बातम्या

मध्यप्रदेशच्या मंत्री महोदया बौद्ध स्थळांच्या प्रचारासाठी परदेशात

थायलंडमध्ये २६ ऑगस्ट पासून “बुद्ध भूमी भारत – बौद्ध पदयात्रा” हे अभियान चालविण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेशचे पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वस्त निधी यांचे मंत्री श्रीमती उषा ठाकूर यांनी भाग घेतला. मलेशिया आणि कंबोडिया मध्ये देखील भारतातील बौद्ध स्थळांबाबतचा पर्यटन रोड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देखील मंत्री महोदया यांनी भाग घेतला आणि मध्य प्रदेश […]

बातम्या

मुसळधार पावसादरम्यान मोहेंजोदडोच्या भूमीत प्राचीन बुद्धाची मूर्ती समोर आली

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली असून मोहेंजो दारोचा इतिहास बदलणारी पुरातत्वशास्त्रीय महत्त्वाची मानली जाणारी प्राचीन धातूची वस्तू समोर आली आहे. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मोहेंजो दारोच्या डीके परिसरात बुद्धाच्या आकाराची धातूची वस्तू आढळून आली आहे. त्या वस्तूचे काळ आणि वर्ष निश्चित करण्यासाठी तज्ञांची मते मागवली जात आहेत. मोहेंजो दारोच्या पुरातत्व स्थळाच्या अगदी […]

बातम्या

मंदिरात सापडले बुद्ध शिल्प : मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले, पूजा थांबवली.

मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच पुरातत्व विभागाला कोट्टई रोड, पेरीयेरी व्हिलेज, सेलम जिल्ह्यातील थलायवेट्टी मुनिप्पन मंदिराच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचे निर्देश दिले होते, पुरातत्व विभागाने पुष्टी केल्यानंतर मंदिरातील मूर्ती भगवान बुद्धाच्या महालक्षणांचे चित्रण करते असे मत नोंदविले. मंदिरात यापुढील पूजा करण्यासही न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांनी निरीक्षण केले की हिंदू रिलिजिअस अँड चॅरिटेबल एंडॉवमेंट […]

बातम्या

सोळाव्या शतकातील बुद्ध प्रतिमा दाखविणारा रहस्यमय आरसा सापडला

सिनसिनाती आर्ट म्युझियम (सनसनाटी म्हणा हवेतर) अमेरिकेत असून ते १८८१ साली स्थापन झाले. नुकताच तिथल्या आशिया खंडातील पुरातन सामानामध्ये अडगळीत पडलेला सोळाव्या शतकातील ब्राँझ फ्रेम असलेला एक आरसा मिळाला. संग्रहालयाचे प्रमुख डॉ. सुंग मॅडम यांनी जेव्हा हा आरसा साफ केला आणि त्याची तपासणी करताना त्यावर मोबाईलच्या टॉर्चचा फोकस मारला तेव्हा त्यांना अदभुत दृश्य दिसले. प्रकाश […]

बातम्या

सन्नती स्थळाची होणार आता उन्नती; लवकरच ‘हा’महाकाय स्तूप उभा राहील

गेल्या वीस वर्षापासून दुर्लक्षित असलेले कर्नाटक राज्यातील जिल्हा कलबुर्गी मधील कनगनहल्ली येथील भीमा नदीच्या तीरी असलेले प्राचीन बौद्धस्थळ सन्नती आता नवीन कात टाकीत आहे. या स्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी ३.५ कोटीचा निधी मंजूर झाला असून स्तूप पुन्हा उभा करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. ASI चे विभागीय संचालक जी माहेश्वरी आणि मंडळ अधीक्षक निखिल दास यांच्या […]

बातम्या

ओरिसात सापडले तपुस्स आणि भल्लिक यांचे स्तूप

ज्ञानप्राप्ती पूर्वी बुद्धांनी सुजाताने दिलेल्या खीरचे सेवन केले होते याचे बौद्ध साहित्यात मोठे वर्णन आढळून येते. त्याचप्रमाणे ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी चार आठवड्याच्या ध्याना नंतर राजायतन वृक्षाखाली बसून तपुस्स आणि भल्लिक यांनी दिलेल्या मधुमिश्रित सत्तू पदार्थाचे सेवन केले होते हे ही तितकेच महत्वाचे आहे. खीर सेवनाने एकाग्रता साधून ज्ञानप्राप्तीचे लक्ष्य साधता आले तर मधुमिश्रीत सत्तू खाऊन […]

बातम्या

प्रा.दत्ता भगत यांच्या ‘माता रमाई आधारवेल’ नाटकाचे प्रकाशन  

प्रा. दत्ता भगत यांनी रेखाटलेली रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी ज्योती बगाटे यांचे प्रतिपादन नांदेड: माता रमाई ह्या केवळ बाबासाहेबांची सावली नव्हत्या तर प्रज्ञावंतच्या प्रेम आणि सहवासाने त्या देखील समंजस झाल्या होत्या. प्रा. दत्ता भगत यांनी नाट्यकृतीतून रेखाटलेली रमाई ही आंबेडकरी कार्यकर्त्यांना समजून घेणारी, त्यांना जीव लावणारी आहे. संकटसमयी कणखरता दाखविणारी नाट्यकृतीतील रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांनी केले. कल्चरल असोसिएशनच्या […]

बातम्या

प्रसिद्ध हिंदू मंदिराच्या छतावर १० व्या शतकातील दोन बुद्ध शिल्प सापडली

तेलंगणा राज्यातील जोगुलंबा जिल्ह्यातील आलमपूर येथील सूर्यनारायण आणि पापनेश्वर मंदिरांच्या महामंडपांच्या छतावर दोन बुद्ध शिल्पे कोरलेली आढळली. हा शोध महत्त्वपूर्ण आहे कारण आलमपूर हे मंदिर श्रीशैलमचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार मानले जाते. ते एक हिंदू धर्मातील शक्तीपीठ आणि नवब्रहेश्वर मंदिराचे स्थान देखील आहे. प्रसिद्ध इतिहासकार कालवश.बी.एस.एल. यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पुरातत्वशास्त्रज्ञ ई शिवनागिरेड्डी यांनी आलमपूरला भेट दिली […]

बातम्या

तामीळ महाकाव्य “मणीमेक्खलाई” चे भाषांतर होणार २० भाषेत

६ एप्रिल २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या चेन्नई आवृत्तीत बातमी आली आहे की ‘मणीमेक्खलाई’ या तामिळ पुरातन बौध्द महाकाव्याचे वीस भाषांमध्ये भाषांतर होणार आहे. हे वाचून आनंद झाला. आता लवकरच आशिया खंडातील बौद्ध देशांमधील अभ्यासक हे महाकाव्य त्यांच्या भाषेत वाचू शकतील. हे भाषांतराचे काम सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिल ( CICT) या संस्थेने परदेशी अभ्यासक, […]

बातम्या

बुद्धकालीन बावरी ब्राह्मणाच्या प्राचीन स्थळाचा लागला शोध; ३० वर्षांपासून पुरातत्ववेत्ते शोध घेत होते

भगवान बुद्धांच्या वचनाला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या संगितीमध्ये बऱ्याच सूत्रांची संहिता ठोकळमानाने तयार झाली. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या संगितीमध्ये संपूर्ण त्रिपिटक आकारास आले असावे. म्हणजेच बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ते सम्राट अशोक यांच्या काळातील तिसऱ्या धम्मसंगती पर्यंत त्रिपिटकाची रचना परिपूर्ण होत गेली. या त्रिपिटक साहित्यात एवढी प्रेरणादायी सामुग्री भरली आहे की सर्व संस्कृतीत त्याचे पडसाद उमटले जाऊन आजही […]