बातम्या

महापरिनिर्वाण दिन: ‘बाबासाहेबांना घरातूनच करा अभिवादन’; नवी नियमावली जाहीर

मुंबई: येत्या ६ डिसेंबर, अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर करोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी देखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई […]

बातम्या

भीमांजली : ६ डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तालविहार संगीत संस्था आणि जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँप प्रस्तुत ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ६ […]

बातम्या

लवकरच येतोय! तुमच्या हक्काचा जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲप; कधी होणार लॉन्च?

तंत्रज्ञानाच्या युगात युवा वर्गाला शॉर्ट व्हिडीओचे आकर्षण आहे. ही गरज लक्षात घेता विविध कंपन्यांनी आपली कला सादर करण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती बहुप्रतिक्षेत असलेल्या जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँपची. सोशल मीडियावर ॲप कधी लॉन्च होणार? यावर चर्चा होताना दिसून येत आहे. जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲपच्या टिझरचे लाँचिंग नुकतेच दुबई […]

बातम्या

दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज बोधगयेत ‘कठीण चीवरदान पर्व’

स्वतः कापड विणून, रंगरंगोटी करून एकाच दिवशी चीवर दान केले जाते त्याला बौद्ध धम्मात ‘कठीण चीवरदान’ म्हटले जाते. दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बोधगयेत महाबोधी वृक्षाखाली आज ३१ ऑक्टोबरला कठीण चीवरदान आणि विश्वशांतीकरिता विशेष प्रार्थनासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. इमानि मयं भन्ते कठीण चिवरानी सह परिवारानि भिक्खु संघस्स ओनोझयाम साधुनो भन्ते भिक्खुसंघो इमानि कठीण चिवरानी […]

बातम्या

श्रीलंकेतून बुद्धअस्थीचे भारतात आगमन; पण हा अस्थिकलश श्रीलंकेत कसा पोहचला?

श्रीलंकेहून तथागतांच्या अस्थीकलशाचे नुकतेच भारतात आगमन झाले. पवित्र बौद्धस्थळांवर जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. यावेळी लाखो लोकांनी त्याचे दर्शन घेत भावपूर्ण सुमनांजली वाहिली. बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाने भारताची भूमी कृतार्थ झाली, धन्य झाली. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धाचा अस्थिकलश भारतातूनच श्रीलंकेला गेला होता… महाकारुणिक बुद्धांच्या पवित्र अस्थींचे भारतात श्रीलंका एअरलाइन्सच्या खास विमानाने 20 ऑक्टोबरला आगमन झाले. लखनऊ विमानतळावर […]

बातम्या

नागपूरच्या मिलिंद मानकरांकडे बाबासाहेबांच्या दुर्मिळ साहित्याचा खजिना

नागपूर : संगणक ऑपरेटरची नोकरी करत बाबासाहेबांच्या प्रेमापोटी दुर्मिळ साहित्य संपत्ती जतन करणारा नागपूरचा एक अवलिया. नागपूर येथील गोपालनगरातील मनी लेआऊट मध्ये राहणारे मिलिंद मानकर यांच्याकडे १९४८ पासूनचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व प्रकारचे साहित्य आहे. त्यासोबतच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची दुर्मिळ माहिती सुद्धा त्यांच्याकडे असून त्यावर नेहमीच वृत्तपत्राच्या माध्यमातून लिखाण करतात. मिलिंद मानकर यांना बाबासाहेबांचे दुर्मिळ […]

बातम्या

जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲपची आवश्यकता का आहे? कधी लॉन्च होणार?

नागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात युवक युवतींना शॉर्ट व्हिडीओचे आकर्षण आहे. ही गरज लक्षात घेता विविध कंपन्यांनी युवक-युवतींना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आता या यादीत नवीन ॲपची भर पडली आहे. ‘ जयभीम ‘ ॲपची घोषणा सीईओ गिरीश वानखेडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. बहुचर्चित जयभीम शॉर्ट व्हिडीओ ॲप विषयी आवाज […]

बातम्या

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात सम्राट अशोक कालीन 2300 वर्ष जुना बौद्ध स्तूप सापडला

बुलढाणा जिल्ह्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. यामध्ये सम्राट अशोक कालीन एक बुद्ध स्तूप आढळून आला आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर उमटले जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात 2002 साली पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाच्या डॉ.भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात पुर्णा नदीलगत […]

बातम्या

दुबईत घुमला जयभीमचा नारा….सेलिब्रिटींच्या उपस्थितीत ‘जयभीम’ ॲपचा लोगो लाँच

दुबई : दुबई इंटरनॅशनल आयकॉन्स अवॉर्ड्स येथे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत गिरीश वानखेडे यांनी शॉर्ट व्हिडिओ ॲप ‘जय भीम’ चा लोगो लॉन्च केला. शनिवारी 25 सप्टेंबर रोजी या ॲपचा लोगो लाँच करताना यावेळी बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा, अदिती राव हैदरी, झरीन खान, संदीप धर, डेझी शाह यांच्या सारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते. या ॲपच्या मदतीने […]

बातम्या

‘ह्या’ कारणांमुळे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही

नागपूर: राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी अशोका विजयादशमीला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने २४ सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मुद्दा क्रमांक […]