आंबेडकर Live

बाबासाहेबांचे टॉबी, मोहिनी आणि पिटर या पाळीव कुत्र्यांवर विशेष प्रेम!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाळीव प्राण्यांचीदेखील फार आवड होती. विशेषत: त्यांना ‘कुत्रा’ हा प्राणी फार आवडायचा. कारण कुत्रा हा एक इमानदार व प्रामाणिक प्राणी आहे. म्हणून हा प्राणी त्यांना फार आवडायचा. त्यांना कुठेही एखादा चांगला कुत्रा दिसला तर ते त्याला घरी घेऊन यायचे. मुंबईमध्ये बाबासाहेबांनी ‘टॉबी’ नावाचा एक कुत्रा पाळलेला होता. तो त्यांचा अत्यंत आवडता कुत्रा होता .

या टॉबीविषयी सांगताना बाबासाहेबांचे सहकारी बळवंतराव वराळे लिहितात, ‘टॉबी, बाबासाहेबांचा एक आवडता कुत्रा होता. बाबासाहेब टॉबीवर मुलाप्रमाणे प्रेम करीत. ऑफिसला किंवा घरी आल्यावर जर टॉबी दिसला नाही तर बाबा बेचैन होत असत. कारण टॉबी हा बाबासाहेबांचा एक अत्यंत विश्वासू, असा शरीरसंरक्षक व सहचारी होता. अहोरात्र टॉबी बाबांच्या सहवासात असायचा. ऑफिसमधून बाबा घरी निघाले तर टॉबी वाटाड्याप्रमाणे त्यांच्या पुढे असायचाच… ‘बाबासाहेबांचे या कुत्र्यावर फार प्रेम होते.

बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये असताना ‘पिटर’ नावाचा एक विदेशी जातीचा कुत्रा पाळला होता.

ना.रा.शेंडे याबाबत एक आठवण सांगताना म्हणतात, “एके दिवशी त्यांचा कुत्रा काही खाईना, काही पिईना. बाबासाहेब फारच अस्वस्थ झाले. हवे ते इलाज केले. त्याला हृदयाशी कवटाळून करुण शब्दांत ते म्हणाले, “अरे काय झालं तुला? तुझा हा सत्याग्रह कशासाठी आहे? हे उपोषण कशासाठी? सांग बाबा, सांग. “बाबासाहेबांचे डोळे पाणावले. आपला प्रेमळ विश्वासू कुत्राच काही खातपित नाही म्हणून तेही दोन दिवस उपाशीच राहिले आणि तिस-या दिवशी सकाळी जेव्हा त्या कुत्र्यानं दुधाबरोबर पाव खाल्ला तेव्हा बाबासाहेब आनंदून गेले. प्राणिमात्रावरील ही ती उदात्त दया,निष्ठा

बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये असताना ‘पिटर’ नावाचा एक विदेशी जातीचा कुत्रा पाळला होता.

एके दिवशी टॉबीचा पंजा एका दरवाजामध्ये सापडला व तो जखमी झाला. तेव्हा बाबासाहेबांनी त्याला दवाखान्यात नेले. त्याची चौकशी करण्यासाठी ते दिवसातून दोन वेळा दवाखान्यात जायचे. पुढे तो आजारी पडला आणि मरण पावला. त्याच्या मृत्यूची बातमी जेव्हा बाबासाहेबांना समजली तेव्हा ते मोठमोठ्याने रडू लागले. नंतर बरेच दिवस ते उदास राहिले.

दिल्लीमध्ये असताना बाबासाहेबांनी ‘मोहिनी’ नावाची एक कुत्री पाळली होती. ही कुत्री विदेशी जातीची होती. बाबासाहेबांचे स्वयंपाकी सुदाम गंगावणे या कुत्रीबाबत सांगतात, “ साहेबांकडे एक इंग्लिश कुत्री होती. तिचे नाव साहेबांनी लाडाने ‘मोहिनी’ ठेवले होते. ती फारच लाघवी होती. साहेब तिचे फार लाड करीत. संसदेव्यतिरिक्त बाहेर जाताना ते तिला नेहमी आपल्या सोबत घेऊन जात असत.

सकाळी बाबासाहेबांची उठण्याची वेळ झाली की, ती शयनकक्षात जाऊन त्यांच्या आजुबाजूला घुटमळत राही. अनेकदा साहेब स्वतः तिला आजुबाजुला फिरवून आणीत. संसदेत जाण्यास साहेब निघाले की, मोहिनी पायात घुटमळत सोबत यायचा हट्ट धरी, गाडीत जाऊन बसे. बाबासाहेब तिला मुलीप्रमाणे समजावीत. संसदेतून साहेब परत आल्याची गाडीची चाहूल लागल्याबरोबर ती धावतच जात असे व पोर्चमध्ये कुईकुई करीत उड्या मारत असे. साहेब गाडीतून उतरेपर्यंत तिला धीर नसे. शेपटी हलवीत ती गाडीच्या दारावर उड्या मारीत असे. उतरल्यावर साहेब तिला प्रेमाने उचलून घेत.

बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये असताना ‘पिटर’ नावाचा एक विदेशी जातीचा कुत्रा पाळला होता. तो देखील त्यांचा अत्यंत लाडका कुत्रा होता. हा पीटर दररोज पहाटे बाबासाहेबांच्या अभ्यासिकेत जाऊन त्यांच्या पायाजवळ बसत असे. बाबासाहेबांनी अशी अनेक कुत्री पाळलेली होती. चांगल्या जातीच्या कुत्र्यांची त्यांना फार आवड होती

संदर्भ :
समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर – पृ २९२
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सांगाती – पृ १०३

One Reply to “बाबासाहेबांचे टॉबी, मोहिनी आणि पिटर या पाळीव कुत्र्यांवर विशेष प्रेम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *