बातम्या

लॉकडाऊन मध्ये ही उद्योजकांना स्वस्थ न बसू देणारे विकास आयुक्त :- डॉ. हर्षदीप कांबळे

सद्या संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीमुळे लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटत आहे. असे जरी वाटत असले तरी आपले विचार कधीही थांबत नाहीत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रावर ही आर्थिक संकट येणार आहे. परंतु या आर्थिक संकटावर मात करून पुन्हा आपली अर्थव्यवस्था कशी सुव्यवस्थित करायची याची जबाबदारी इतर क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रावर ही तेवढीच आहे. यासाठी महाराष्ट्राचे विकास आयुक्त IAS डॉ. हर्षदीप कांबळे सर हे सतत विशेष प्रयत्न करीत आहेत.

दिनांक 17 मे 2020 रोजी ”लॉकडाऊन नंतरच्या व्यावसायिक संधी” तर दिनांक 24 मे 2020 रोजी इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी या विषयांवरती जीबीसी इंडियाच्या मार्फत लाईव्ह संवादात्मक चर्चा करीत आहे.

या संवादात्मक चर्चेतून उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक उद्योजकास भविष्यातील येणाऱ्या संधीची माहिती मिळत आहे. तसेच लॉकडाऊन दरम्यान आपल्या संपूर्ण बिझनेसचा आराखडा तयार करून लॉक डाऊन उठताच बिझनेस सुरू करता येऊ शकतो. यासाठी लागणारी संपूर्ण माहिती विकास आयुक्त IAS डॉ. हर्षदीप कांबळे सर आपल्याला सांगत असतात. शासनाच्या उद्योजकांसाठी, उद्योग क्षेत्रासाठी असलेल्या नवनवीन योजना आणि त्या योजनेचा लाभ उद्योजकांना कसा घेता येईल याबाबत ची इत्यंभूत माहिती आपल्याला ह्या लाईव्ह चर्चेतून मिळते.

ही लाईव्ह असणारी चर्चा आपण केवळ ऐकू शकतो असे नाही तर आपल्या मनात असलेल्या शंका आपण थेट विकास आयुक्तांना विचारू शकतो. त्यामुळेच याला आपण संवादात्मक चर्चा असे नाव दिले आहे. आपल्या मनातील प्रत्येक शंकेचे निरसन आपले विकास आयुक्त करतात आणि ते ही सातत्याने यामध्ये कोणताही खंड पडू न देता.

हे सर्व ते एक प्रशासकीय अधिकारी आहे म्हणून करत आहेतच परंतु याच बरोबर आपला समाज समाजातील प्रत्येक व्यक्ती ही स्वयंभू व्हावी. यासाठी ते sc/st/obc यांकरिता ही विशेष योजना आखत आहेत. उद्योजक हा विशिष्ट वर्गाचाच असू शकतो ही मानसिकता खोडून काढून सामान्य माणूसही उद्योजक बनू शकतो. केवळ त्यामध्ये त्याच्या इच्छाशक्ती ची गरज आहे बाकी आपले विकास आयुक्त डॉ. कांबळे सर आणि प्रशासन त्यांना शासनाच्या चौकटीत राहून लागणारी प्रत्येक मदत करण्यास सक्षम आहे.

GBCINDIA2020 च्या माध्यमातून गेले सलग 2 रविवार लॉकडाऊन नंतरच्या उद्योगातील संधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगाच्या संधी या विषयावर संवादात्मक चर्चा घेत आहेत. येत्या रविवारी म्हणजेच लॉक डाऊन 4 चा शेवटचा दिवस

दिनांक 31 मे 2020 रोजी, सायंकाळी 7:30 वाजता, सूक्ष्म व लघु उद्योग शासकीय योजना आणि पॅकेज या विषयावर आधारित संवादात्मक चर्चा विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे सर आपल्याशी करणार आहेत. या आधीचा भाग 1 आणि भाग 2 ला तरुण वर्गाचा आणि उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे तेव्हा सूक्ष्म आणि लघु उद्योगातील योजना आणि पॅकेजेस जाणून घेण्यासाठी आपण भाग 3 मध्ये ही आपला सहभाग नोंदवा आणि या संवादात्मक चर्चेत आपणही सहभागी व्हा.

आपण आपला नवीन उद्योगधंदा सुरू करून उद्योगाकडून समृद्धीकडे वाटचाल करूयात.

अधिक माहितीसाठी www.gbcindia2020.in या संकेतस्थळावर भेट द्या.

आपले विनीत
Gbc india 2020