आंबेडकर Live

बाबासाहेबांवर आधारित असलेले हे २१ चित्रपट पाहिलात का?

1) 2000 – जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

2) श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.

3) अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.

4) महापुरुष डॉ. आंबेडकर हा 1968 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांवर निर्मित मराठी लघुपट आहे. या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे 1968 च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे 18 मिनिटांच्या या लघुपटाला संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते. अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी लघुपटाचे निवेदन केले होते.

5) भीम गर्जना : 1990 मधील विजय पवार दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती.

6) बालक आंबेडकर : 1991 मधील बसवराज केस्थर दिग्दर्शित कन्नड चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता चिरंजीवी विनय यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.

7) डॉ. आंबेडकर : 1992 मधील परपल्ली भारत दिग्दर्शित तेलुगू चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता आकाश खुराना यांनी साकारली होती.

8) युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर : 1993 मधील शशिकांत नरवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता नारायण दुलारे यांनी साकारली होती.

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर

9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर : 2000 मधील जब्बार पटेल दिग्दर्शित इंग्लिश चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता मामुट्टी यांनी साकारली होती. हा चित्रपट अनेक भारतीय भाषांमध्ये डब झालेला आहे.

10) डॉ. बी.आर. आंबेडकर : 2005 मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित कन्नड चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता विष्णुकांत बी.जे. यांनी साकारली होती.

11) पेरियार : 2007 मधील ज्ञान राजशेकरन दिग्दर्शित पेरियार यांच्या जीवनावर आधारित एक तामिळ चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मोहन राम यांनी साकारली होती.

पेरियार

12) जोशी की कांबळे : 2008 मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात भीमरावांचा जयजयकार हे एक भीमगीत आहे.

13) डेबू : 2010 मधील निलेश जळमकर दिग्दर्शित गाडगे बाबा यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका साकारली गेली होती.

14) रमाबाई भिमराव आंबेडकर : 2011 मधील प्रकाश जाधव दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता गणेश जेथे यांनी साकारली होती.

15) शूद्र: द राइझिंग : 2012 मधील संजीव जयस्वाल दिग्दर्शित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित हिंदी चित्रपट आहे. शूद्रांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. जय जय भीम हे चित्रपटाचे एक आंबेडकरांवरील गाणे आहे.

16) अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध : 2013 मधील प्रवीण दामले दिग्दर्शित गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे.

17) रमाबाई : 2016 मधील एम. रंगनाथ दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक कन्नड चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सिद्धाराम कर्णिक यांनी साकारली होती.

18) बोले इंडिया जय भीम : 2016 मधील सुबोध नागदेवे दिग्दर्शित एल.एन. हरदास यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका श्याम भीमसरिया यांनी साकारली होती.

19) सरणं गच्छामि : 2017 मधील प्रेम राज दिग्दर्शित भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक तेलुगु चित्रपट आहे. आंबेडकर सरणं गच्छामि (अर्थ: मी आंबेडकरांना शरण जातो) हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात आंबेडकर यांचीही भूमिका साकारली गेली आहे.

20) बाळ भिमराव : 2018 मधील प्रकाश नारायण दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका बाल कलाकार मनीष कांबळे यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.

21) रमाई : 2019 मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. यात रमाबाईंची भूमिका अभिनेत्री वीणा जामकर यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.