पनवेल तालुक्यातील कामोठे येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवतीसाठी शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता, प्लॉट नं २, विक्रम टॉवर, हॉल ०१, सेक्टर १०, कामोठे, (नवीमुंबई) येथे मोफत एक दिवसीय उद्योजकता कार्यशाळा कार्यक्रम होणार आहे या कार्यशाळेत जे लाभार्थी हजर असतील त्यांच्यातील लाभार्थीची मुलाखतीद्वारे निवड करून त्यांना दोन महिने मोफत-उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमास पाठवले जाईल.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मुंबई (MCED), हायटेक विकास उद्योजकता कार्यक्रम (TEDP), व्यापार सुलभता कक्ष व महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील उद्योजकांसाठी प्रथमच मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामूहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत होणार आहे. यात अप्लाईड डाटा सायन्स अँड अॅनॅलिटीक, अप्लाईड आर्टीफिशियल इंटेलिजन्स विथ इन्फोसिस ऑन रोबोटिक अँड आय ओ टी, क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस सिस्टिम अॅडमिनीस्टेशन अँड बेसिक जापनीज, आय टी ऑटोमेशन प्रोग्रामिंग + बेसिक जापनीज, तसेच सायबर सिक्युरिटी अँड डाटा बेस रिकवरी आदी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सदर कोर्सची फी बाहेर एक ते तीन लाख रुपये इतकी आकारली जाते.
अनुसूचित प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी साठी मोफत असून हा कोर्स केल्यानंतर कुठेही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते किंवा स्वत:चा आय टी उद्योग सुरु करता येऊ शकतो. यासाठी लाभार्थीची शैक्षणिक पात्रता बी.ई. किंवा सायन्स पोस्ट ग्रज्युएट पास व अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. मुलाखतीस येताना सोबत बायोडाटा, २ पासपोर्ट फोटो, जातीचे प्रमाणपत्र, मार्कशीट, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला सोबत असणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थीनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती ९७७३६९०६९८, ९८२०९६३२६८, ९००४८९१०१५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने डॉ.विजय कदम यांनी केलेले आहे.