बातम्या

युवकांनी सक्षम बनून सामाजिक आणि धम्म चळवळी मध्ये सहभाग घ्यावा – डॉ हर्षदीप कांबळे

युवकांशी संवाद : ६० हजार पेक्षाही जास्त युवकांचा ऑनलाईन प्रतिसाद

आपल्या तरुणांमध्ये खूप ऊर्जा आहे. काहीतरी करून दाखवण्याचे एक पॅशन आहे. त्याला आपण साथ दिली तर नक्कीच आपले हे तरुण स्वतःचा तर विकास करतील, सोबत समाजाचाही करतील आणि पुढे जाऊन देशाच्या विकासामध्ये सुद्धा हातभार लावतील अशी मला खात्री आहे.असे प्रतिपादन डॉ हर्षदीप कांबळे विकास आयुक्त (उद्योग) यांनी जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने काल रात्री तरुणांशी ऑनलाईन संवाद साधताना केले.

तरुणांशी ऑनलाईन संवाद साधताना प्रचंड प्रतिसाद होता. पुढे बोलताना डॉ.कांबळे म्हणाले की, आपल्या प्रत्येकामध्ये एक चांगली क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करून घ्यायला पाहिले आणि तो वापर करत असताना आपल्याकडे असलेले रिसोर्सेस आणि आपल्याला मिळत असणाऱ्या संधी तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या सपोर्ट सिस्टीम आहे. त्याचा वापर करून घेतला पाहिजे.

डॉ हर्षदीप कांबळे सर फेसबुकवर लाईव्ह असताना…

हे सर्व करत असताना एक नेहमी मनात ठेवायचे की, बाकीचे करू शकतात तर मी सुद्धा करू शकतो हा आत्मविश्वास स्वतःबद्दल बाळगायलाच पाहिजे. असे करत असताना आपण आज नाहीतर उद्या यशस्वी झाल्यानंतर आपण एक चांगले माणूस बनणे आवश्यक आहे. फक्त पैसे कमवणेच नसून कुशल कम्म करणे, चांगला माणूस बनणे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच या जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने युवकांनी सक्षम बनून धम्म चळवळीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ कांबळे यांनी केले.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जवळपास २८ हजार तरुण लाईव्ह सहभाग घेतला होता. त्यासोबतच ऑनलाईन फेसबुक पेजेस धम्मचक्र, आवाज इंडियासह GBC यांच्यासह अनेक पेजेसच्या माध्यमातून जवळपास ६० हजार युवकांनी डॉ कांबळे यांच्या मनमोकळेपणाने चालेल्या संवादामध्ये सहभाग घेतला होता. डॉ कांबळे बोलत असताना फेसबुक लाईव्ह मध्ये प्रचंड प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत होते. यावरूनच डॉ कांबळे यांची लोकप्रियता दिसून येते.

ह्या बुद्धपौर्णिमेच्या दिवशी कोरोनामुळे त्यांनी निर्णय घेतला होता की जागतिक धम्म परिषद ही ऑनलाईन पद्धतीने घ्यायची, या धम्म परिषदेला ८ देशातील भिक्खुंणी ऑनलाईन मार्गदर्शन करीत होते. GBC च्या वेबसाईटला जवळपास ६० ते ६५ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यासोबतच GBC चे स्वतःचे टिक टॉक अकाउंट सुद्धा होते. त्यावर जवळपास १० लाख लोकांनी भेट दिली आहे. हे करीत असताना छोट्या छोट्या मुलांचे व्हिडिओ आले होते, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद डॉ कांबळे ह्या माध्यमातून साधला. त्या छोट्या मुलाचे कौतुक करत असताना आमचेही टिक टॉक स्टार आहेत यांचे कौतुक करताना त्यांना अभिमान वाटत होता..विक्रम गायकवाड, कु.राशी शिंदे, प्रज्ञा पवार, काजल, हर्षल सारखे टिक टॉक स्टार पुढचे आपले चळवळीचे शिलेदार आहेत त्यांचीही मदत केली पाहिजे असे डॉ.कांबळे म्हणाले.

डॉ,कांबळे यांनी ज्या पद्धतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला, त्यामुळे आपल्या मागे कुणीतरी खंबीरपणे उभा आहे अशीच चर्चा युवकांमध्ये होत होती. आणि बऱ्याच युवकांनी त्यांना प्रत्येक आठवड्यात एकदा तरी असा लाईव्ह कार्यक्रम घ्यावा अशी विनंती केली.

4 Replies to “युवकांनी सक्षम बनून सामाजिक आणि धम्म चळवळी मध्ये सहभाग घ्यावा – डॉ हर्षदीप कांबळे

  1. It’s a very motivational program for every youth of india. & Dr. Harshdip Kambale sir is an idol person for us. He is only person in india who is doing actual work.

Comments are closed.