ब्लॉग

#HappyBirthday : डॉ हर्षदीप कांबळे आणि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती

१२४ वी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुबई मधून काही सामजिक संस्था मिळून गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जयंती साजरी करूया असे ठरविण्यात आले. कारण भारताची राज्य घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेली असताना सुद्धा भारताच्या या गेट ऑफ इंडियावर बाबासाहेबांचा पुतळा तर सोडा संविधानाची प्रस्तावना सुद्धा नाही. म्हणून त्या ठिकाणी जयंती साजरी करावी असे ठरविले त्यावर भरपूर अडचणी येत होत्या , त्यावेळी मा डॉ. विजय कदम सर यांनी सर्व परमिशन मिळवून दिले व आमचा उत्साह द्विगुणित केला. त्यावेळी १२४ किलोचा केक देऊन डॉ. हर्षदीप कांबळे सर यांनी आम्हाला आश्चर्यचकित केले.

त्याच वेळी डॉ.कांबळे सरांबरोबर माझी पहिली भेट झाली . त्यानंतर माटुंगा फाय गार्डन येथे निखिल मेश्राम सरांच्या घरी सरांनी आमची पहिली मिटिंग घेऊन आपल्याला डॉ. बाबासाहेबांची 125 वी शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंती याहून अधिक भव्य दिव्य साजरी करायची आहे असे सांगितले आणि यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंगचे आयोजन करण्यास सांगितले.

मग सरानी आमची पहिली मीटिंग माटुंगा फाय गार्डन मा.निखिल मेश्राम साहेब यांच्या घरी घेतली व त्या ठिकाणी आम्हाला सांगितले .सुरवातीला आमच्या मनातही शंका आल्या की मुंबईमध्ये प्रत्येक समूह आपआपल्या बॅनर खाली मोठ्या प्रमाणात जयंती करत असतोच आणि 125 वी जयंती ही सर्वांसाठी विशेषच असणार आहे तर या सर्वांना एकाच नावाखाली कसे तयार करायचे . त्या वेळी सरांनी आम्हाला सांगितले की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर आपणास चांगले काम करायचे असेल तर आपणास समाजात जाऊन ते सांगावे लागेल. व त्यानी प्रथम मीटिंग वरळी विभागात घेऊन आम्हाला दाखवून दिले. कुठलीही गोष्ट अशक्य नसते.

वर्षभरात आम्ही मुबई ,ठाणे ,कल्याण , नवीमुबई मधून २५०० वोलेंटीअर तयार केले. याकरता सर आमची आठवड्याचे दर बुधवारी मीटिंग घेऊन कामाची माहिती घेत असत. १२५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी बी के सी. मुंबई या ठिकाणी 60,000 हजार लोकांच्या उपस्थितीत जयंती साजरी करून एक नवा इतिहास रचला गेला. सर त्यावर न थांबता ६०वी धम्म परिषद कल्याण या ठिकाणी घेणार आहेत असे आम्हाला सुचविण्यात आले तेव्हा तर मी खूप खूष झालो.

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर , अंबरनाथ ते कर्जत कसारा मधील सर्व कॉडीनेटर व वोलियंटर यांची निवड करून अशोक नगर बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी मीटिंग घेऊन प्रचाराची धुरा अम्हावर्ती सोपवली. सर दुसरा व चौथा शनिवार व चारही रविवार हे कल्याण डोंबिवली व उल्हासनगर परिसरातील सर्व विहारात भेटी देत. ते कल्याण मध्ये सकाळी ८ते रात्री ११ वाजेपर्यंत दिवसाला चार ते पाच ठिकाणी मीटिंग करून परत मुबईला जात. मी सतत सरांसोबत शेवटची मीटिंग संपेपर्यंत राहत होतो. त्यांचा तो त्याग व धम्म लोकांच्या मनात रुजविण्यासाठीची तळमळ मी जवळून पाहिली आहे. सर तर एक वडा पाव वर पूर्ण दिवस काढत असे . एकदा तर आम्ही कल्याण मध्ये दोन मीटिंग व डोंबिवलीतील दोन मीटिंग घेऊन आम्ही दिवा या ठिकाणी मीटिंग घेण्यासाठी संध्याकाळी ७ वाजता आम्ही निघालो व दबक्या आवाजात सरांना म्हटले सर मी तुमच्यासाठी घरून भाजी भाकर आणली आहे . तेव्हा सर हलकेसे हसले आणि त्यांनी गाडीत बसून भाजी भाकर खाल्ली व आम्ही पुढील दिवाच्या मीटिंगला पोहचलो.

६० वी धम्म परिषद हि दिवाळी मध्ये घेण्याचे ठरले. हा सोहळा दोन दिवस घेण्यात आला त्यासाठी लागणारी सर्व परमिशन घेणे. ज्या ठिकाणी धम्म परिषद होणार होती ती जागा लेवल करून येणाऱ्या धम्मबांधवांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची सुधा काळजी घेण्यात आली होती. रात्री धम्मसेवक तिथे रात्रभर जागून कार्यक्रमाची तयारी करत होते , काही मुली लेझिमचा सराव करत होते त्यावेळी सरांनी स्वतः लेझीम हातात घेऊन त्यांच्याबरोबर लेझीमचा सराव केला आणि सर्व दमलेल्या कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा दिली , रात्री त्याठिकाणी उपस्थित राहून त्यांचा सोबत सरावात सहभाग घेत त्यांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले .पताके लावण्यात सभाग घेणे. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला त्या समजावून सांगणे. अशा बारीकसारीक गोष्टींवरही सरांचे पूर्ण लक्ष होते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भिक्कु संघाला आमंत्रीत करून आम्हा सर्व तरुण युवकांच्या मनात धम्म रुजविण्याचा प्रयत्न खरोखर योग्य होता . त्या धम्मपरिषदेमधे सरांनी सर्व सुपर कॉर्डिनेटर , कॉर्डिनेटर यांना आदरणीय भिक्कु संघास चिवरदान करण्याची संधी दिली त्यामुळे धम्मगुरूंबद्दल आदर व दानपारमिता आम्ही खूप जवळून अनुभवली. तसेच त्यांनी औरंगाबाद मधील चौका या ठिकाणी भिकू ट्रेनिंग सेंटर उभारून ते त्यांनी भिकू संघाला दान केले.व म्हणाले की हे सर्व विहार ट्रेनिंग सेंटर मी व माझी पत्नी भिकू संघाला दान करत आहोत. या वरती आमचा कुठलाही प्रकारचा अधिकार राहणार नाही. हे वाक्य ऐकून मला दान पारमिता अर्थ कळाला तो सरांनी आम्हाला प्रत्यक्षात दाखवून दिले.

त्या भिक्कु ट्रेनिंग सेंटर मध्ये सरांनी ग्लोबल बुध्दिष्ट काँग्रेगेशनचा माध्यमातून जागतिक आदरणीय भिक्कु दलाई लामा यांना आमंत्रित करून औरंगाबाद येथे वेगळीच धम्मऊर्जा निर्माण केली. आम्हाला त्या धम्मसोहळ्याचे भाग होता आले व त्या आयोजनात आपला व आपल्यासोबत 350 मुंबईतून गेलेल्या कार्यकर्त्यांचा वाटा होता हे कुशलकम्म कधीही न विसरणारे आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनले.

तसेच 2020 या वर्षात कोरोनाचे सावट साऱ्या विश्वावर पसरलेले असतांना ह्या वर्षी घरातल्या घरी असलेल्या लोकांना धम्माचे ज्ञान मिळावे धम्मगुरूंचे मार्गदर्शन मिळावे म्हणून या वर्षी देशविदेशातील धम्मगुरूंना विनंती करून ही बौद्धपोर्णिमा डिजिटलरित्या आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवली . त्याला देशविदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला . व वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या गुणांना वाव मिळाला.

सर नेहमी आम्हाला सांगत असतात की आपण कुशल कम्म करत रहा , दान पारमिता करा , पंचशील पालन करा आपल्याला नेहमी सुख शांती समाधान मिळणार . सरांच्या प्रेरणेने आम्ही डोंबिवलीमध्ये समितीच्या नावाने ऑफिस सुरू केले त्याच्या उदघाटन सोहळ्याला सरांना येणे जमले नाही परंतु त्यांचे परममित्र व धम्मकार्यातील स्नेही जोडीदार आदरणीय निखिल मेश्राम यांनी आपल्या छोट्याशा ऑफिसचे उदघाटन केले. आज त्या ऑफिसमध्ये लहान मुलांना धम्माची आवड निर्माण होण्यासाठी दर रविवारी धम्म अभ्यास वर्ग चालू आहे, तसेच महिलांना व तरुणांना जोडण्याचे काम चालू आहे, नुकतेच तिथे महिलांसाठी केक बनविण्याचे ट्रेनिंग आपण राबवले त्यामध्ये 30 महिलांनी सहभागही घेतला होता. असे वेगवेगळे समाजउपयोगी गोष्टी तिथे कल्याण डोंबिवलीचे वोलेंटीअर मिळून मिसळून पूर्णत्वास नेत असतात. विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एका माळेत गुंफण्याचे अनमोल कार्य सरांनी केले आणि आम्हाला समाजात एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली.

डॉ.हर्षदीप कांबळे सरांच्या कार्याला सलाम अशीच धम्मऊर्जा प्रसारित होत राहो .
धन्यवाद सर आम्हाला कुशल कम्म करण्याची संधी तुम्ही देत आहात.

रवींद्र गुरचळ
सुपर कॉर्डिनेटर
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *