बातम्या

गौतम बुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्ट ‘या’ देशात होणार सुरू

हा लुंबिनी स्थळाजवळचा एअरपोर्ट पुढील वर्षी एप्रिलमध्ये चालू होत आहे. नेपाळमध्ये ‘त्रिभुवन’ हा एकच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लुंबिनी येथील विमानतळ छोटा होता व मोठी विमाने तेथे ऊतरु शकत नव्हती. यास्तव त्रिभुवनला सहाय्य म्हणून ‘गौतम बुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्ट’ ( GBIA) हा आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन जागी बांधण्याचा निर्णय होऊन सन २०१५ मध्ये कामास सुरवात देखील झाली. व चारच वर्षात चीनच्या कंपनीने हा ३००० मी. धावपट्टी असलेला विमानतळ बांधला.

नेपाळमध्ये अलीकडे पर्यटकांची संख्या खूप वाढली आहे. लुंबिनी हे बुद्धांचे जन्मस्थळ येथून २४ कि. मी.अंतरावर आहे. या विमानतळाचा बांधकाम खर्च US$ ५४.५ मिलियन इतका असून त्यास Asian Development Bank यांनी अर्थसहाय्य केले आहे. या विमानतळामुळे श्रीलंकेतून डायरेक्ट विमानसेवा गौतम बुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्टवर चालू होईल. तसेच कंबोडिया, भारत आणि थायलंड या देशांनी सुद्धा यामध्ये स्वारस्य दाखविले आहे.

पुढील वर्षी बुद्ध जयंतीपूर्वी हा एअरपोर्ट सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचे ठरविले गेले असुन ‘Visit Nepal 2020’ असे घोषवाक्य ही तयार करण्यात आले आहे. आपल्याकडे नवी मुंबईत सन २००१ पासून नवीन विमानतळ बांधण्यात येणार आहे असे ऐकिवात आहे. नेपाळ सारख्या छोट्या राष्ट्राने भूकंपातून सावरून चार वर्षात आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला. आपल्याकडे अजून धावपट्टीचा पत्ता नाही.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक इतिहास अभ्यासक)

One Reply to “गौतम बुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्ट ‘या’ देशात होणार सुरू

Comments are closed.