भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे दलित समाजासाठी एक मोठा उत्सव असतो. १४ एप्रिलच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा बाबासाहेबांचा जन्मदिवस असून भारतातील आता प्रमुख उत्सव झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षणापासून भारतासह जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
भीम जयंती संपूर्ण विश्वात विशेषत: भारतात व्यापक प्रमाणात साजरी करण्यात येते. भारताच्या प्रत्येक राज्यात, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील लाखों गावांत साजरी केली जाते. भारतीय समाज, लोकशाही, राजनीती इत्यादी क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खोलवर प्रभाव पडलेला आहे.

भीम जयंती साजरी करणारे काही प्रमुख देश
भारत, अमेरीका, ऑस्ट्रिया, बहरीन, ब्राजील, डेनमार्क, बांग्लादेश, मिस्र, जर्मनी, ग्वाटेमाला, हाँग काँग, इंडोनेशिया, स्पेन, स्विझरलॅड, तंजानिया, संयुक्त राजशाही (ग्रेट ब्रिटेन, लंडन), युक्रेन, कॅनडा, हंगरी, इराक, आयरलंड, सउदी अरब, दक्षिण आफ्रिका, जपान, मेडागास्कर, मंगोलिया, नेपाळ, ओमान, फ्रांस, श्रीलंका, सेशेल्स, दक्षिण सूडान, म्यानमार, कुवैत, आस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूजीलंड, थायलंड, चीन, पाकिस्तान, दुबई, कैलिफोर्निया, सैन फ्रांसिस्को इत्यादी देशात आंबेडकर जयंती साजरी करतात.
जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत दर वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असल्याचे दिसते. विदेशात नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी गेलेले आंबेडकरी बांधव जगभरात डॉ आंबेडकरी विचारांचा प्रसार करीत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे आकर्षण जगभरात वाढत आहे.
Kya Columbia university me bhi es saal dr .Sahab ki jayanti manai is rahi hi