बातम्या

लवकरच येतोय! तुमच्या हक्काचा जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲप; कधी होणार लॉन्च?

तंत्रज्ञानाच्या युगात युवा वर्गाला शॉर्ट व्हिडीओचे आकर्षण आहे. ही गरज लक्षात घेता विविध कंपन्यांनी आपली कला सादर करण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती बहुप्रतिक्षेत असलेल्या जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँपची. सोशल मीडियावर ॲप कधी लॉन्च होणार? यावर चर्चा होताना दिसून येत आहे.

जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲपच्या टिझरचे लाँचिंग नुकतेच दुबई येथे इंटरनॅशनल मीडिया व सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यानंतर हे ॲप ४ डिसेंबर २०२१ रोजी लॉन्च होणार होते, मात्र देशभरातून मिळणार प्रतिसाद पाहून २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनाच्या दिवशी लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. जयभीम ॲप हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व गिरीश वानखेडे आणि त्यांच्यासोबत उद्योजक तथा मीडिया क्षेत्रातील लोकांनी मिळून तयार केला आहे.

ॲपमधून मिळणार मनोरंजन आणि उत्पादनाचे साधन
जयभीम शॉर्ट व्हिडिओ मोबाईल ॲप हे आपल्या तरुणाईचे ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे एक माध्यम आहे. तसेच हे ॲप युवा वर्गातील कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देणार आणि त्यासोबतच उत्पनाचे साधन उपलब्ध करून देईल. मनोरंजनाच्या माध्यमातून जयभीम ॲप तुम्हाला स्वतःचा भागीदार सुद्धा बनवणार आहे.

२६ नोव्हेंबर रोजी लॉन्च ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महान राष्ट्राचे अमूल्य असे संविधान लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या लोकांना समर्पित केले होते. म्हणून संविधान दिनाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 2021 रोजी आपले जयभीम शॉर्ट व्हिडिओ मोबाईल ॲप संपूर्ण देशात लॉन्च करण्यात येत आहे.

ॲपमधील हे ५ फीचर्स तुम्हाला बनवतील स्टार

  • शॉर्ट व्हिडिओचा खजाना, येथे मिळतील तुमच्या आवडीचे व्हिडिओ.
  • आपली प्रोफाइल बनवा आणि जगभरातील लोकांशी कनेक्ट व्हा!
  • ॲपच्या फिल्टर्सचा वापर करून क्रिएटिव्ह व्हिडिओज बनवा.
  • निवडा, परफेक्ट मिक्स साठी, एका पेक्षा एक भारी ट्रेंडिंग ऑडिओ म्युझिक
  • आपला युनिक व्हिडिओ बनवा आणि पैसे सुद्धा कमवा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या व संविधानिक मूल्य जोपासणाऱ्या करोडो लोकांना एकत्रित येण्यासाठी मराठी हिंदी, इंग्लिश सह देशातील प्रमुख ८ भाषेत हा ॲप बनवण्यात आला आहे. असे आयोजकांनी सांगितलं आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपला जयभीम ॲप २६ नोव्हेंबर २०२१ रोजी तुम्ही स्वतः डाऊनलोड करा. तसेच आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा डाऊनलोड करायला सांगा. चला तर सर्वांनी एकत्र येऊ या, आपला जयभीम ॲप डाउनलोड करू या…