल्लेख केला आहे. उदा. महापारिनिब्बाण सुत्त मध्ये “रमणियो वेलुवने कलन्दकनिवापो”. याच वनात बुद्धांनी सिग्गलोवाद सुत्ताचा उपदेश दिला होता. या वर्षावासाच्या काळात, राजगृहाला एक श्रेष्ठी पुत्र उग्गसेन हा एक डोंबारीनीच्या प्रेमात […]

इतिहास

भगवान बुद्धांचा तिसरा वर्षावास – राजगृह, भाग 6

विनय पिटकात लिहिल्याप्रमाणे, श्रावस्तीचा श्रेष्ठी सुदत्त याने बुद्धांना वर्षावास साठी विनंती केल्यानंतर, बुद्धांनी त्याला सांगितले की वर्षावाशा शून्यागार मध्ये अथवा एखाद्या वनात जिथे भिक्खूसंघासाठी सोय होत असेल अशा ठिकाणी वर्षावास केला जातो. बुद्धांचा हा होकार समजून, सुदत्तने श्रावस्ती मधील जेत राजकुमारकडून त्यांचे वन हवे त्या किमतीला विकत घेतले. याचे खूप सुंदर वर्णन विनय पिटक आणि […]

इतिहास

भ. बुद्धांचा दुसरा वर्षावास – सितवन, राजगृह, भाग -५

राजगृह मध्ये बुद्ध वेळूवनात राहत. अनेकवेळा ते चंक्रमन व ध्यान करण्यासाठी गृधकूट डोंगरावर भिक्खूसंघासह जात. येथे अस्साजी यांची भेट सारीपुत्त यांच्याशी झाली होती व अस्साजी यांच्या वक्तव्यावर प्रभावित होऊन ते मोग्गाल्लन यांना घेऊन बुद्धांकडे आले. याच ठिकाणी दोघांची प्रवाज्या झाली. येथील सुकरखता गुहेत बुद्धांनी दीघनख सुत्त याच गुहेत दिले होते. वेळूवन मध्ये असताना बुद्धांचा लहानपणीचा […]

इतिहास

पहिले धम्मचक्रप्रवर्तन, पहिला वर्षावास – सारनाथ, भाग ४

उरुवेला (बुद्धगया) वरून इसीपतन मिगदाव वनात जाताना बुद्धांनी गयाचा मार्ग घेतला. वाटेत त्यांना एक आजीवक भेटला व त्याच्याशी वार्तालाप करताना बुद्ध त्याला म्हणाले “मी जीन आहे. बुद्ध आहे कारण मी सर्व अस्रवांचा, सर्व पाप धर्माचा नाश केला आहे”. ललितविस्तार या ग्रंथात नमूद केल्या प्रमाणे गया येथील सुदर्शन नागराज याच्या निवासस्थानी मुक्काम व भोजन घेतले. त्यानंतर […]

इतिहास

बुद्धत्त्वाकडे प्रवास…भाग ३

मज्झीम निकायातील अरिय परियेसन सुत्तात तसेच विनयपिटक यात उरुवेला येथे सिद्धार्थाच्या सहा वर्षे अतिशय कठोर ध्यान अभ्यासाचे वर्णन केले आहे. (उरुवेलाचे वर्णन करताना उदान या ग्रंथात भ. बुद्ध यांनी या स्थळाला “पटिसल्लान सारूप्पम” म्हणजेच ध्यानासाठी अतिशय अनुकूल जागा असा केला आहे.) सिद्धार्थ गोतमाचा प्रत्येक दिवस एक नवीन अनुभूती व प्रत्यक्ष ज्ञानाच्या समीप घेऊन जाणारा होता. […]

इतिहास

राजकुमार सिद्धार्थाचा गृहत्याग नंतरचा प्रवास – भाग २

या तरुण शाक्य राजकुमाराचे राजकारभारात मन वळविण्यात बिम्बिसार अपयशी ठरला. मात्र ज्ञान प्राप्त झाल्यानंतर राजगृहाला परत यावे अशी विनंती केली. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त यांचा आश्रम उरुवेलाच्या (सध्याचे बुद्धगया) रस्त्यावर आहे म्हणून सिद्धार्थाने तिकडे प्रयाण केले. आधी आलार कालाम आणि नंतर उद्दक रामपुत्त यांच्याकडे राहून त्यांनी शिक्षण घेतले. इच्छित ध्येय साध्य होत नसल्याचे पाहून […]

इतिहास

राजकुमार सिद्धार्थाचा गृहत्याग नंतरचा प्रवास – भाग १

आषाढ पौर्णिमेच्या रात्री राजकुमार सिद्धार्थाने गृहत्याग केला. कपिलवस्तु सोडल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी घोडा थांबिविला व कपिलवस्तुकडे घोडा वळवून,अनिमिष नेत्रांनी या नगरीचे शेवटचे दर्शन घेतले, त्या ठिकाणी नंतर “कंथक निवत्तन चेतिय” बांधण्यात आले. हे चैत्य फाहियान या चिनी बौद्ध भिक्खूने इ.स. ५व्या शतकात पाहिल्याची नोंद केली आहे. कन्नीन्घम यांनी या चैत्याचे स्थान सध्याच्या गोरखपूर पासून दक्षिणेकडे […]

इतिहास

अजिंठा लेणींतील १५०० वर्षांपूर्वी रंगवलेली चित्रे आजही का टिकून आहेत? इतिहास जाणून घ्या!

अजिंठा लेणींतील चित्रकारीमध्ये वापरलेले रंग हे निसर्गनिर्मित पाने-फुले, रंगीबेरंगी माती, दिव्याची काजळी, चुना यापासून तयार करत असत. ज्या लेणींमधील चित्रकारीमध्ये निळा रंग दिसून येत नाही, त्या लेणी या सर्व पाचव्या शतकापूर्वीच्या आहेत. आणि जेथे निळा रंग वापरलेला दिसून येतो, ती चित्रकारी ही पाचव्या शतकानंतरची आहे. कारण हा जो निळा रंग वापरला, तो इराण-आशिया मायनर येथून […]

इतिहास

तामिळनाडूतील पुथूर गावाजवळ सापडली बुद्धमूर्ती

सन २००० मध्ये तामिळनाडूमध्ये थिरुवरुर जिल्ह्यात पुथूर गावापाशी तिरूनेलिक्कवल रेल्वे स्टेशन जवळ टाकीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम चालू होते. तेव्हा ही काळ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सापडली. ही बातमी पुरातत्व विभागाचे बी.जांबूलिंगम यांना काही दिवसांनी कळली तेव्हा ते २५ कि. मी. सायकल चालवत त्या गावी पोहोचले. तेव्हा गावकऱ्यांनी बुद्धमूर्तीची स्थापना तेथील एका झाडाखाली केल्याचे दिसले. मूर्तीच्या कपाळावर व […]