बातम्या

देशातील सर्वात उंच बुद्धाची मूर्ती ‘या’ राज्यात होणार; काम सुरु

बिहार राज्यात नवादा- हिसुआ रस्त्यावर देशातील सर्वात उंच बुद्धमूर्तीचे काम सुरु आहे. हे काम २०१७ पासून सुरु असून वट थाई नालंदा फाउंडेशनतर्फे ही बुद्ध मूर्ती तयार केली जात आहे. बोधगयाचे दीपक कुमार गौर हिसुआमध्ये भगवान बुद्धांची १०८ फूट उंच मूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत. बुद्धमूर्ती गया-नवादा रोडवरील हिसुआ रेल्वे क्रॉसिंगजवळ तयार करण्यात येत आहे. […]

बातम्या

अतिवृष्टीमुळे विशाखापट्टणम येथील थोतलाकोंडा बौद्ध स्तूप ढासळला

ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ आहे. हे एक पुरातन बौद्धस्थळ असून ते पुरातत्व खाते, आंध्रप्रदेश यांच्या अधिपत्याखाली आहे. या अगोदरही हा स्तूप ढासळला […]

बातम्या

औरंगाबाद (चौका) येथील ऐतिहासिक ‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’चे साक्षीदार व्हा!

‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’ ही एक मोठी धर्मपरिषद असून तिचा उद्देश चित्त एकाग्रता, करुणा आणि शांती ही भगवान बुद्धांची शिकवण जगभर पसरवणे हा आहे. ही परिषद ऐतिहासिक अशा औरंगाबाद शहरात भारतीय भिक्खू संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. तसेच ही परिषद श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर आणि आदरणीय गुरुवर्य दलाई […]

बातम्या

पुरातन स्थळांचे पावित्र्य जपा!

महाराष्ट्रातील पंधरा-सोळा मुलांचा ग्रुप बाईक वरून भूतानमध्ये गेला होता. तेथील थिम्पू ते पुनाखा या हिमालयातील रस्त्यावरील पर्वतराजित डोचुला पास आहे. या रस्त्यांवर १०८ स्तूप असून त्यांना स्थानिक भाषेत चॅर्तन म्हणतात. Much outrage in Bhutan by actions of these two highly insensitive and disrespectful regional tourists standing on a sacred Buddhist Stupa. This is one of […]

बातम्या

भारतीय दौऱ्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ‘महाबलीपूरम’ शहराची का निवड केली?

भारतीय दौऱ्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तमिळनाडूतील महाबलीपूरम येथे का आले? याबद्दल भारतातील जवळपास सर्वच माध्यमांत चुकीची माहिती सांगत आहेत. शी जिनपिंग हे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना भारतीय इतिहास चांगलाच ठाऊक आहे. भारतीय मीडिया त्यांचा संबंध मंदिराशी जोडतील किंवा इतर अंधश्रद्धा किंवा धर्माशी जोडतील पण खरं काही सांगणार नाहीत. शी जिनपिंग यांनी नेमकं महाबलीपूरम शहराला […]

बातम्या

९ वर्षात ५ लाख ३५ हजारांवर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ दान; दीक्षाभूमीवर उपक्रम

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशनने ९ वर्षांपूर्वी अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ दान देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वर्षी ५० हजार ग्रंथांचे दान करण्यात आले ९ वर्षात जवळपास ५ लाख ३५ हजारांवर ‘बुद्ध आणि त्यांचा […]

बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वेने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या आणि नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडीची एक फेरी सोडण्यात येणार आहे. […]

बातम्या

देशातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

हैद्राबाद येथील सेंटर फॉर दलित स्टडीजने (सीडीएस) संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे गुरुवारी अनावरण केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने डॉ आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळ्याचे प्रमाणपत्र देऊन त्याला ‘एका संग्रहालयात समाज सुधारकाचा सर्वात मोठा पुतळा’ ही पदवी दिली आहे. बोराबांडा येथील इमारतीत डॉ आंबेडकरांचा २७ फूट उंचीचा पुतळा तयार करण्यात आला […]

बातम्या

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान मोदी म्हणाले… आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला

आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे. याचबरोबर दहशतवादाविरोधातला संताप देखील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४ व्या सत्रात ते बोलत होते. India's contribution […]

बातम्या

‘दलित’ शब्द होणार हद्दपार! ‘अनुसूचित जाती’ किंवा ‘नव बौद्ध’ वापरण्याचे आदेश

दलित’ हा शब्द शासकीय कामकाजात वापरण्यावरून अनेकवेळा प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. उच्च न्यायालयांनी टीका, टिपण्या, सूचना जाहीर केल्या होत्या त्याचा आधार घेऊन राज्यशासनाने विविध विभागांच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचनांमध्ये ‘दलित’ शब्द वापरण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी ‘अनुसूचित जाती’ किंवा ‘नव बौद्ध’ असा शब्द वापरण्याचे आदेश देण्यात आले असून तसं परिपत्रकही महाराष्ट्र शासनाने […]