बातम्या

डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या महत्त्वाच्या घटनेकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधले – उत्तम कांबळे

डॉ हर्षदीप कांबळे सर यांनी नुकतेच ”दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट” याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले होते. करोनाचे एवढे मोठे संकट राज्यावर आले असताना माणसांना वाचविण्यासाठीची सरiची धडपड आणि बौद्ध लोकांनी एकत्रित येऊन सर्वांना मदत करून दान पारमितेचे पालन करा असे त्यांचे आवाहन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक बौद्ध बांधवांतून प्रतिक्रया येत आहेत. या मध्ये सन्मानीय उत्तम कांबळे साहेब, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक तथा ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, यांनी डॉ कांबळे सर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा : दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट : मनोगत – डॉ हर्षदीप कांबळे

उत्तम कांबळे यांची प्रतिक्रिया : ज्येष्ठ आणि समाजाभिमुख अधिकारी हर्षदीप कांबळे यांनी बौद्ध समाजाच्या कल्याणासाठी, त्यांच्यात परिवर्तन घडवण्यासाठी मांडलेला विचार केवळ अलौकीक असाच म्हणावा लागेल.

भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे या समाजात सर्व प्रकारचे परिवर्तन घडवण्याची एक निसर्गदत्त जबाबदारी आपल्यातील पुढारलेल्या, शहाण्या, नोकरदार घटकांवर आहे. डॉ. कांबळे यांनी या महत्त्वाच्या घटनेकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आपण राहतो तो समाज सुंदर करायचा असेल तर या समाजाच्या चेहर्‍यावर व्यवस्थेने तयार केलेली आर्थिक, सामाजिक कुरूपता दूर करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यातूनच आपल्यासाठी एक सुंदर समाज तयार होणार आहे. डॉ. कांबळे यांनी आपल्या प्रस्तावाला अधिक व्यापक स्वरूप द्यावे व समाजाच्या हितचिंतकांनी त्यांना सर्व प्रकारचा पाठिंबा द्यावा.

– उत्तम कांबळे
(पूर्वाध्यक्ष मराठी साहित्य संमेलन)