औरंगाबाद येथे २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. या ऐतिहासिक धम्म परिषदेला आदरणीय गुरुवर्य दलाई लामा आणि श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यानिमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी राज्याचे उद्योग सचिव तथा जागतिक धम्म परिषदेचे मुख्य आयोजक डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना एका पत्रकाराने आदरणीय दलाई लामा यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचारले असता आदरणीय दलाई लामा म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील बौद्ध धर्मातील पुनर स्थापने मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे 1956 ला त्यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्मात आणलेत समतेचा पुरस्कार करणारे आणि जातीवर आधारित भेदभावपूर्ण व्यवस्था नाकारणारे ते महान नेते होते त्यांनी जातीवर आधारित वरील वर्गाच्या लोकांनी खालच्या जातीवर राज्य गाजवणारी व्यवस्था कालबाह्य असल्याचे सांगितले.

मला भारतीय लोकशाहीचे कौतुक वाटते येथे स्वतंत्र आहे जगात पहिल्या क्रमांकाची ची लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये ते ते स्वातंत्र्य नाही मी मी स्वतःला भारतीय मानतो कारण मी गेल्या साठ वर्षापासून या देशात राहतो मला एका फ्रेंच पत्रकाराने विचारले असता मी त्यांना सांगितले होते, माझे मस्तिष्क भारतातील नालंदा विश्वविद्यालयाच्या तत्त्वज्ञानाने भरलेले आहे तर माझे भरण-पोषण या देशातील डाळ चपाती ने केले आहे. मी भारताचा पुत्र आहे (आय एम सन ऑफ इंडिया), असेही दलाई लामा म्हणाले.