आंबेडकर Live

बाबासाहेबांच्या मध्यस्थीमुळे होळकर घराण्यातील राजपुत्राचा आंतरधर्मीय विवाह…

इंदूरचे महाराजाधिराज सर राजराजेश्वर सवाई श्री.तुकोजीराव तृतीय होळकर तेरावे बहादुर यांनी कु.मन्सी मिलर या अमेरिकन युवतीशी विवाह करण्याचे ठरविल्याने त्यांच्या विवाहास धनगर समाजाने विरोध केला. यावरून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीत या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी धनगर समाजाची एक परिषद ४ मार्च १९२८ रोजी भरली होती.

या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांची बाजू उचलून धरली…आणि या आंतर धर्मीय, आंतरराष्ट्रीय विवाहास पाठींबा दिला. या परिषदेस बाबासाहेबांचे सहकारी रावसाहेब बोले हेही उपस्थित होते. बाबासाहेबांच्या मध्यस्थी आणि पाठींब्यामुळे या परिषदेत धनगर समाजानेही या विवाहास पाठींबा जाहीर केला. तुकोजीराव तृतीय होळकर यांचा जन्म २६ नोव्हेंबर १८९० रोजी महेश्वर येथे झाला.

होळकर घराण्यातील शिवाजीराव होळकर याचे ते पुत्र आणि उत्तराधिकारी होते. ३१ जानेवारी १९०३ रोजी ते राजा झाले, त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते. त्यांचे शिक्षण इंदूर मधील डॉली कॉलेज मध्ये झाले, तर आयसीसीचे शिक्षण त्यांनी डेहराडून येथे पूर्ण केले. २७ मे १९७८ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे पॉरिस (फ्रांस) येथे निधन झाले.

यशवंत भंडारे, लातूर