बुद्ध तत्वज्ञान

एही पस्सीको – या पहा आणि मगच विश्वास ठेवा

बुद्धिझम तत्वप्रणाली सर्व जगभर पसरली आहे. तो एक धर्म म्हणून नाही तर दुःखमुक्त जीवन जगण्याचा उच्चतम मार्ग आहे. पाश्चात्य देशात लोकांनी धर्म न बदलता विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आहे. राग-द्वेष, मोह-माया पासून मुक्त होऊन निर्वाणपदी पोहोचलेले आणि सर्व मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्धांनी स्वतःसाठी काही वेगळे स्थान निर्माण केलेले नाही.

राजपुत्र असताना पायाशी लोळणाऱ्या सुखांना दूर सारून ज्या महामुनींनी शेवटच्या क्षणापर्यंत धर्मोपदेश दिला ते स्वतःचा संप्रदाय कसे स्थापित करतील ? या जगाने मात्र त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणाऱ्या त्यांच्या अनुयानांना बौद्ध, बुद्धिस्ट म्हटले. त्याचप्रमाणे बुद्ध तत्वप्रणालीचा त्यांना संस्थापक म्हटल्यामुळे त्यांचे अनुयायी बौद्ध म्हणून संबोधले गेले. व्यावहारिक दृष्ट्या ते ठीक आहे. पण बुद्धिझम ही एक आदर्श विज्ञाननिष्ठ विचारधारा असून ती एक जगण्याची पवित्र तत्वप्रणाली आहे याची जाणीव ठेवावी.

भारतातील परिस्थिती मात्र पूर्णतः वेगळी होती. पिढ्यानपिढ्या शोषण झालेला एक वर्ग भारतामध्ये असंख्य दुःख भोगत होता. धर्माच्या ठेकेदारांनी जातीभेदाचे रान माजवून त्याला जखडून टाकले होते. म्हणूनच त्याला बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली धर्मांतर केले. इथे बौद्ध धम्म हा ‘धर्म’ म्हणून स्वीकारणे महत्वाचे होते. पिढ्यान पिढ्या चालत आलेली आयडेंटिटी चेंज करण्यासाठी धर्म म्हणून त्याची आवश्यकता होती.माणसाने दुःखमुक्त कसे व्हावे याचे मार्गदर्शन बुद्धांनी केलेले आहे.

स्वतः शोधलेल्या मध्यम मार्गावरून चालून त्यांनी अनुभव घेतला. आणि मगच लोकांना उपदेश केला. त्यांनी सांगितले की मी सांगतो म्हणुन त्यावर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष त्यामार्गावरून चाला. अनुभवा आणि मग पटले तरच त्या मार्गावरून पुढे अंतिम धेय्याकडे जा. असे स्वतःच्या बुद्धीला प्रामाणिक आवाहन करणारे अन्य कोणीच या पृथ्वीतलावावर दिसत नाही. आणि म्हणूनच विज्ञानवादी बुद्धिझम सर्वांना भुरळ घालीत आहे.

जपान मधील ‘टोयोटा’ या जगप्रसिद्ध उत्पादन प्रणालीचे ब्रीद वाक्य सुद्धा “Genchi Genbutsu” म्हणजेच “Go and See” असा आहे. याचाच अर्थ ” समस्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष जा आणि बघा” असा आहे. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. ‘होंडा’ या उत्पादकांचे ब्रीद वाक्य देखील “sangen shugi” असे आहे व अर्थ तसाच आहे.

बुद्ध यांनी दुःखमुक्तीचा उपदेश देताना अष्टांगिक मार्गाचे महत्व विशद केले आहे. समाधी मार्गाचे सूत्र सांगितले आहे. म्हणूनच ते कलमा सुत्तात सांगतात “या आणि स्वतः पहा, अनुभवा”. परंपरेने चालत आले म्हणून कुठली गोष्ट मानू नका. डोळे झाकून स्वीकारू नका. बुद्धांचा सर्व धम्मोपदेश हा नुसता चर्चेचा नाही तर प्रत्येकाने त्या मार्गावर चालून अनुभवण्याचा आहे. म्हणूनच “एही पस्सीको” हे बुद्धांचे दोन शब्द अतिशय अर्थपूर्ण आहेत.

Buddha says again and again to his disciple, “Ehipassiko”. This is the phrase from the Pali language. It is translated as “come and see for yourself”. They are scientific people; Buddhism is the most scientific Dhamma on the earth. Hence, it is gaining more and more ground in the world everyday. As the word becomes more intelligent, Buddha will become more and more important. It is bound to be so. As more and more people come to know about science, Buddha will have great appeal, because he will convince the scientific mind — because he says, Whatsoever I am saying can be practiced. and I don’t say to you “Believe it.” I say “Experiment with it, experience it. And only then if you feel it yourself, trust it.’ Otherwise there is no need to believe.”

संजय सावंत, नवी मुंबईत (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *