आंबेडकर Live

धर्मांतराबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

भारत देशाच्या हिताला धोका येईल अश्या प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा, एवढेच काय पण, “देशहितासाठी” माझ्या समाजाच्या प्रगतिवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ आली तर मी तसे करण्यास का-कु करणार नाही. (२५ ऑक्टोबर १९३५)

धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे, हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे,
जहाज एका बंदरातुन दुसर्या बंदराला नेन्याकरीता नावाडयाला जेवढी पुर्वतयारी लागते तेवढीच पुर्वतयारी धर्मांतराकरिता करावी लागणार आहे. (जनता – २० जून १९३६)

धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती करावयास आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे आपणास साधले तर आपल्याबरोबर देशाचा… इतकेच नव्हे जगाचाही उध्दार होणार आहे. (१५ ऑक्टोबर १९५६)

खरे तर बुद्धधम्माच्या पुनरुत्थानाचे कार्य भारतात उशिरा सुरु केल्याबद्दल मला अपराध्यासारखे वाटत आहे. परंतु तरीही मला आशा आहे की, जी माझी माणसे आपल्या ऐशोआरामाला तिलांजली देतील आणि प्रामाणिकपणे माझे अनुसरण करतील ती माणसे भारतात बुद्धधम्म प्रसारित करण्यास मनःपुर्वक संघर्ष सुरु ठेवतील, मला तसा विश्वास आहे. (प्रबुद्ध भारत – १७ नोव्हे १९५६)