बातम्या

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्योग आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत…

मुंबई, ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात‘ राष्ट्रनिर्मितीत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरही सोमवार दि.2, मंगळवार दि.3 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

देशाच्या जडणघडणीत डॅा बाबासाहेबांचे योगदान, कामगार मंत्री म्हणून डॅा. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबर औरंगाबादमध्ये झालेली तीन दिवसीय जागतिक बैाध्द धम्म परिषदेची माहिती डॅा. कांबळे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *