आंबेडकर Live

डॉ.आंबेडकरांचा आणि माझा काय संबंध? असा कोणी प्रश्न केला तर त्यांना हे सांगा!

– महिलांना प्रसूतीच्या पगारी रजा मिळतात त्या आंबेडकरांमुळे

– तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्याही शाळेत घालू शकता ते आंबेडकरांमुळे

– तुम्ही तुमचा जोडीदार (मग तो/ती कुठल्याही जाती धर्मातील असो ) निवडू शकता आंबेडकरांमुळे

– तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पटलं नाही तर घटस्फोट घेऊ शकता ते आंबेडकरांमुळे

– तुम्ही घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करू शकता ते आंबेडकरांमुळे

– महिला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मागू शकतात ते आंबेडकरांमुळे

– महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करू शकतात ते आंबेडकरांमुळे

– प्रत्येकाला समान मतदानाचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे

– प्रत्येकाला न्यायालयात दाद मागण्याचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे

– कामाचे तास 14 वरून 8 झाले आंबेडकरांमुळे

– आजारी असल्यास पगारी रजा मिळाल्या आंबेडकरांमुळे

– रविवारची सुट्टी मिळाली आंबेडकरांमुळे

– विम्याचं कवच मिळालं आंबेडकरांमुळे

– एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ची स्थापना झाली आंबेडकरांमुळे

– किमान वेतन मागण्याचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे

– अप्राईझल मागण्याचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे

– कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– कुठल्याही देवाची उपासना करण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– देवाला नाकारण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– भारतात कोठेही राहण्याचा, प्रवास करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– हक्क न मिळाल्यास आंदोलन करण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– हव्या त्या उमेदवाराला, हव्या त्या पक्षाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– कोणीही असलात तरी निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– घटनेत कालानुरूप बदल करता येऊ शकतो तो आंबेडकरांमुळे

– नवीन कायदे करता येऊ शकतात ते आंबेडकरांमुळे

– ज्या बँकेच्या मार्फत देशाची अर्थव्यवस्था चालते त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आंबेडकरांमुळे

– देशात सर्वदूर वीज पोहचू शकते ती आंबेडकरांमुळे

– देशात विविध मोठं मोठी धरणे तयार झाली आंबेडकरांमुळे

– प्रत्येकाला संपत्ती जमवण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे

– वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची संधी मिळाली आंबेडकरांमुळे

– मोदी एका दिवसात देश लॉकडाऊन करू शकले ते आंबेडकरांमुळेच

आणि बरंच काही आंबेडकरांमुळे…

– राहुल गायकवाड यांच्या फेसबुक वॉलवरून…