इतिहास

भारतीय पुरातत्त्वचे जनक: सर अलेक्झांडर कनिघम

सर अलेक्झांडर कनिघम ( Sir Alexander Cunningham) या महान अभियंत्यानेच भारतातील अनेक बौद्ध स्थळांचा आणि काही बुध्द लेण्यांचा शोध लावला. सारनाथ, बुध्द गया, कुशीनारा,नालंदा, तक्षशिला आदी भूगर्भात दडलेला बौद्ध कालीन इतिहास यांनी शोधून काढला… आणि जगाला पटवून दिले की भारतभूमी ही खरच बुध्दभूमी होती, असं म्हटलं जातं…भारतात बौद्ध धम्माच्या पूर्जीवनाचा विचार करता अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात परंतु सर अलेक्झांडर कनिंघम यांचं नावं फारस कोणी घेत नाही…

तथापि, भारतमधील महत्वपूर्ण बौद्ध स्थळं शोधून काढन्यात त्यांचं नावं प्राधान्यानं घ्यावं लागेल … लुम्बिनी,सारनाथ, साँची, कुशीनगर, तक्षशिला, नालंदा हा सर्व भारतातील प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा भूगर्भात गडप झाला होता , त्यांनी तो उत्खनन करून शोधून काढला …सर अलेक्झांडर कनिंघम हे ब्रिटीश सैन्यामध्ये इंजिनीयर होते. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये २३ जानेवारी १८२३ रोजी झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांची इंजिनीयर म्हणून वाराणसीला नियुक्ती झाली. वाराणसी शहराबाहेर सारनाथ हे स्थळं शांत आणि कल्लोळापासून दूर होतं. तिथे फेरफटका मारतांना त्यांना एका उंच मंदिराचं घुमट आढळलं, त्यांना असं वाटलं, हे कोणत्या तरी महाराजाचा महाल असावा, एक अभियंता म्हणून त्यांच्या मनात त्या वास्तू बद्दल कुतूहल जग झालं..मग त्यांनी शोध सुरु केला…

स्वतःच्या पैशांतून त्यांनी उत्खनाचं कार्य सुरु केलं … या उत्खननात त्यांना दगडावर कोरलेली अक्षरं मिळाली , जी त्यांच्या आकलना पलीकडची होती… म्हणून त्यांनी हे शिल्प ‘ जेम्स प्रिंसेप ‘ कडे पाठवलील , जे तत्कालीन रॉयल अशियाटीक सोसायटीचे सचिव होते… जेम्स प्रिंसेपने बुद्धाला आदरांजली म्हणून या लिपीचा शोध लावला… ही होती ‘ ब्राम्ही लिपी’ … या शिलालेखावरून हाही शोध लागला कि बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलेलं हेच स्थळ होय… म्हणजेच सारनाथचे धम्मेक स्तूप… यामुळे पुरातन वास्तू संशोधांशी त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली… त्यानंतर भारतीय इतिहास , उत्खनन आणि पुरातन शास्त्रात त्यांनी सबंध आयुष्य घालावलं …

सारनाथ नंतर त्यांनी सांची इथे उत्खनन केलं तिथे त्यांना सांचीच्या स्तूपाबरोबरच भगवान बुद्ध , सारीपुत्त आणि महामोग्ल्लायन यांच्या अस्थी सापडल्या. सारनाथ आणि परिसरात त्यांचं शोध कार्य सुरू असताना त्यांना अनेक छोट्या मोठ्या वास्तू सापडल्यात… ही माहिती त्यांनी १८५४ मध्ये “द भिलसा टोप्स ” या नावानं लिहिलेल्या ग्रंथाच्या स्वरुपात प्रकाशित केली. ही सर्व पुरातन बौद्ध स्थळं शोधण्यास त्यांना फ़ाहियान आणि ह्वेन त्सांग यांच्या प्रवास वर्णनाची मदद झाली. विशेष म्हणजे ह्वेन त्सांग यांच्या प्रवास वर्णनातील माहिती बऱ्या पैकी अचूक होती…

त्यांनी १८४६ मध्ये त्यांनी कोलकत्ता येथील अशियाटिक सोसायटीला पत्र पाठवलं आणि १८६० मध्ये लॉर्ड कॅन्नींग यांच्याकडेही प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावात त्यांनी भारतातील पुरातन , ऐतिहसिक स्थळांची योग्य जोपासना आणि संशोधन करण्यासठी स्वतंत्र विभाग सुरु करण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं…अन २१ नोव्हेंबर १८६१ मध्ये “ Archaeological Survey of India ” ची स्थापना झाली. या विभागाचे प्रमुख म्हणून सर अलेक्झांडर कनिंघम यांची नियुक्ती करण्यात आली …

१८७१ मध्ये त्यांनी “ Ancient Geography of India ” हा ग्रंथ प्रकाशित करून भारतातील पुरातत्त्व विभागाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे सम्राट अशोकच्या शिलालेखांचा संग्रह होय. ज्यात जेम्स प्रिंसेप यांची मदत झाली. सर अलेक्झांडर कनिघम यांनी पुन्हा ह्युग त्सांग यांच्या माहितीनुसार कुशिणाराचाही शोध लावला. जिथे त्यांना भगवन बुद्धांची मूर्ति सापडली, आश्चर्य म्हणजे ह्युग त्सांग यांनी सुद्धा या मूर्तीच वर्णन केलं होतं… सर अलेक्झांडर कनिंघम यांनी महाबोधि विहाराला भेट दिली तेव्हा विहाराची जीर्ण अवस्था बघून त्यांना खूप दुःख झालं… ते लिहितात “ मी फेब्रुवारी १८८१ मध्ये या विहाराला दुसऱ्यांदा भेट दिली. जेव्हा भगवान बुद्धांच्या अस्थी भेटल्या, त्या वेळी मी तिथे हजर होतो ”

इतर बौद्ध स्थळाप्रमाणे नालंदा आणि तक्षशीला ही प्राचीन भारतीय विद्यापीठही विस्मृतीत गेली होती. १८१२ मध्ये फ्रान्सीस बुकानन यांनी नालंदा विद्यापीठ शोधून काढलं, पण अलेक्झांडर कनिंघम यांनीच ते नालंदा विद्यापीठ आहे म्हणून ओळखलं. १८७२ मध्ये त्यांनी तक्षशीला विद्यापीठही शोधून काढलं … या विद्यापीठचं उत्खनन कार्य भारतीय पुरातत्त्व विभागानं पूर्ण केले. सर कनिघम याचं कार्य शब्दापलीकडच आहे. सर अलेक्झांडर कनिंघम जगातील सर्वोत्तम पुरातत्वशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा अगदीच विस्मृतीत गेलेला इतिहास जगासमोर आणला. आपण भारतीय त्यांच्या या योगदानासाठी त्यांचे कायम ऋणी राहू…

यशवंत भंडारे, औरंगाबाद

One Reply to “भारतीय पुरातत्त्वचे जनक: सर अलेक्झांडर कनिघम

  1. SIR,ALEXANDER CUNNINGHAM IS THE GREATEST PERSON TO REVIVE BUDDHISM DURING BRITISH REGIME

Comments are closed.