१८६३ मध्ये सर अलेक्सझांडर कनिंघम यांनी मेजर मिड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितले. नंतर १८८० मध्ये, बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर सर ऍशली इडन यांनी बेग्लर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्यास सांगितले. उत्खननामध्ये अनेक प्राचीन शिल्प, नाणी, स्तंभ, शिलालेख सापडले जे महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले. सिंहली भिक्खू बोधिरक्षित यांच्या शिलालेखांवरून कळते कि या महाविहाराला सर्वात […]
इतिहास
महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग १
बुद्धगया (बोधगया) हे जगभरातील बौद्ध अथवा बुद्ध विचार मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धा स्थळ आहे. याच ठिकाणी राजपुत्र सिद्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांती ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्त्व प्राप्त झाले होते. जगातील अंतिम सत्य हे चार अरिय सत्य असून अरिय अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाण पर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी प्रतिपादले. बुद्धांच्या काळी बुद्धगयेचे नाव “उरुवेला” होते व ते […]
तथागत बुद्धांचे अंतिम शब्द…
तथागत बुद्धांनी आयुष्यमान आनंद यांना संबोधून म्हटले ‘कदाचित आनंद! तुमच्यापैकी काहींना विचार येऊ शकतो, येथे (आमच्याकडे) निघून गेलेल्या शास्त्याचा उपदेश (धम्म) आहे, आता आमच्यासोबत आमचा शास्ता (गुरू) नाही’ परंतु आनंद! याला आशाप्रकारे पाहू (जाणू) नका, मी जो धम्म आणि विनय सांगितला आहे, उपदेश केला आहे, आनंद! माझ्यानंतर तोच तुमचा शास्ता (गुरू) आहे. ‘जसे आनंद! आजकाल […]
सम्राट अशोक भारतातील सर्वश्रेष्ठ राजा असण्याचे हे कारण होते
सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत बुद्ध धम्माला अमर्याद उत्तेजन मिळाले. जवळ जवळ सर्व भारत खंड आणि वायव्यकडील काबूल-कंदाहार पलीकडील बराच प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता. महाराष्ट्राचा समावेश निश्चितच अशोकाच्या साम्राज्यात होत होता. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील देवटेक येथे अशोकाच्या शिलालेखांचे भग्नावस्थेतले काही तुकडे सापडले आहेत. अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्रातील रस्तिक, पेटनिक आणि भोज लोकात […]
किती ठिकाणी सापडले तथागतांच्या अस्थीचे करंडक?
गेल्या शंभर वर्षात पुराणवस्तुसंशोधकांनी तथागतांच्या अस्थी असलेले अनेक करंडक शोधून काढले आहेत. पण या जम्बुद्वीपातून बुद्धधम्माचा इतका लोप झाला होता की, त्या अस्थींचा स्वीकार करण्यास बरीच वर्षे एकही संस्था पुढे आली नाही. कपिलवस्तु जवळ अस्थी करंडक इ.स १८९८ साली डब्लू.सी. पेपे (William Claxton Peppe) यांनी कपिलवस्तु जवळ पिपिरिवाह किंवा पिप्रिवाह येथील विटांनी बांधलेल्या स्तूपांतून तथागतांच्या […]
राजगृहच्या वाटेवर सिद्धार्थासोबत हा प्रकार घडला
कपिलवस्तू सोडल्यानंतर सिध्दार्थ मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली. राजगृहच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसर्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला […]
महाराष्ट्र म्हणजेच महारठ् ठ” देश…?
सिलोन (श्रोलंका) मध्ये लिहिलेल्या पालि भाषेतील दीपवंस आणि महावंस या बौद्धांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात “महारठ् ठ” देशाचा उल्लेख आहे. पालि भाषेतील “महारठ् ठ” याचे संस्कृतात ‘महाराष्ट्र’ असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे. महावंस हा गृंथ इ. स. नंतर पाचव्या शतकात लिहीला गेला. दीपवंस त्याच्या बर्याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की, स्थविर […]