जगभरातील बुद्ध धम्म

या बौद्ध लेणी संकुलात ७००० बौद्ध शिल्पे आणि १००० चित्रे

मेटीझीशान हे चीनमधील गंसू प्रांतातील एक बौद्ध लेणी संकुल (Buddhist Complex Maytszishan, Silk Road, चीन) आहे. इथे जवळजवळ ७००० बौद्ध शिल्पे आणि १००० चित्रे आहेत.

कॉम्प्लेक्स अशासाठी म्हणायचे की तिथे संपूर्ण डोंगरामध्ये या लेण्या अतिशय सुबकपणे खोदलेल्या असून तेथे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी सुयोग्य लाकडी पायऱ्या आहेत. आता काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी धातूच्या पायऱ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच या पर्वतराजीमध्ये मोठी बुद्ध शिल्पे कोरलेली आहेत. पूर्वी असंख्य भिक्खुं येथे राहून अध्ययन करीत असत. धम्माचा प्रसार करीत असत. येथील गवाक्ष यांना काचेची तावदाने लावून आतील कलाकुसर यांना उन्ह-पावसा पासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

3 Replies to “या बौद्ध लेणी संकुलात ७००० बौद्ध शिल्पे आणि १००० चित्रे

  1. To, dhammachakra team.
    Please develop dhammachakra app for Android.
    खूप लोकांना मदत होईल.
    सत्याचा मार्ग शोधायला.

    1. Thank You! लवकरच सुरु होणार आहे.

Comments are closed.