बुद्ध तत्वज्ञान

दिघनखा म्हणाला जगातील कोणतेही तत्त्वज्ञान मला तारू शकत नाही; तेव्हा बुद्धांनी त्याला हे उत्तर दिले

दिघनखा हा बुद्धशिष्य सारिपुत्त यांचा पुतण्या होता. सारीपुत्त यांनी जेव्हा भगवान बुद्ध यांच्याकडून उपसंपदा घेतली तेव्हा दिघनखाचा जळफळाट झाला. चुलता बुद्धांना शरण गेला हे त्याला रुचले नाही. तरूण वय असल्यामुळे दिघनका तावातावाने बुद्धांना भेटायला निघाला. दिघनखा जेव्हा ग्रिधकुट पर्वतावर गेला तेव्हा तेथील गुहेमध्ये बुद्धांसोबत सारिपुत्तही ध्यान साधना करीत होते.

ग्रीद्धकूट पर्वताचे छायाचित्र

तेथे त्याने आपल्या मनातील खदखद बुद्धांना ऐकविली. व त्यांचे ऐकून न घेता म्हणाला ” माझा असा दृष्टिकोन आहे की जगातील कोणतेही तत्त्वज्ञान मला तारू शकत नाही.” तेव्हा बुद्धांनी त्याला उत्तर दिले की “हे ब्राह्मणा, तुझा हा दृष्टिकोन सुद्धा तुला तारू शकत नाही.” स्वतःच्याच वाक्याचा विरोधाभास ऐकून दिघनखा गप्प झाला. काय बोलावे हेच त्याला सुचेना. स्वताचे अज्ञान आणि झालेला गर्व त्याला स्वतःला कळून आला. मात्र त्याची विवेक बुद्धी शाबूत असल्याने त्याने बुद्धांचे पुढील सर्व बोलणे ऐकले.

बुद्धांनी त्याला अहंकाराचे दमन करणे, आसक्तीचा उच्छेद करणे, तृष्णेचा क्षय करणे कसे श्रेष्ठ आहे हे उपदेशिले. त्यामुळे श्रेष्ठ फलाची प्राप्ती होते हे सांगितले. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन हे सांगितले. व ते मिळविण्यासाठीचा अष्टांगिक मार्ग समजावीला. दिघनखाची पूर्वजन्माची पारमिता थोर असल्याने तेथेच तो ध्यानसाधना शिकला व स्त्रोतापन्न स्थान प्राप्त केले.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

4 Replies to “दिघनखा म्हणाला जगातील कोणतेही तत्त्वज्ञान मला तारू शकत नाही; तेव्हा बुद्धांनी त्याला हे उत्तर दिले

Comments are closed.