बातम्या

एका कर्तव्यदक्ष आयएएस अधिकाऱ्याने कसा घडवला बदल – खास मुलाखत (भाग २)

जीबीसी इंडिया व्यू मेकर्स शो अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे सर (आयएएस) यांची खास मुलाखत आवाज इंडिया टीव्ही चॅनेलचे अमन कांबळे यांनी घेतली आहे. व्यू मेकर्स शोचा पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसादानंतर १३ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री ८:०० वाजता दुसरा भाग आवाज इंडिया यु ट्युब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.

प्रशासनात कर्तव्यदक्ष तसेच सर्व लोकांसाठी निर्णय घेणारे आश्वासक, निडर अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ.हर्षदीप कांबळे सर यांची उत्कंठित कथा. तसेच त्यांच्या कारकीर्दीत त्यांना आलेले अनुभव पहिल्यांदाच आपल्यासमोर या शोच्या माध्यमातून समोर येणार आहे.

या शोच्या दुसऱ्या भागात यवतमाळ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी असताना माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचा नियोजित दौरा अचानक रद्द झाला होता. मात्र डॉ.कांबळे सर यांनी आपले प्रशासकीय कौशल्य वापरून पंतप्रधानांचा दौरा घडवून आणला आणि शेतकऱ्यांना विशेष पॅकेज मिळवून दिले होते. त्यासोबतच मालेगाव ह्या अतिसंवेदनशील शहरातील पोलिसांनी संरक्षण नाकारल्यावर सुद्धा शहरातील अतिक्रमण कसे हटवले? गरीब गरजू मुलांसाठी औरंगाबाद मनपा आयुक्त असताना एज्युकेशन क्षेत्रात कसे कार्य केले आणि त्यासाठी काय करणे गरजेचे आहे? प्रशासनात राजकारणी लोकांचा अधिकाऱ्यांवर कसा दबाव असतो आणि हे कसे हाताळले जाते? अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांसह तरुणांनी काय केले पाहिजे यावर डॉ.कांबळे यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले आहेत.

डॉ कांबळे सर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून २०२० मध्ये कोरोनामुळे अचानक लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये आपल्या मित्रांच्या मदतीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गरजू गरीब लोकांना महिनाभर पुरेल असे अन्नधान्याचे ३०००० हजार किट वाटप केले. . डॉ.कांबळे सर यांना प्रशासकीय कामकाजाचा प्रचंड व्याप असतानाही सामाजिक कार्य करण्यास वेळ कसा देतात. यावर त्यांच्याकडूनच आपल्याला ऐकण्यास मिळणार आहे. मंगळवारी १३ तारखेला रात्री ८:०० वाजता होणारी ही मुलाखत तरुणांसाठी एक पर्वणी असणार असून यापूर्वीचा पहिला भाग सुद्धा आपण आवाज इंडिया यु ट्युब चॅनेलवर पाहावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *