ब्लॉग

20 वर्षांपासून सुरू आहेत… डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली स्पर्धा परीक्षेचे वर्ग

जग हे स्पर्धेचे युग आहे यामध्ये टिकायचे असेल तर तुम्हाला स्पर्धा करावी लागेल स्पर्धेशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये काहीही शक्य नाही प्रागैतिहासिक कालखंड यांमध्ये स्वतःचं घरटं निर्माण करण्यासाठी नैसर्गिक रित्या चिमणीकडे बघून चोचीमध्ये आणलेल्या गवताचा काड्या आणि त्यापासून निर्माण केलेलं सुंदर घर मानवाच्या दृष्टिकोनातून अवलोकनिय ठरलं आणि त्याची प्रेरणा घेऊनच त्याने सुंदर घर बनवले हे घर बनवल्या नंतरच त्याला स्पर्धा नावाची संकल्पना उमजली.. तेव्हा पासून सुरू झालेला मानवाचा प्रवास आज चंद्रावरती जाऊन पोहोचलेला आहे.

यवतमाळ जिल्हा मागासवर्गीय जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे सर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी शिकलेल्या युवा तरुणांच्या बाबतची माहिती गोळा करून त्यांच्यासाठी आपण सर्वप्रथम काय करू शकतो तर राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वीस वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले नगर परिषद शाळेमध्ये सुरू केलेले गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे मोफत वर्ग होय या वर्गाच्या निमित्ताने आज शेकडो विद्यार्थी नोकरीवर लागले आहेत सर्वप्रथम हे वर्ग सुरू करत असताना ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षेच्या बाबतची फी भरण्याची ऐपत नाही अशा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता हे वर्ग सुरू करण्यात आले त्यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पासून तर क्लासवन अधिकाऱ्या पर्यंत लागणारे सर्व मार्गदर्शन तत्कालीन कार्यरत असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले.

जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे सर यांनी या वर्गाला सुरुवात करत असताना त्यावेळी आपले मार्गदर्शन करताना सांगितले होते की, हा राज्यातला पहिला सामाजिक दृष्टिकोनातून कुणाचीही मदत न घेता सुरू केलेला स्पर्धेत मोफत स्पर्धा परीक्षेचा पायलट प्रोजेक्ट आहे या प्रकल्पाला तुम्हालाच समोर न्यायचा आहे त्यामुळे बसलेल्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये असूच यापलिकडे काही दिसले नव्हते कारण मायेचा हात पाठीवर ठेवणारा पहिला अधिकारी त्या सुशिक्षित बेरोजगार शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. तो क्षण आजही आठवते की, मार्गदर्शन करीत असताना एक विद्यार्थी व्यक्त होत म्हणाला की, सर आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आम्ही पहिल्यांदाच पाहतोय कुणीतरी जिल्हाधिकारी म्हणून आम्हाला या ठिकाणी येऊन आमच्या करीता ही सोय करत आहे हा स्पर्धा परीक्षेचा वर्ग आजही अविरतपणे सुरू आहे या वर्गामध्ये असलेल्या मुली विवाह होऊन गेल्यात परंतु नोकरीवर लागल्यात आजही त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर स्वाभिमानाने त्या सांगतात डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांनी सुरू केलेले स्पर्धा परीक्षेचे वर्ग आणि त्यामधून आम्ही घडलो आजही आम्ही नोकरीवर आहोत कोणी तलाठी आहे तर कुणी आज मोठ्या हुद्द्यावर आहे.

याबाबत चर्मकार समाजामध्ये असलेली एक गरीब मुलगी अंजू तरवडे मराठवाड्यामध्ये तलाठी या पदावर कार्यरत आहेत तिला या मोफत स्पर्धा परीक्षेच्या वर्गाबद्दल ची प्रतिक्रिया विचारली असता पहिल्यांदा तिला अश्रू आवरता आले नाही.परंतु मी तलाठी म्हणून जेव्हा माझी निवड झाली तेव्हा डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांनी पित्यासमान आपल्याला केलेले मार्गदर्शन आणि त्यावेळेस आपल्याला सांगितलेला मार्ग हा किती मोलाचा ठरला ती आज स्वाभिमानाने सांगते.आजही पहिला पगार हातात आल्यानंतर साहेबांनी सांगितलेलं सामाजिक भान ती कधीही विसरू शकली नाही प्रथम आलेल्या वेतनामध्ये गरीब आणि गरजू कुटुंबांना आणि त्या कुटुंबातील मुलांना मोफत पुस्तकाचे वाटप करून मी त्यांच्या मार्गदर्शनाचा सार्थक केलेला आहे अशा हजारो अंजू आहेत समाजामध्ये की ज्यांनी या मोफत स्पर्धा परीक्षा वर्गाचा लाभ घेतला आणि आपल्या आयुष्याचं सार्थक केलं एखादं मार्गदर्शन उमद्या वयामध्ये मिळालं ही माणसाच्या आयुष्याचे यश हे आपल्या हातामध्ये असत.

डॉक्टर बाबासाहेबआंबेडकरांच्या स्वप्नांमध्ये असणार सनदी अधिकाऱ्यांचे पद यानिमित्ताने साकार झाल्या सारख आम्हाला वाटतं अशा कित्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी च्या प्रतिक्रिया याबाबत घेतली असता आजही क्षणोक्षणी या मंगलमय कार्याची आठवण विद्यार्थी कधीही विसरू शकत नाही. जंगल पहाडामध्ये आदिवासी विभागांमध्ये भटक्या समाजामध्ये असणाऱ्या गरजू होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हे मोफत स्पर्धा परीक्षेचे वर्ग आज यवतमाळ जिल्ह्यासाठी मोठे प्रेरणादायी ठरले आहेत येथूनच अनेक प्रशासकीय अधिकारी सुद्धा घडले आहेत.

मार्गदर्शन करण्यामध्ये नरेंद्र फुलझेले सर, प्रशांत मस्के सर, खोब्रागडे सर, श्रावण हर्डीकर सर सारख्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये सुरू असणारा हा मोफत स्पर्धा परीक्षेचा वर्ग आज अविरतपणे सुरू असून त्याची प्रेरणा मात्र कधीही आपण विसरू शकत नाही.

अंजु तरवरे, यवतमाळ