ब्लॉग

कंबोडियातील एका बौद्ध व्यक्तीच्या कोकोनट स्कुल विषयी जाणून घ्या!

कंबोडिया देशात ९६.९ % बौद्ध , २ % इस्लाम आणि ०.४ % ख्रिश्चन आहेत. तसेच इथे ५९,५१६ बौद्ध भिक्खू असून एकूण ४७५५ बौद्ध विहार आहेत. सुधारणे बरोबर इथेही कचर्‍याचा प्रश्न ज्वलंत होत चालला असून प्लास्टिकचा कचरा वाढत आहे. समुद्राच्या तळाशी, निसर्गरम्य डोंगर-कपारीत प्लास्टिकच्या वस्तूंचा पर्वत उंच होत आहे.

कोकोनट स्कुल

अशा वेळी कंबोडियातील एका बौद्ध व्यक्तीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून टाकाऊ प्लास्टिक वापरून एक शाळा उभी केली आहे. या शाळेचे नाव कोकोनट स्कूल असून येथे शिक्षणाची आवड असलेल्या सर्व थरातील मुलांना प्रवेश दिला जातो. शाळेचे संस्थापक निवृत्त हॉटेल मॅनेजर असून त्यांचे नाव ‘वंदे’ आहे. ते म्हणाले खेडेगावातील मुले इंग्रजी आणि कम्प्युटर शिक्षणाच्या अभावामुळे मागे राहतात. त्यासाठी ही विशेष शाळा मी बांधली आहे. ते पुढे म्हणाले येथे खूप कचरा आजूबाजूला होत होता. त्यातील टाकाऊ वस्तू वापरून भिंतीचा आडोसा केला आहे. छत केले आहे. व बाटल्यांचा बुचापासून फ्लोरिंग केले आहे. यामुळे कचरा परत रिसायकलिंग होऊन शाळा बांधकामाचा खर्च ही कमी झाला. तसेच मुलांना टाकाऊ वस्तु पासून नवीन वस्तू कशा बनवायच्या याचेही शिक्षण येथे दिले जाते.

कोकोनट स्कुल

येथील काही भिंती कार टायरला सफेद कलर देऊन तयार केल्या आहेत. कॉम्प्युटर कक्ष हिरव्या बाटल्यांनी बांधला आहे. टाकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या दोर्‍यांनी ओवून त्यांची भिंत व छप्पर तयार केले आहे. ही शाळा रोनेहे गावात असून मुख्य शहरापासून २८ किलोमीटर अंतरावरील सिल्क बेटावर आहे.

वंदे म्हणतात “कोणी येऊन बदल करेल याची वाट बघू नका. स्वतः बदला म्हणजे लोक तुम्हाला आपोआप येऊन मिळतील. हे जग आपल्यासाठी नाही पण निदान पुढच्या पिढीसाठी तरी प्रदूषण मुक्त व सुरक्षित राहिले पाहिजे.”

चॅनल न्यूज आशिया