बातम्या

भीमा तुझ्या जन्मामुळे; आर.एस. प्रवीण कुमार अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून रुजू

हैदराबाद : तेलंगणा राज्य प्रशासनातील आर.एस. प्रवीण कुमार (आयपीएस) यांची सोमवारी (ता.२२) तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. पदोन्नती झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सॅल्यूट करून अभिवादन केले.

आर.एस. प्रवीण कुमार हे आयपीएस अधिकारी असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचितांसाठी निवासी शाळा चालविणारी तेलंगणा निवासी शैक्षणिक संस्थेचे सचिव आहेत. काल आर.एस. प्रवीण कुमार यांनी ट्विटरवर स्वतः पदोन्नती बद्दल ट्विट केले. सोबत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सॅल्यूट करताना फोटो पोस्ट केला. त्यानंतर त्यांचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर.एस. प्रवीण कुमार यांचा जन्म दलित कुटुंबात झालेला असल्यामुळे त्यांना सुद्धा गावात असताना जातीयवादाचे चटके बसलेले आहेत. प्रवीण कुमार यांनी एका मुलाखतीत आपल्याला सहन कराव्या लागलेल्या घटना सांगितल्या आहेत.

वेदनेकडे दुर्लक्ष केले, कारण माझे ध्येय मोठे :

आर.एस. प्रवीण कुमार सांगतात की, माझे वडील शिक्षक असूनही त्यांना गावामध्ये राहण्यास घर नाकारले होते. मला आठवते की माझ्या वडिलांनी दलित विद्यार्थ्यांना शिकवणी देण्यास सुरुवात केली तेव्हा आमचे भाड्याचे घर रिकामे करायला लावले. गावातल्या विहिरीचे पाणी घेण्यासाठी माझ्या आईला वेगळी वागल्या रांगेत थांबवून भेदभावाची वागणूक दिली जात असत. जेव्हा मी विद्यापीठात शिक्षणासाठी राहत असताना हॉस्टेलमध्ये दलित मुलांसाठी वेगळे बाथरूम ठेवण्यात आले होते. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी वेगळी वागणूक दिली असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना आर.एस. प्रवीण कुमार म्हणतात की, माझे आईवडील शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीचे जिवंत उदाहरण आहेत. ते माझ्या आजोबांसारखे गुलाम म्हणून काम करू शकले असते. परंतु आमच्या शिक्षणासाठी माझे आई-वडील त्यांचे स्वप्ने माझ्यासोबत आणि माझ्या बहिणींबरोबर शेअर करत असत आणि आम्ही त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

Dr. R.S. Praveen Kumar Swaero (I.P.S.)

आज मी आयपीएस अधिकारी आहे, माझा भाऊ सहयोगी प्राध्यापक आहे आणि माझी बहीण डॉक्टर आहे. जातीयवाद्यांकडून त्रास होत होता, मात्र वेदनेकडे दुर्लक्ष केले, कारण माझे ध्येय मोठे होते. मी आज माझ्या ओळखीबद्दल पूर्णपणे समाधानी आहे, जे मला सर्व वंचितांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहे.

तो काळ गुदमरल्यासारखा होता :

ज्या गावात माझा जन्म झाला आहे त्या गावात मला जातीच्या परिघीय जीवनात राहण्याची शिक्षा देण्यात आली. गावाच्या मध्यभागी फिरण्याची जन्मजात भीती होती. तो काळ गुदमरल्यासारखा होता. मी आता जिथे राहत आहे त्या शहरात, हे वेगळेपणा सहसा पाहिले जात नाही. हक्कांबद्दल जागरूकता, सुरक्षिततेची भावना आणि न्यायाकडे जाणे हे माझ्या गावापेक्षा शहरात चांगले आहे. परंतु शहरी भागांमध्येही काही वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक जातीय भेदभावाच्या प्रकारांबद्दल ऐकत असल्याचे म्हटले.

गुणात्मक शिक्षणामध्ये गुंतवणूक करणे ही चांदीची गोळी

आर.एस. प्रवीण कुमार शिक्षणाबद्दल बोलताना म्हणतात की, वंचितांच्या गुणात्मक शिक्षणामध्ये (शक्यतो इंग्रजीमध्ये) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे ही चांदीची गोळी असल्यासारखे आहे. तेलंगणा सरकार एससी उपयोजना कायदा आणि केजी-टू-पीजी निवासी शिक्षण योजनेद्वारे प्रयत्न करीत आहे. या योजनेद्वारे लाखो उपेक्षित विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत. यामध्ये गरीब आदिवासी आणि दलित मुले मालवत पूर्ण आणि आनंद कुमार यांना पृथ्वीवरील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट येथे पाठवले गेले.

आर.एस. प्रवीण कुमार यांनी आपल्या संघर्षमय जीवनाच्या प्रवासात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन दलित आदिवासी आणि वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करत आहेत. त्यांच्याकडून बाबासाहेबाना अभिप्रेत असलेले कार्य होवो अश्या मंगलमय सदिच्छा! त्यांना मानाचा जय भीम!

-धम्मचक्र टीम