बातम्या

गॅनदेन मॉनेस्ट्री : एक सुंदर आणि प्रेरणादायी माहीतीपटाचा लाभ घ्या

तिबेटमध्ये गेलुग विद्यापीठाच्या तीन मॉनेस्ट्रीज आहेत. गॅनदेन मॉनेस्ट्री, सेरा मॉनेस्ट्री आणि ड्रेपुगं मॉनेस्ट्री. त्यापैकी गॅनदेन मॉनेस्ट्री ही ल्हासातील दागझे जिल्ह्यात आहे. गॅनदेन मॉनेस्ट्री इ.स. १४०९ मध्ये सॉगंकप्या लॉझोन्ग द्रागपा यांनी स्थापित केली. १९५९ नंतर तिबेट-चीन संघर्षात चीनने ती उध्वस्त केली. परंतु ती काही प्रमाणात पुन्हा उभारली गेली. तिबेट वरून भारतात आलेल्या तिबेटी निर्वासितांनी कर्नाटक मध्ये याच नावाची दुसरी मॉनेस्ट्री १९६६ मध्ये उभारली आहे.

ल्हासा पासून ईशान्य दिशेला चाळीस किलोमीटर अंतरावर ही मॉनेस्ट्री असून निसर्गरम्य परिसरात व उत्तुंग पर्वतराजीत ती वसलेली आहे. येथील वातावरण नेहमीच आल्हाददायक असते. गॅनंदोनचा अर्थ आनंददायक असा ही होतो. तिबेटीयन दुसरे नाव तुसित स्वर्ग असे आहे. जेथे बोधिसत्व मैत्रेय विहार करतो असे समजले जाते.

GBC INDIA आपल्या सर्व दर्शकांना विनंती करतो की दिनांक २१ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६:३० वाजता. www.gbcindia2020.in ला भेट द्या आणि सुंदर माहीतीपटाचा लाभ घ्या.