इतिहास

यामुळे गझल सम्राट सुरेश भटांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली!

सुरेश भट ही पाच अक्षरे उच्चारली तरी गीतांचा मधुघट किणकिणू लागतो आणि गझलांच्या रेशमी सरी बरसू लागतात. सुरेश भट यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती.

त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

बौद्ध धर्म का स्वीकारला असावा?

गझल सम्राट सुरेश भट यांचे चिरंजीव चित्तरंजन भट यांची ३० एप्रिल २०१८ रोजीची फेसबुक पोस्ट :

माझे वडील सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी गाजावाजा न करता बौद्ध धर्म…

Posted by Chittaranjan Bhat on Monday, 30 April 2018

माझे वडील सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी गाजावाजा न करता बौद्ध धर्म स्वीकारला होता. डॉ॰ भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती.

माझे वडील नास्तिक होते. त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला असावा, असा मला प्रश्न पडतो. मला वाटतं ह्याचं एक उत्तर हे की, बौद्ध धर्म हा ईश्वराचं अस्तित्व नाकारणारा धर्म आहे. दुसरं उत्तर बौद्ध धर्म हा बाबासाहेबांचा धर्म आहे. डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर त्यांचे श्रद्धास्थान होते.

मध्यंतरी सुरेश भटांच्या जन्मदिनाच्या म्हणजे १५ एप्रिलच्या आसपास व्हॉटस्ऍपवर एक पोस्ट फिरत होती. काही जणांनी ती माझ्या लक्षात आणून दिली होती आणि माझी प्रतिक्रिया मागितली होती. बुद्ध जयंतीचा मुहूर्त साधून ही माझी प्रतिक्रिया. माझ्यामते त्या पोस्टीत ही गोष्टही प्रकर्षाने नमूद व्हायला हवी होती.

5 Replies to “यामुळे गझल सम्राट सुरेश भटांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली!

  1. I would like to learn Buddhism
    I am proud of i am Buddhist

    Use full information here i am really impressed

  2. Hon. Suresh Bhattji…. people like you who accept Lord Buddha &Dr.Ambedkar are really a inspiration to the next lndian generation…… really Proud of You sir…. Jai Bhim & Jai Hind……

  3. खुपच छान माहिती मिळाली… सुरेश भट यांचा ऐकण्याची मला पण एकदा संधी मिळाली होती. तेव्हा मी नागपुरला शिकत असताना संत चोखामेळा शासकीय वसतीगृहात राहत होतो. आमचे ज्येष्ठ वसतिगृहातील बंधूंनी त्यांना वसतीगृहातील स्नेहसंमेलनात आमंत्रित केले होते. सुरेश भट व इतर अस्पृश्यतेतर समाजातील काही लोकांची बाबासाहेब यांच्या बद्दल असलेली आत्मीयता, जिव्हाळा खरचं याची जाणीव करून देते की बाबासाहेब हे कुण्या समाजाला अस्पृश्यता व जातीयवादी भेदभावपूर्ण अन्याया साठी जबाबदार ठरवत नसत तर विसमतावादी, ब्राम्हण्यवादी विचारसरणीला ठरवत असत. पण हे खुपच कमी लोकांना कळत होते किंवा इतरांना कळून घ्यायचे नव्हते असचं दिसते. असो सुरेश भट हे मोजक्या पैकी एक होते हेनक्की. त्यांच्या गजला व विचारांतून ते सदैव स्मरणात राहतील. नमो बुद्धाय, जय भीम

  4. I am overwhelmed to read this. But we don’t have more knowledge about Buddha & his Dhamma so we can’t explain & solve others views .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *