इतिहास

जगासमोर ‘त्या’ दुर्मिळ गोल्डन बुद्धमूर्तीचे रहस्य कायम; नेमकं त्या बुद्धमूर्तीत काय होते?

१९६५ ते १९८६ पर्यंत फर्डिनांड मार्कोस यांनी फिलिपाइन्सवर राज्य केले. ते सर्वप्रथम निवडून गेलेले राष्ट्रपती आणि नंतर हुकूमशहा म्हणून होते. मार्कोस पदावरून हद्दपार होईपर्यंत त्यांची वैयक्तिक संपत्ती अंदाजे १० अब्ज डॉलर्स होती. त्याकाळात काहींनी मार्कोस यांना सार्वजनिकपणे आव्हान देण्याचे धाडस केले होते. पण ५ मे १९७१ रोजी रॉजर रोक्सास नावाच्या व्यक्तीने मार्कोसचा अवमान केला आणि एक धाडसी आरोप करून तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. त्यांनी हुकूमशहा मार्कोसच्या सैनिकांवर कोट्यावधी रुपयांची दुर्मिळ गोल्डन बुद्धमूर्ती चोरल्याचा आरोप केला. हे प्रकरण एका दशकापेक्षा जास्त गाजले. आजही या दुर्मिळ बुद्धमूर्तीचे रहस्य कायम आहे. नेमकं त्या बुद्धमूर्तीत काय होते? हे प्रकरण काय होते हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

१९७० मध्ये रॉजर रोक्सास आणि त्याचे कुटुंबीय मनिलाच्या उत्तरेस २०० मैलांच्या अंतरावर असलेल्या लुझॉनच्या फिलिपाइन्स बेटावर राहत होते. दुसर्‍या महायुद्धानंतर फिलिपीन्समधील खजिन्याची लुटीचा संताप होता. फिलिपीन्स लोक जपानी सैन्यांनी पुरलेला खजिना शोधत होते. शनिवार व रविवारी रॉजर फिलिपिनोसच्या टीमसह खजिना शोधण्यात घालवीत असे. रॉजरचा एक खजिना शोध करणारा अल्बर्ट फुचिगामी साथीदार होता. अल्बर्टला त्याच्या वडिलांनी खजिन्याचा नकाशा दिला होता, जो दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्यात अधिकारी होता. नकाशाचा वापर करून गुप्त बोगद्याच्या एका ठिकाणी अशी जागा केली की, जेथे सोन्याच्या पेट्यामध्ये जपानी लोक आपले नशिब सोडून गेले होते.

रॉजरला खात्री होती की त्याचा मित्र सत्य सांगत आहे. अल्बर्ट खजिन्याबद्दल रॉजरला सांगण्यापूर्वीपासून चांगले मित्र होते. तसेच त्या खजिना असलेल्या बोगद्याबद्दल जे माहित आहे ते रॉजरला सांगितले होते. रॉजरला खजिना सापडेल याबद्दल खूप आशा होत्या कारण अल्बर्ट फुचिगामी जपानी सैनिकाचा मुलगा होता.

खजिना शोधकामासाठी रॉजर रोक्सास आणि अल्बर्टने काही लोकांना कामावर घेतले. त्यांनी नकाशा नुसार एका ठिकाणी जागा निश्चित केली. खोदण्याच्या पहिल्या काही मिनिटांत त्यांना जपानी स्फोटक तोफगोळ्यांचा एक थर सापडला. काही आठवड्यांच्या खोदकामानंतर रोक्सास आणि अल्बर्ट यांची टीम जपानी लोकांनी बंद केलेल्या बोगद्यामध्ये उतरली. बोगदा मोठा प्रशस्त होता रेल्वे ट्रक जाण्यासारखा, त्यांना बोगद्यात आढळले की एका स्फोटामुळे मुख्य भूमिगत प्रवेशमार्गावरील सर्व प्रवेश बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी त्याभोवती खणले आणि पहिल्यांदा रॉजर रोक्सासने भूमिगत बोगद्यात प्रथम प्रवेश केला. रॉजरला आत मध्ये जवळपास १० पेक्षा अधिक जपानी लोकांचे सांगाडे दिसले.

रॉजरचा पाय एका थडग्यावर अडखळला आणि तिथेच त्याला धक्कादायक शोध लागला. बोगद्यातील एका पोकळीत भगवान गौतम बुद्धाची मोठी सोन्याचा मूर्ती सापडली. रॉजर आणि अल्बर्ट स्तब्ध झाले. त्यांच्या सोबत असलेल्या टीमने दोन हजार पौंड वजन असलेली बुद्धमूर्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते तर हे दोघे पुढे शोध मोहीम सुरु ठेवली. पुढे गेल्यावर दोघांना नकाशामध्ये जसे दाखविले होते त्याप्रमाणे तेथे सोन्याच्या बारांचे बॉक्स होते. रोक्सस आणि फुचिगामी यांनी खजिना लपविण्यासाठी बोगदा डायनामाइट स्फोट करून बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्या दोघांनी एक प्लॅन केला सुरुवातीला भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती विकायची आणि त्यातून एक ट्रक व उपकरणे खरेदी करून बोगद्यातून सोने काढून घेऊन जाऊ. रॉजरने बुद्धमूर्तीला घरी नेले आणि एका खरेदीदाराला दाखवली आणि त्या खरेदीदाराने निश्चित केले की ही बुद्धमूर्ती अस्सल सोन्याची आहे. मात्र खरेदीदार सारखा बुद्धमूर्तीच्या डोक्याकडे बारकाईने पाहत होता. त्यामुळे रॉजर आणि त्याच्या भावाला बुद्धमूर्तीच्या आता मध्ये काहीतरी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी मूर्तीचे डोके धडावेगळे केल्यानंतर त्यांना धक्काच बसला कारण, बुद्धाच्या मूर्तीमध्ये मूठभर हिरे होते. त्यातील काही रफ कट केलेले तर काही चांगले हिरे होते. रॉजरने कपाटात हिरे लपवले. त्या रात्री रॉजरच्या भावाने बुद्धमूर्ती सोबत रॉजरची फोटो घेतली. रॉजरला वाटले की कदाचित हे फोटो त्याचे रक्षण करतील, परंतु तो चुकीचा होता. त्याच्या खजिना शोधाची बातमी मनिला येथील राष्ट्रपतींच्या भवनात आधीच पोहचली होती….

रॉजरच्या भावाने गोल्डन बुद्धमूर्ती सोबत रॉजर रोक्सासची घेतलेला फोटो

फिलिपाईन्स देशात लोकशाही असली तरी फर्डिनांड मार्कोस याने आपली पत्नी इमेल्दा सोबत देशात जबरदस्तीने हुकूमशाही पद्धतीने राजासारखे राज्य केले. रॉजरने बुद्धमूर्ती घरी आणल्यावर दोन महिन्यांनंतर सैनिकांनी त्याच्या घरी धाड टाकली. घरी आलेल्या सैनिकांच्या रायफलांवरील लाल फितींमुले रॉजरच्या लक्षात आले की हे सैनिक राष्ट्रपती मार्कोसच्या पॅलेस गार्डचे लोकं आहेत.

घरी आलेल्या सैनिकांनी गोल्डन बुद्धमूर्तीसह सर्व काही घेतले, अगदी त्याच्या लहान मुलांच्या पिग्गी बँका सुद्धा तसेच त्याच्या बायकोचे कपाटातील सर्व दागिने सुद्धा घेतले, त्यावेळी रॉजरने विरोध केला असता तर त्यांनी त्याला मारले असते. दुसर्‍याच दिवशी रॉजर आणि त्याच्या भावांनी स्थानिक पोलिसांना व न्यायालयात या घटनेची तक्रार दिली. तो न्यायाधीश रॉजरचा कौटुंबिक मित्र होता. तो न्यायाधीशाला म्हणाला आपण दोघे मित्र आहोत तू माझ्या घरातील गोल्डन बुद्ध मूर्ती आणि सोने जप्त करण्याचा आदेश का दिला? न्यायाधीश म्हणाला मी काहीच करू शकत नाही. रॉजर म्हणाला का करू शकत नाही? तो म्हणाला राष्ट्रपतीने सांगितले आहे.

फर्डिनांड मार्कोस

रॉजरच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीशांनी त्याला बजावले होते की मार्कोसने रॉजरला जिवंत अथवा मृत पकडणाऱ्याला मोठे बक्षीस ठेवले आहे. रॉजर आणि त्याचे कुटुंब लपविण्यासाठी एका जंगलात पळून गेले. रॉजर एकांतवासात असताना फिलिपिनोच्या पत्रकारांना आधीपासूनच या सर्व घटनेबद्दल माहिती घेत होते, याबद्दल चुकीच्या बातम्या येत असल्याने मार्कोसने पत्रकारांना बोलवून भगवान बुद्धाची मूर्ती पाहण्याची परवानगी दिली. पण त्याच्या राजकीय विरोधकांना असे वाटले की मार्कोसने बनावट मूर्ती तयार करून पत्रकारांना दाखवली असून खरी बुद्धमूर्ती लपवुन ठेवल्याचा त्यांना संशय आला.

या सगळ्या प्रकरणानंतर फिलिपाइन्सच्या विरोधी पक्ष नेत्यांनी मार्कोसला पदावरून खाली खेचण्याची संधी मिळाली तसेच मार्कोसचा अपमान करायचा होता. म्हणून त्यांनी रॉजरचा शोध घेतला आणि मार्कोसने पत्रकारांना दाखवलेली बुद्धमूर्तीचा फोटो रॉजरला दाखवून तुला सापडलेली गोल्डन बुद्धमूर्ती हीच आहे की बनावट आहे? असे विचारले. रॉजरने लगेच ओळखले की ही बनावट बुद्धमूर्ती आहे. मग त्याला हे प्रेस मध्ये सांगण्यास तयार करू लागले. रॉजरला मनाली येथे आणले आणि प्रेसमध्ये मार्कोसने दाखवलेली गोल्डन बुद्ध मूर्ती बनावट असल्याचे रॉजरने सांगितले. विरोधकांच्या या खेळीमुळे मार्कोस संतापला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रॉजर तेथून पळून जाऊन लपून बसला.

रॉजरच्या म्हणण्यानुसार, दोन आठवड्यांनंतर पॅलेस गार्डने मला शोधून काढले. तीन माणसे माझ्या जवळ आली आणि त्यांनी बंदुका माझ्याकडे रोखल्या आणि म्हणाले, आम्ही तुला ओळखलं आहे तू आमच्याबरोबर कारमध्ये चल आम्ही तुला मनिला येथे नेत आहोत. मी तेथून पळू शकलो नाही. मला माहित होते की ते सैनिक आहेत. त्यांच्याकडे बंदुका होत्या. त्यांनी राष्ट्रपती भवनात कॉल केला आणि ते इंग्रजी बोलत होते. मला माहित आहे की ते मार्कोस यांच्याशी बोलत होते कारण त्यांनी त्याला श्री. अध्यक्ष म्हणून बोलत होते. मार्कोस त्यांना विचारलाच असेल, आपणास खात्री आहे की तुम्ही पकडलेला रॉजर रोक्सास हा आहे. आणि ते म्हणाले, होय, आम्हाला खात्री आहे. ”

रॉजरला हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवले आणि सोन्याच्या बुद्ध मूर्तीबद्दल खोटे बोलण्यासाठी विरोधकांनी त्याला पैसे दिले गेले होते असे सांगून पेपरवर सही करेपर्यंत सैनिकांनी त्याचा छळ केला. तसेच सोने असलेला खजिना बद्दल हे सैनिक रॉजरला विचारत होते. कित्येक आठवडे दररोज त्याच्यावर छळ होत असे. पण सैनिकांना काहीही सांगण्यास रॉजर तयार नव्हता. कारण त्याने फुचिगामी यांची शपथ घेतली होती की ठार मारले तरी तो बोगदा कोठे आहे हे सांगणार नाही. अनेक दिवसानंतर रॉजरला त्याचे कुटुंब पहाण्याची परवानगी देण्यात आली. त्याची बायको त्याला पाहून रडू लागली, ती म्हणाली तुम्हाला ते मारून टाकतील रॉजर तिला म्हणाला तू फक्त प्रार्थना कर..आणि सैनिकांनाही परत त्याला आत मध्ये घेऊन गेले.

त्याच्या कुटूंबासोबत छोट्या भेटीनंतर रॉजरला त्याच हॉटेलमध्ये परत नेले गेले. त्याचा परत छळ करण्यात आला. पण यावेळी तो बाथरूमच्या खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. हॉटेलमधून पळून गेल्यानंतर रॉजर रोक्सास लपून बसला होता. त्याने पुन्हा कधीही सोन्याची बुद्ध मूर्ती पाहिले नाही.

मार्कोसच्या समर पॅलेसपैकी एका ठिकाणी ही बुद्ध पाहिल्याचा दावा दोन साक्षीदारांनी केला आहे. १९८९ मध्ये फर्डिनांड मार्कोस यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या कुटुंबाकडे अजूनही सोन्याची ती बुद्ध मूर्ती असल्याची अफवा कायम आहे.

रॉजर रोक्सासने गोल्डन बुद्ध मूर्ती पुनर्प्राप्तीसाठी दिवाणी खटला दाखल केला. परंतु ज्या दिवशी त्याला साक्ष द्यायला लावले होते त्या दिवशी रोक्ससचा मृत्यू झाला. काही वैद्यकीय अहवालांमध्ये हृदयविकाराचा झटका आला असे दाखविले, परंतु काहीजण हा अहवाल चुकीचाअसल्याचा आरोप केला जातो. रोक्सस कुटुंबाने मार्कोस इस्टेटविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू ठेवली आहे परंतु हे प्रकरण न्यायालयाच्या यंत्रणेत एका दशकापेक्षा जास्त काळ प्रलंबित होते. .

9 Replies to “जगासमोर ‘त्या’ दुर्मिळ गोल्डन बुद्धमूर्तीचे रहस्य कायम; नेमकं त्या बुद्धमूर्तीत काय होते?

  1. Plz share daily information of Buddhism. Through WhatsApp, Facebook, Instagram, twitter etc.

Comments are closed.